agricultural stories in Marathi,kidney stone in cattle | Page 2 ||| Agrowon

जनावरातील मुतखड्यावर उपचार
डॉ. गिरीश यादव
बुधवार, 24 एप्रिल 2019

जनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा होतो. त्यामुळे पशुपालकांनी आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकांना दाखवून त्वरित उपचार करावेत. जनावरांना सकस व संतुलित आहार द्यावा. जनावरांना शुद्ध पाणी द्यावे. खाद्यातून ‘अ’ जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा.

मुतखडा हा आजार प्रमुख्याने खच्चीकरण केलेले बैल, कुत्रा, बोकडांमध्ये दिसून येतो. हा आजार होऊ नये म्हणून जनावरांची योग्य काळजी घ्यावी. साधारणतः उन्हाळ्यात मुतखड्याचे प्रमाण जास्त आढळते. हा   आजार प्रामुख्याने खच्चीकरण केलेल्या बैलांना होतो.

आजाराची कारणे

जनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा होतो. त्यामुळे पशुपालकांनी आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकांना दाखवून त्वरित उपचार करावेत. जनावरांना सकस व संतुलित आहार द्यावा. जनावरांना शुद्ध पाणी द्यावे. खाद्यातून ‘अ’ जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा.

मुतखडा हा आजार प्रमुख्याने खच्चीकरण केलेले बैल, कुत्रा, बोकडांमध्ये दिसून येतो. हा आजार होऊ नये म्हणून जनावरांची योग्य काळजी घ्यावी. साधारणतः उन्हाळ्यात मुतखड्याचे प्रमाण जास्त आढळते. हा   आजार प्रामुख्याने खच्चीकरण केलेल्या बैलांना होतो.

आजाराची कारणे

 • बैलाच्या मूत्र मार्गाची रुंदी खच्चीकरण केल्यानंतर कमी होते. त्यामुळे हा आजार दिसतो.
 • बैलाचा मूत्रमार्ग हा इंग्रजी ‘एस’ आकाराचा असतो. हे मुतखडे ‘एस’ मार्गाच्या दोन वळणांपैकी एका वळणावर प्रमुख्याने आढळतात.
 • उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईत जनावरांना योग्य प्रमाणात पिण्यासाठी पाणी मिळत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तातील क्षार वाढतात. ते लघवीच्या स्वरूपात उत्सर्जित होतात. हे क्षार मूत्र मार्गात येऊन साचतात. त्यामुळे मुतखडा होतो.
 • जनावरांना क्षारयुक्त, खारे व जड पाणी दिल्यामुळे मुतखडा होतो.
 • अन्नातून खनिजाचा पुरवठा जास्त प्रमाणात झाल्यास, एस्ट्रोजनयुक्त वनस्पतीची वैरण जास्त दिल्यास हा आजार दिसतो.
 • ऑक्झलेट किंवा फोस्फेटयुक्त खाद्य पदार्थामुळे मुतखडा होतो.
 • मूत्रपिंडाचा विकार किंवा मूत्रपिंडापासून मूत्रनलिकेपर्यंत कोठेही जखम झाल्यास
 • ‘अ’ जीवनसत्त्वाची कमी व कॅल्शियम व फॉस्फरसचे शरीरातील संतुलन बिघडल्यास हा आजार होतो.
 • मूत्रनलिकेत जखम असल्यास मुतखडा होतो.

मुतखड्याची लक्षणे

 • मुतखडा हा मूत्रमार्गात इजा झाल्यास किंवा ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मूत्रमार्गातील तांबूस पेशी मूत्रमार्गात (विशेषतः ‘एस’ मार्गाच्या वळणात) येऊन चिकटतात.  या पेशीवर लघवीतून उत्सर्जित होणाऱ्या क्षाराचे थर साचतात. त्याचा आकार हळूहळू वाढतो.
 • प्रथम मुतखड्याचा आकार लहान असल्यामुळे मूत्रवाहिनी अंशतः बंद होते व नंतर मूत्रवाहिनीत खड्याचा आकार वाढल्यामुळे ती पूर्णपणे बंद होते.
 • गायीमध्ये मूत्रवाहिनीची लांबी कमी व रुंदी जास्त असते. त्यामुळे हा आजार गाईत दिसत नाही.
 • कुत्र्यामध्ये मुतखडे मूत्रपिंड व मूत्राशयात सापडतात.
 • मुतखडा झालेले जनावर थेंब थेंब लघवी करते किंवा लघवी पूर्णपणे बंद होते.
 • लघवी बंद झाल्यामुळे मूत्राशयातील  लघवीचे प्रमाण वाढते. मूत्राशायावर ताण येतो.
 • जनावरे कळ देतात. असहाय वेदना झाल्यामुळे जनावर उठबस करते, पाठ ताणते, पोटावर पायाने लाथा मारते.
 • जनावर खातपीत नाही, लेंड्यायुक्त शेण टाकते, डोळे खाली जातात.
 • जनावराची कातडी खडबडीत होते.
 • वरील लक्षणे दिसताच उपचार करावा नाहीतर मूत्राशयाच्या पिशवीवर जास्त लघवी साठून त्यावरील ताण वाढत मूत्राशयाची पिशवी फुटते.
 • मुतखडे जर तीक्ष्ण स्वरूपाचे असतील तर मूत्रमार्ग फाटून लाघवी कातडीखाली जमा होते. तेथे सूज येते. या लाघवीमुळे बऱ्याच वेळेस शिश्न सुजते. निकामी होते.
 • मुतखड्यावर जर सुरवातीस उपचार केला तर मूत्राशयाची पिशवी फाटणे टाळता येते.
 • जर मूत्राशयाची पिशवी फाटली तर लघवी पोटात साठून राहते. रक्तात शोषली जाते. त्यामुळे लघवीतील नत्र रक्तात मिसळते. जनावरांना ‘मूत्रज्वर’ होतो. त्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते.
 • मूत्राशयाची पिशवी फुटल्यानंतर दोन ऑपरेशन करावे लागतात. प्रथमतः मूत्र मार्गातील मुतखडा काढणे व नंतर फाटलेले मूत्राशय शिवले जाते. त्यासाठी वेळीच लक्ष दिले व उपाय केला तर दुसरे ऑपरेशन टळू शकते. जनावर निश्चितपणे वाचते.

 

मुतखडा आजारावर उपचार आणि प्रतिबंध

 • जनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा होतो, त्यामुळे पशुपालकांनी याची लक्षणे दिसताच पशुवैद्यकांना दाखवून त्वरित उपचार व शस्त्रक्रिया करावी.
 • जनावरांना सकस व संतुलित आहार द्यावा.
 • जनावरांना दिले जाणारे पाणी भरपूर, शुद्ध असावे.
 • खाद्यातून ‘अ’ जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा.
 • जनावरांना पावसाळ्यात व हिवाळ्यात दोन वेळेस व उन्हाळ्यात तीन वेळेस पिण्यासही भरपूर पाणी दिले तर मुतखडा होण्यास निश्चितच प्रतिबंध होईल.
 • कोणताही अघोरी उपचार पशुपालकांनी करून घेऊ नये. यामध्ये जनावर दगावते.

- डॉ. गिरीश यादव  ७६६६८०८०६६ 

(मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय परळ, मुंबई)

इतर कृषिपूरक
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...