agricultural stories in Marathi,mamagement of cattle feed | Agrowon

पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपाय
डॉ. पराग घोगळे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

उन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी होते, अशा वेळी कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त पोषक तत्त्वे देऊन जास्त दूध व फॅट उत्पादन आपण घेतले पाहिजे. जनावरांना स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी दिल्यास ते पाणी जास्त पितात. दूध उत्पादनवाढीला मदत होते.

क च्चा माल, खाद्य आणि चाऱ्याच्या वाढत जाणाऱ्या किमती यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशा वेळी दूध उत्पादकांनी काही उपाय केले तर पशू आहारावरील  खर्च काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

उन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी होते, अशा वेळी कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त पोषक तत्त्वे देऊन जास्त दूध व फॅट उत्पादन आपण घेतले पाहिजे. जनावरांना स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी दिल्यास ते पाणी जास्त पितात. दूध उत्पादनवाढीला मदत होते.

क च्चा माल, खाद्य आणि चाऱ्याच्या वाढत जाणाऱ्या किमती यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशा वेळी दूध उत्पादकांनी काही उपाय केले तर पशू आहारावरील  खर्च काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

 • आहारावरील खर्च कमी करण्याबरोबरच उन्हाळ्याच्या काळातही शक्य तितके दूध उत्पादन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. सहकारी तत्त्वावर दूध उत्पादक, सोसायटी इत्यादी संस्थांनी एकत्र येऊन जितके जास्त पशुखाद्य, चारा, पुरके इत्यादी घटकांची खरेदी करावी. जितका जास्त कच्चा माल एकत्र विकत घेतला जातो तितकी त्याची किंमत कमी करून घेता येते व वाहतुकीचा खर्च कमी येतो.
 • उन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी होते, अशा वेळी कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त पोषक तत्त्वे देऊन जास्त दूध व फॅट उत्पादन आपण घेतले पाहिजे. जनावरांना स्वच्छ व थंड पाणी जनावरांना पिण्यासाठी दिल्यास ते पाणी जास्त पितात. दूध उत्पादनवाढीला मदत होते. फॉगर किंवा पंख्याचाच्या मदतीने गोठ्यात जितके थंड वातावरण ठेवता येईल तेवढा दुभत्या जनावरांवरील ताण कमी होईल.
 • पशुखाद्य, चारा, कच्चा माल खरेदी करताना तो केवळ चांगला दिसतो म्हणून नव्हे तर त्यातील पोषक घटकही तपासून घ्यावेत. यासाठी पुरवठादाराकडे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील प्रमाणपत्राची मागणी करावी. त्यामुळे दिलेल्या किमतीत योग्य माल मिळाला याची खात्री करता येईल.
 • खरेदी केल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची व इतर खाद्य चारा इत्यादीच्या किमतींची दुसऱ्या पुरवठादारांकडून माहिती करून घ्यावी. योग्य त्या किमतीत कच्चा माल खरेदी करावा. तसेच त्याचे  योग्य वजनही आल्याची खात्री करून घ्यावी.
 • कच्चा माल खरेदी करताना त्यातील आर्द्रता (पाण्याचे प्रमाण) कमी असेल तर तो माल जास्त काळ टिकेल. जास्त आर्द्रता असलेला कच्चा माल बुरशी लागून लवकर खराब होऊ शकतो. त्याचा दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून कच्चा माल साठवणूक करताना योग्य ती काळजी घ्यावी. कच्च्या मालाच्या व सायलेजच्या बॅग उंदीर व घुशींपासून सुरक्षित ठेवाव्यात.
 • बाजारपेठेतील विविध प्रकारचा कच्चा माल, त्याचे दर याची माहिती घ्यावी. केवळ काही मोजका कच्चा माल जसे की, सरकी पेंड, मका भरडा, गहू भुसा यावर अवलंबून राहू नये.
 • तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नवीन प्रकारचे खाद्य किंवा कच्चा माल जसे की, सरकी डी. ओ. सी., मोहरी डी. ओ. सी., सोयाबीन डी. ओ. सी., शेंगदाणा डी.ओ.सी. गाई म्हशींच्या खाद्यात किती प्रमाणात वापरता येईल व खाद्याची किंमत कशी कमी करता येईल याची माहिती घ्यावी.
 • तेलयुक्त पेंडी लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यात अफलाटॉक्सीन हे बुरशीयुक्त विषारी तत्त्व वाढण्याची शक्यता असते. त्याचे विपरीत परिणाम शरीरावर व प्रजनन संस्थेवर होऊ शकतात.
 • गाई, म्हशी या सवयीच्या गुलाम आहेत, हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे त्यांच्या खाद्यात बदल करताना अतिशय हळुवारपणे करावेत. नवीन घटक खायला द्यावेत. टी. एम .आर. पद्धतीने म्हणजे सर्व खाद्य घटक व चारा इत्यादी एकत्र एकजीव करून खाऊ घातल्यास नवीन घटक खाऊ घालण्याची सवय लवकर लावता येईल.
 • हिरव्या चाऱ्याची लागवड करताना केवळ मका हेच पीक विचारात न घेता जास्त प्रथिनेयुक्त चाऱ्यामुळे पशुखाद्याच्या खर्चात बचत करता येते. हिरवा मक्यामध्ये केवळ ६ ते ७ टक्के प्रथिने असतात.  
 • नवीन जास्त प्रथिनेयुक्त चाऱ्याच्या जाती जसे डी. एच. एन.-६ , लसूण घास , इत्यादींची निवड करावी. या चाऱ्यात प्रथिने १५ ते २१ टक्के इतकी जास्त असतात. जेणेकरून खाद्यावरचा खर्च कमी करता येईल. पशुआहारामध्ये जास्त खर्च हा प्रथिनावर केला जातो.
 • एक किलो हिरव्या मक्यामध्ये कोरड्या तत्त्वावर केवळ ६० ते ७० ग्रॅम प्रथिने मिळतात. तर किलो किलो लसूण घास खाऊ घातल्यास कोरड्या तत्त्वावर २०० ग्रॅम प्रथिने जनावरांना मिळतात. इतकी प्रथिने पशु खाद्यामधून कमी करता येतात, उदा. ५ किलो ओल्या लसूण गवतामागे १ किलो पशुखाद्य कमी करता येऊ शकते.
 • गाई, म्हशींना त्यांच्या वजनाप्रमाणे व दूध उत्पादनाप्रमाणे नेमके व मोजून पशुखाद्य व चारा दिल्यास होणारा अतिरिक्त खर्च टाळता येईल. दुभत्या गाई, वासरे, कालवडी, गाभण गाय, बैलांना मोजून खाद्य व चारा द्यावा म्हणजे अनावश्यक खर्च कमी करता येईल.

 

सरकी पेंडीला पर्याय  

 • पशुपालक वर्षानुवर्षे सरकी पेंडीचा वापर पशुखाद्य म्हणून करतात. सरकी पेंडीमध्ये सरासरी २२ टक्के प्रथिने व ७ टक्के तेल असते. सरकी पेंड पाण्यात घातल्यावर फुगते आणि जनावरांना जास्त खाऊ घातल्यासारखे वाटते म्हणूनही काही पशुपालक याचा वापर करतात. तसेच सरकी पेंडीमधील भेसळ हा मुद्दा वारंवार चर्चिला जातो. वाढत जाणाऱ्या मागणीमुळे भेसळीला चालना मिळते.
 • छोट्या पशुपालकांना सरकी पेंड प्रयोगशाळेत तपासणी करण्याची सुविधा नसल्याने याविषयीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो. गेल्या काही वर्षात सरकी पेंडीमधील तंतूचे प्रमाण १८ टक्क्यांवरून २६ टक्क्यांवर पोचले आहे.
 • सरकी पेंडमधील गॉसिपोल हा पोषणविरोधी घटक. यामुळे गायी, म्हशींमध्ये विषारी परिणामासोबतच यकृतावरही विपरीत परिणाम होतो. सरकीमधील गॉसिपोलचा विपरीत परिणाम गाई-म्हशी व बैलांच्या प्रजनन क्षमतेवरही होतो. यामुळे सरकीऐवजी कॉटन सिड मिल किंवा सरकी डी. ओ. सी. (डी ऑइल केक) या सरकीपासूनच बनविलेल्या उपपदार्थांचा वापर करता येईल. एक किलो सरकी पेंडऐवजी ६०० ग्रॅम डी. ओ. सी. वापरता येईल, कारण सरकीमधील २२ टक्के प्रथिनांऐवजी त्यात ३८ टक्के प्रथिने असतात. किंमतही जवळपास सारखी असते.
 • सरकीमध्ये असणाऱ्या ७० ग्रॅम तेलाऐवजी ७० ग्रॅम बायपास फॅट वापरता येईल. कॉटन सिड मिल व बायपास फॅट एकत्र दिल्यास जनावरांची तब्येत सुधारण्यास व दूध व फॅट वाढीस मदतच होईल. पण तुलनेत खर्चही कमी येईल.

बायपास फॅटचा वापर

 • सरकी पेंडमधील अतिरिक्त तेलामुळे गायी, म्हशींच्या पोटातील तंतूयुक्त पदार्थ पचायला अडथळे येतात. अशावेळी तंतू कमी प्रमाणात पचल्यास दुधामधील फॅटवर विपरीत परिणाम होतो. तसेच मका चुणी व गहू भुसा यांच्या वापरामुळे व त्यातील स्टार्चमुळे कोठीपोटात तीव्र आम्लता तयार होते. म्हणून उन्हाळ्यात “कुल एनर्जी”चा स्रोत म्हणून बायपास फॅटचा वापर करावा. गाई, म्हशींच्या पोटात बायपास फॅटवर कुठलीच प्रक्रिया होत नाही, जेणेकरून कोठीपोटाचे तापमान कमी राखण्यास मदत होते.  प्रति दिन सरासरी १०० ग्रॅम बायपास फॅट एका जनावराला द्यावे.

सूक्ष्म पोषक घटकांचा वापर
उपलब्ध असलेल्या चारा, खाद्य घटकांचे पचन अधिक वाढविण्यासाठी सूक्ष्म पोषक तत्त्वांचा वापर करावा. यामध्ये प्रामुख्याने ऊर्जेसाठी बायपास फॅट तसेच प्रजननासाठी कॅल्शियम व इतर नैसर्गिक खनिजे, योग्य पचनासाठी रुमेन बफर व यीस्ट कल्चर, ॲसिडीटी रेगुलेटर, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेलेनियम व बायोटीन तसेच दूध वाढीसाठी व पान्हा सुटण्यासाठी आयुर्वेदिक औषधींचे अर्क यांचा समावेश होतो.
पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वरील पूरकांचे मिश्रण पशुआहारात दिल्यास दुभत्या गायी, म्हशी वेळेवर माजावर येण्यास, गाभण राहण्यास, प्रकृती अंक उत्तम राहण्यास, दिलेल्या चारा व खाद्याचे योग्य पचन होण्यास तसेच दूध व फॅट वाढण्यास मदत होते.

पशुआहारात बटाट्याचा वापर

 • उन्हाळ्यात दूध उत्पादनात सरासरी १० ते २० टक्के घट येते. अशा वेळी उत्पादन वाढविण्यासाठी तुकडे केलेल्या बटाट्याचा वापर पशुआहारात आपण करू शकतो.
 • बटाट्याचा वापर करताना तुकडे करून किंवा चाफ करूनच खाऊ घालावा. अन्यथा अन्ननलिकेत तुकडे अडकून पडण्याची शक्यता असते. बटाट्यामध्ये ऊर्जा स्टार्चच्या स्वरूपात असते. तसेच जीवनसत्त्व सीसुद्धा उपलब्ध असते. जे उन्हाळ्यात ताण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे दूध उत्पादक प्रती जनावर २ ते ४ किलो बटाटे तुकडे करून खाऊ घालू शकतात. प्रगत देशांमध्ये बटाट्याचा वापर ऊर्जायुक्त कच्चा माल म्हणून केला जातो.

- डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९
(लेखक पशुआहारतज्ज्ञ आहेत.)

 

इतर कृषिपूरक
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...