मिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापर

शिवना परिसरातील शेतात सुरू असलेली मिरचीची तोडणी.
शिवना परिसरातील शेतात सुरू असलेली मिरचीची तोडणी.

अौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे आगार आहेत. सुधारित तंत्राचा वापर करून इथल्या शेतकऱ्यांनी मिरचीचे एकरी ३० टनापर्यंत उत्पादन नेले आहे. या भागात दरोज प्रचंड प्रमाणात माल उपलब्ध होतो. खासगी व्यापारी तो जागेवरून घेऊन जातात. मात्र ही खात्रीची बाजारपेठ नाही. मात्र अन्य बाजारपेठा, तिथले दर यांचा विचार करून नाईलाजाने जागेवरच माल विकावा लागतो.  खात्रीची, शाश्वत बाजारपेठ तयार झाल्यास आम्हाला दिलासा मिळेल व अर्थकारण सक्षम होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.   औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सिल्लोड, भोकरदन व जाफ्राबाद आदी तालुके म्हणजे मिरचीचे मोठे आगार आहे. सुमारे सहा हजार हेक्‍टर तरी क्षेत्र असावे असा अंदाज आहे. साहजिकच एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल मिळण्याची सोय व्यापाऱ्यांना होते. त्यामुळेच बाहेरील व्यापारी येथे येऊन मिरची खरेदी करतात. मात्र ही काही स्वतंत्र किंवा शाश्वत बाजारपेठ नाही. जो व्यवहार सुरू आहे तो केवळ विश्वासाच्या बळावरच.

मिरचीचे विस्तारलेले क्षेत्र साधारणत: २००६-०७ मध्ये जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणूकाई, वालसावंगी, पारध शिवारात मिरचीची लागवड सुरू झाली. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्‍यातील सुमारे ६० ते ७० गावांत मिरची पाहण्यास मिळते. भोकरदन तालुक्‍यात जवळपास तीन हजार हेक्‍टर, जाफ्राबाद तालुक्‍यात सुमारे १४०० हेक्‍टर तर सिल्लोड तालुक्‍यात सुमारे २२००  हेक्‍टरवर या पिकाचे क्षेत्र विस्तारले आहे.

शेतकरी सांगतात...

  • एकरी उत्पादन क्षमता आम्ही चांगली मिळवली आहे.
  • या भागात येणारे व्यापारी ही मिरची बांगला देश किंवा अन्य देशात, राज्यांत पाठवतात. त्यामुळे खरेदीचे व्यवस्थापन होते.
  • एप्रिलच्या दरम्यान होते लागवड. जुलैमध्ये माल सुरू होतो. त्या वेळी अन्य ठिकाणी माल उपलब्ध नसल्याने सुरवातीला किलोला ४० ते ६०, ७० रुपयांपर्यंत दर मिळतो. पुढे मात्र दर कोसळतात. ते अगदी सात, दहा ते वीस रुपयांपर्यंत खाली येतात.
  • मिरची का परवडते? शेतकरी सांगतात, की पाणी तुलनेने कमी लागते. उत्पादन चांगले मिळते. अन्य खरीप पिकांच्या तुलनेत ताजा पैसा हाती पडत राहतो.

    हवीय खात्रीची बाजारपेठ दौड, देशमुख यासारखे शेतकरी सांगतात की, व्यापारी किंवा एजंट मिरची खरेदीवेळी दर सांगत नाहीत. मागील दिवशी मिळालेल्या दरांवरूनच आम्ही अंदाज बांधतो. आम्हाला चेकद्वारे पेमेंंट केले जाते. बॅंक खात्यात रक्कम जमा होते. आमच्या भागात कांद्याची बाजारपेठ तयार झाली आहे. तशी खात्रीची व शाश्वत बाजारपेठ मिरचीची तयार व्हायला हवी. सध्या त्यावर कसले नियंत्रण नाही. केवळ व्यापारी, एजंट यांच्या दररोजच्या संवादावर व विश्वासावरच व्यवहार सुरू आहेत.

     अन्य वैशिष्ट्ये

  • प्रत्येक गावात किमान दीडशे मजुरांना मिरचीमुळे आठ ते दहा महिने हाताला काम मिळतं. चार ते पाच रुपये प्रति किलोपर्यंत तोडणीसाठी मजुरी मिळते.
  • येथे येणारे व्यापारी वाशीसह  दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कोलकता बाजारात मिरची पाठवतात.
  • पिंळगाव रेणूकाई, वालसावंगी, भोकरदन, माहोरा, जाफ्राबाद, आमठाणा, देवूळगाव येथे लिलाव पद्धतीने खरेदी.
  • दुपारी चार नंतर सुरू होणारे लिलाव सायंकाळी सात वाजेपर्यंत चालतात.
  • मालाची आवक बघून दर कमी जास्त होतात.
  • व्यापाऱ्यांकडून थेट खरेदी पानवडोद (ता. सिल्लोड) येथील विजय दौड म्हणाले, की आमची पाच एकर शेती आहे. एकरी ३० ते ३५ टन उत्पादन आम्ही घेतो. इथल्या अनेक गावांमधून दररोज १० ते १५ ट्रक भरून मिरची उपलब्ध होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिरची वाशीला घेऊन जाणे शक्य होत नाही. त्याचे कारण आवक गरजेपेक्षा जास्त झाल्यास दर पडतात. अौरंगाबादचे मार्केटही लहान आहे. तेथेही एवढ्या मालाची गरज नसते. मग बाहेरील व्यापारी येथे येतात. त्यांनाच माल द्यावा लागतो. गावामध्ये होते विक्री गोळेगाव (ता. सिल्लोड) येथील जावेद देशमुख यांनीही हीच समस्या सांगितली. ते म्हणाले, की आमच्या गावातील जवळपास सर्व शेतकरी मिरची घेतातच. मला एकरी किमान ७० हजार रुपये उत्पादन खर्च येतो. दर चांगले मिळाल्यास नफा चांगला मिळतो. सर्वात मोठी समस्या म्हणजे दररोजची २० पोती प्रत्येकाकडे माल उपलब्ध होतो. मात्र अन्य बाजारपेठांत एवढ्या मोठ्या प्रमाणात माल नेणे, त्याला तसा दर मिळणे या वाटतात तेवढ्या शक्य होणाऱ्या बाबी नसतात. बाहेरील व्यापाऱ्यांसोबत येथे गावातीलच कमीशन एजंट असतात. त्यांना मग माल द्यावा लागतो.   प्रतिक्रिया बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी लागवडीची पद्धत सुधारली. कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यवस्थापन केले. आता एकरी ३० टनांपर्यंत उत्पादनापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. - डॉ. एस. बी. पवार, ९४२२१७८९८२ प्रमुख, राष्ट्रीय कृषी विकास प्रकल्प, औरंगाबाद.

    खरिपाची पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती पैसा शिल्लक राहत नाही. त्या वेळी मिरचीचे पीक उत्पन्नाचा आधार ठरते. सुमारे सात वर्षांपासून हे पीक घेतो आहे.  - अमोल बावस्कर, लेहाखेडी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद.   माझ्याकडे दोन एकरांत मिरची आहे. शिवाय व्यापार करण्याचीही मला संधी मिळाली आहे. गजानन बोडखे, मिरची उत्पादक व खरेदीदार, ९६६५८३२५२२   पानवडोद,जि. औरंगाबाद. मिरची व्यवस्थापनातील बदल

  • सुरवातीला सपाट वाफे पद्धतीने व्हायची लागवड. कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान प्रसारातून गादीवाफ्यासह ठिबक सिंचन, प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर .
  • पिकाभोवती बांबू रोवून शेडनेट लावण्याला प्राधान्य.
  • एकात्मीक कीड नियंत्रणावर शेतकऱ्यांचा भर.
  • जावेद देशमुख, ९४२२७१७३६७ विजय दौड, ७७४५८३८२०७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com