पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्त

पेटारची फळे
पेटारची फळे

स्थानिक नाव    : पेटार, पेटारी, पेटारा         शास्त्रीय नाव    :  Trewia polycarpa Bth        इंग्रजी नाव     : False White Teak        संस्कृत नाव     : पिण्डारः        कूळ    :  Euphorbiaceae        उपयोगी भाग     : पिकलेले फळ         उपलब्धीचा काळ     : पिकलेले फळ:- मार्च- मे         झाडाचा प्रकार    : झाड          अभिवृद्धी     : बिया         वापर     : पिकलेले फळ

आढळ महाराष्ट्रातील बहुतेक जंगलांमध्ये पेटारचे पानझडी झाड वाढलेले दिसते. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर पश्चिम घाटातील पुणे, कोल्हापूरच्या जंगलात, माळरानावर तसेच डोंगरकपारीला पेटारची झाडे वाढलेली दिसतात.   

  वनस्पतीची ओळख

  • पेटारचे झाड साधारण १० ते २० मीटर उंच वाढते. झाडाची साल मऊ, तपकिरी करड्या रंगाची असून सालीच्या आतील भाग पिवळसर पांढरा असतो.
  • सालीचा कोवळा भाग लवदार असतो. पाने साधी, गडद हिरव्या रंगाची, मऊसर लव असणारी तर कोवळी पाने तपकिरी रंगाची असतात.
  • पाने हृदयाच्या आकाराची व टोकाशी निमूळती, शिरायुक्त असतात. पेटारची पाने ७ ते १७ सें.मी. लांब व ७ ते १० सें.मी. रुंद. देठ ३ ते ७  सें.मी. लांब. पानाच्या कडा दातेरी असतात. फुले अनेक, एकलिंगी, फिक्कट हिरव्या रंगाची व ३ ते १२ सें.मी. लांब पुष्पगुच्छ्यात येणारी असतात. नर फुले ४ ते ५ मिमी. लांब व ७ ते २० सें.मी. लांब पुष्पगुच्छ्यात येणारी तर मादी फुले  ५ ते ९ मिमी. लांब व लांब दांड्यावर येणारी असतात.
  • फळे गोल, २ ते ३ सें. मी. व्यासाची, कठीण कवच असणारी, किवा लवयुक्त, हिरवी पण लालसर छटा असणारी असतात. फळाचा गाभा ३ ते ४ भागात विभागलेला असतो. गर पांढरा व गोल बियामध्ये लगडलेला असतो. पेटारची फुले डिसेंबर ते मार्चपर्यंत येण्यास सुरवात होते. तर मार्च ते मेपर्यंत पिकलेले फळे खाण्यासाठी तयार होतात.  
  • औषधी उपयोग

  • पेटारची साल व पाने औषधात वापरली जातात. सालीचा काढा करून, गाळून तो पोटदुखीवर पिण्यास दिला जातो.
  • पाने जाळून त्याची राख मूळव्याधीवर लावण्यासाठी वापरली जाते. स्थानिक भाषेत त्याला ‘मिसरी’ असे म्हणतात.
  • इतर उपयोग : पेटारची पिकलेली फळे खाण्यासाठी वापरली जातात.
  • फळांचा गर अतिशय मधुर, रुचकर व शीतल असतो.
  • - अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६,

    (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com