पाणी व्यवस्थापनासाठी नियमन तूट सिंचन

तुषार सिंचनामुळे टंचाईच्या काळात पिकाला पुरेसे पाणी देता येते.
तुषार सिंचनामुळे टंचाईच्या काळात पिकाला पुरेसे पाणी देता येते.

राज्यामध्ये अनेक भागांत सध्या दुष्काळी वातावरण असून, सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासत आहे. भविष्यामध्ये सातत्याने उद्भवणाऱ्या अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी नियमन तूट सिंचन हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.

पृ थ्वीचा ७० टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यातील केवळ २.५ टक्के पाणी गोडे आहे. गोड्या पाण्यापैकी दोन तृतीयांशपेक्षा अधिक पाणी कृषी क्षेत्राच्या सिंचनासाठी वापरले जाते. मात्र, गोड्या पाण्यासाठी अन्य क्षेत्रासाठीचा संघर्ष वाढत आहे. यामुळे सर्व क्षेत्रात पाण्याच्या बचतीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता वाढत आहे. कृषी क्षेत्रात नियमन तूट सिंचन हे पाण्याची बचत आणि वापर कार्यक्षमता सुधारण्यासाठी ओळखले जाते. या पद्धतीत वाढीच्या विशिष्ठ कालावधीदरम्यान नियमन तूट सिंचनाद्वारे पाण्याचा सौम्य तणाव तयार केला जातो. त्यामुळे पिकांच्या वनस्पतीमध्ये शारीरिक व जैव-रासायनिक गुणधर्मांत सकारात्मक सुधारणा होते. पिकांच्या उत्पादनावर किमान परिणामासह २० ते ३० टक्यांपर्यंत सिंचनाचे पाणी वाचविणे शक्य होते. पाणी वापर कार्यक्षमता वाढते. संकल्पना

नियमन तूट सिंचन (Regulated Deficit Irrigation-RDI) या प्रक्रियेमध्ये पीक पद्धतीमध्ये शास्त्रीय पद्धतीने आवश्यकतेपेक्षा कमी सिंचन केले जाते. पिकाचा पाणीपुरवठा कमाल पातळीच्याखाली कमी केला जातो. पिकाला सौम्य ताण दिलाजातो. या ताणास वनस्पती सकारात्मक प्रकारे प्रतिसाद देतात. ही प्रक्रिया पिकाच्या विशिष्ट वाढ अवस्थेत राबवली जाते. यामुळे उत्पादनामध्ये किंचित घट झाली तरी पाण्याची मोठी बचत साध्य होते. हे शिल्लक राहिलेले पाणी अन्य पिकांसाठी वापरता येते.

 वनस्पतींच्या प्रतिसादाचे तत्त्व

  • वनस्पतीमध्ये प्रकाशसंश्लेषणापेक्षा जलसंक्रमण हे पाणी तुटीला अधिक संवेदनशील आहे. अशी स्थिती उद्भवल्यास वनस्पती त्याला खालील प्रकारे प्रतिसाद देतात.
  • पानांवरील छिद्रे बंद करून बाष्पोत्सर्जन कमी केले जाते.
  • अनुकूलित छिद्र नियंत्रणाद्वारे कर्बग्रहण- बाष्पोत्सर्जन प्रमाण सुधारणे.
  • क्षेत्र तूट सिंचनामुळे मातीतील बाष्पीभवन कमी होते. यामुळे पिकाच्या जैव वस्तुमानामध्ये घट होत असली तरी त्याचा अंतिम पीक उत्पादनावर फारच कमी प्रभाव पडतो. जैव वस्तुमान कमी झाले तरीही पुनरुत्पादक वाढीची क्षमता ही भरपाई करते. त्याचप्रमाणे पाण्याच्या तणावाच्या स्थितीमध्ये काही हितावह शारीरिक प्रक्रियांना चालना मिळते. त्याचा फायदा वनस्पतीला होतो.  
  • पीक, वनस्पतीचा आकार, कॅनोपी मर्यादित राहते.
  • फूलधारणा वाढते.
  • मातीचा खोल थर शोधण्यासाठी मुळांचा वाढीव विकास होणे.   
  • फळांची गुणवत्ता आणि स्वाद सुधारणे.
  • धान्य/फळ लवकर तयार होणे/पिकणे.
  • शेतात वापरायची पद्धत        

    नियमन तूट सिंचन पद्धती वापरण्याचे मार्ग (१) वाढीच्या अवस्थांवर आधारित तूट सिंचन (२) आंशिक मुळे-क्षेत्र तूट सिंचन (३) उप-पृष्ठभाग ठिबक सिंचन.        यातील आंशिक मुळे-क्षेत्र तूट सिंचन सर्वात लोकप्रिय आणि परिणामकारक असून, पीक उत्पादनावर किमान परिणामांसह २० ते ३० टक्यांपर्यंत पाणी वाचवता येते.

    सिंचनाची योग्य पद्धत

  • यासाठी मातीचा प्रकार आणि पिकांनुसार सरी-वरंबा, रुंद वरंबा-सरी, दोन ओळींनंतर सोड ओळ सरी, एक आड एक सरी सिंचन या पृष्ठभाग सिंचन पद्धतींच्या अनुसार योग्य अशी जमीन बांधणी करावी. त्याचप्रमाणे तुषार सिंचन, ठिबक सिंचन, उप-पृष्ठभाग सिंचन, मडका सिंचन अशा सूक्ष्म-सिंचन प्रणालींचा वापर करता येईल. या  सिंचन पद्धतीमध्ये मर्यादित पाणी वापरून पाण्याचा ताण कालावधी, वेळ आणि तीव्रता यावर नियंत्रण ठेवता येते. पाण्याचे नियमन करता येते.
  • योग्य पिके आणि वाढीच्या अवस्था
  • तूट सिंचनासाठी भुईमूग, ज्वारी, हरभरा, करडई, सूर्यफूल ही रब्बी पिके योग्य आहेत. तसेच ऊस, बटाटा, मका, गहू ही पिके कमी उपयुक्त मानली जातात.
  • काही वृक्ष-फळ पिके, उदा. संत्रा, द्राक्षे या सिंचन पद्धतीस उत्तम प्रतिसाद देतात.
  • पिकांच्या वाढीच्या अवस्था कायीक/वनस्पतिजन्य वाढ आणि पिकण्याची अवस्था पाणी तणावास कमी संवेदनशील असते. या वाढीच्या अवस्था तूट सिंचनासाठी योग्य आहेत. फुलोरा, उत्पादन निर्मिती या वाढीच्या अवस्था पाण्यासाठी अधिक संवेदनाक्षम असतात. या अवस्थांमध्ये सिंचनाच्या पाण्यात कपात करता येत नाही.   

    नियमन तूट सिंचनाच्या यशस्‍वितेसाठी

  • पाणी तणाव तीव्रता, कालावधी आणि पीकवाढीची अवस्था ः पाणी तणावाचे अचूक मूल्यांकन.                                         
  • सिंचन पाण्याचा पुरेसा पुरवठा आणि अचूक स्थान नियोजन.
  •   यातून १) कधी आणि किती पाणी द्यावे (तूट सिंचनाची वेळ आणि खोली),  २) पाणी कोठे द्यावे आणि कसे द्यावे (तूट सिंचनाचा अचूकपणा/तंतोततपणा) याची उत्तरे मिळू शकतात.
  • नियमन तूट सिंचनाच्या सरावासाठी महत्त्वाच्या बाबी  
  • निर्धारित वाढीच्या काळात किंवा संपूर्ण वाढीच्या काळात पाणी तणावास पीक प्रतिसाद.                        
  • कमी उत्पादन देणाऱ्या वाणांपेक्षा उच्च उत्पादनक्षम वाण पाणी तणावास अधिक संवेदनशील असतात.
  • लहान वाढीचा कालावधी आणि दुष्काळ सहनशीलता असलेली पिके किंवा पीक जाती तूट सिंचनासाठी सर्वात योग्य आहेत.
  • सूक्ष्म पोतयुक्त मातीची पाणी धारणा क्षमता वालुकामय मातीपेक्षा जास्त असते. त्यामुळे सूक्ष्म पोतयुक्त मातीत तूट सिंचनाचे यश अधिक शक्य आहे.
  • पाणी तणावास पिकाचा प्रतिसाद किंवा उत्पादनावरील त्याचा प्रभाव अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्याचे सखोल ज्ञान आवश्यक आहे.     
  •   पीक प्रजाती, वाण, पीक वाढीची अवस्था
  • पाणी ताण वेळ, कालावधी आणि पाणी
  • तणाव तीव्रता.
  • हवामान, माती सुपीकता आणि पीक व्यवस्थापन.
  • जोखीम

  • पाणीपुरवठा- उत्पादन संबंध जटिल आणि स्थान विशिष्ट आहे.
  • पाणी तणावास पीक संवेदनशीलता अत्यंत परिवर्तनीय आहे.
  • तूट सिंचन आराखडा आणि कामकाज यात समाविष्ट त्रुटींचे अंतर विस्तृत आणि स्थान विशिष्ट आहे.
  • नियमन तूट सिंचनाच्या सक्षम तंत्रज्ञानाबाबत अधिक संशोधन आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण अपेक्षित आहे.
  •     एक नावीन्यपूर्ण दृष्टिकोन   दुष्काळी स्थितीचा संभाव्य अंदाज असताना सिंचनासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरू शकते. त्यातून पाण्याचा कार्यक्षम वापर, बचत आणि उत्पादनामध्ये स्थिरता मिळवणे शक्य आहेत. या दरम्यान पाण्याच्या तणावासाठी पिकांमध्ये प्रतिसाद नियंत्रण करणाऱ्या भौतिक तसेच जैविक प्रक्रिया उत्तम प्रकारे समजून घेणे  आणि संशोधन गरजेचे आहे.

    - डॉ. गोविंद जाधव, ९८९०९५४२३१ (माजी संचालक, विस्तार शिक्षण विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com