agricultural stories in Marathi, weekly weather forecast. | Agrowon

उष्ण, कोरड्या हवामानाची शक्यता
डॉ.रामचंद्र साबळे
शनिवार, 1 जून 2019

जून महिन्यात पहिल्या आठवड्यात मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल. ६ जून पर्यंत तो केरळात दाखल होईल. दिनांक १ जून रोजी केरळात पाऊस सुरू होईल. दिनांक ९ जूनपर्यंत कर्नाटक, कोकण किनारपट्टी, आंध्र, तमिळनाडू भागात पाऊस सुरूच राहील. ५ दिवस पाऊस झाल्यानंतर तेथे मॉन्सून दाखल झाला असे घोषित केले जाते.

जून महिन्यात पहिल्या आठवड्यात मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल. ६ जून पर्यंत तो केरळात दाखल होईल. दिनांक १ जून रोजी केरळात पाऊस सुरू होईल. दिनांक ९ जूनपर्यंत कर्नाटक, कोकण किनारपट्टी, आंध्र, तमिळनाडू भागात पाऊस सुरूच राहील. ५ दिवस पाऊस झाल्यानंतर तेथे मॉन्सून दाखल झाला असे घोषित केले जाते.

 कोकण ः
 सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ८८ टक्के राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के तर रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४९ टक्के राहील. या आठवड्यात कोकण किनारपट्टीत पावसाची शक्‍यता आहे.

उत्तर महाराष्ट्र
 नाशिक जिल्ह्यात किमान तापमान ३९ अंश सेल्सिअस पर्यंत राहील. धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस राहील. तर जळगाव जिल्ह्यात ते ४५ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. तर नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत ते २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच जळगाव जिल्ह्यातही आकाश अंशतः ढगाळ राहील. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता केवळ ५० टक्के राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ७२ ते ७४ टक्के राहील. तर धुळे जिल्ह्यात ६५ टक्के राहील. नाशिक जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ टक्के राहील.

 मराठवाडा
 जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. लातूर व जालना जिल्ह्यांत ते ४४ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्यांत ४५ अंश सेल्सिअस राहील. तसेच नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ते ४६ अंश सेल्सिअस राहील. या सर्व भागात उष्णतेची लाट राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तर लातूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात ते २९ अंश सेल्सिअस राहील आणि परभणी व जालना जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नांदेड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राहील. तसेच हिंगोली जिल्ह्यात ३२ टक्के राहील. लातूर व परभणी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ३७ टक्के राहील. उर्वरित उस्मानाबाद, बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १७ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ
 वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील. अमरावती जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. तर बुलढाणा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस आणि अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वाशीम जिल्ह्यात ६० टक्के राहील. तर बुलढाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ४० ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलढाणा व अमरावती जिल्ह्यांत २० ते २५ टक्के राहील तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३५ ते ३८ टक्के राहील.

 मध्य विदर्भ
 यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील तर वर्धा, नागपूर जिल्ह्यांत ४६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते २२ टक्के राहील.

 पूर्व विदर्भ
 चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत ते ३१ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ टक्के राहील. आणि गडचिरोली जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के राहील. तसेच चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २० ते २२ टक्के राहील.

 दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
 पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सांगली व सातारा जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल आणि उष्णतेची लाट जाणवेल. सोलापूर जिल्ह्यात किमान २८ अंश सेल्सिअस राहील. सातारा व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस राहील. पुणे व सांगली जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८८ टक्के राहील. तर सोलापूर जिल्ह्यात ५० टक्के राहील. पुणे, सांगली व सातारा जिल्ह्यांत ७० ते ७७ टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४१ टक्के राहील, तर सोलापूर जिल्ह्यात १६ टक्के राहील. उर्वरित सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत २३ ते २४ टक्के राहील. सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २१ टक्के, नगर जिल्ह्यात २३ टक्के तर सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १९ टक्के राहील.

कृषी सल्ला

  •  कोरडवाहू व अवर्षप्रवण भागात जमिनीची बांधबंदिस्ती व आंतरबांध व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. उतारास आडवे सारे पाडावेत. पावसाचे पाणी साऱ्यात मुरेल. जमिनीतील ओलावा वाढवणे आणि टिकवणे शक्‍य होईल.
  •  जमिनीच्या खोलीनुसार व पावसाचे प्रमाणानुसार पीक पद्धती व पीक नियोजन करावे.
  •  भातखाचराच्या बांधांची डागडुजी करावी.
  •  खरीप हंगामात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
  •  पिकाची फेरपालट व दुबार पीकपद्धती निश्‍चित करावी.
  •  जनावरांसाठी चारा पिकांची पेरणी करावी.

 

(ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...