ग्राहकांची पसंती मुंदडा यांच्या मसाल्यांनाच

झरीकर ब्रॅड मुंदडा कुटुंबातील सर्वच सदस्य मसाला उद्योगात कार्यरत आहेत. उद्योगाच्या वाटचालीत गावातील अनेकांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य मिळाले. म्हणूनच झरी गावाचा लौकिक सर्वदूर पोचावा या उद्देशाने उत्पादनांना झरीकर हे ब्रॅंडनाव दिले.
 मुंदडा यांच्या प्रकल्पात तयार होणारी विविध मसाला उत्पादने
मुंदडा यांच्या प्रकल्पात तयार होणारी विविध मसाला उत्पादने

झरी (जि. परभणी) येथील मुंदडा कुटुंबीयांनी सुरू केलेल्या मसाले गृहउद्योगाचा काही वर्षांतच विस्तार झाला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त गावातच प्रकल्प, यंत्रांची स्वनिर्मिती, उत्कृष्ट गुणवत्तेचा आग्रह, नावीन्यपूर्ण उत्पादने आदी त्यांची विविध वैशिष्ट्ये आहेत. प्रदीप व झरीकर मसाले या दोन ब्रॅंडने होणारी व्यवसायाची उलाढाल सहा कोटींपर्यंत पोचली असून निर्यातीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. परभणी जिल्ह्यातील व त्याच तालुक्यातील झरी येथील तरुण उद्योजक बंधू गोपाल आणि मंगेश या मुंदडा बंधूंनी गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती करत मसाले उद्योगात मोठी झेप घेतली आहे. त्यांचा हा प्रवास शेतकऱ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. उद्योगाच्या पायऱ्या घरगुती स्तरावर निर्मिती १- मुंदडा कुटुंबाची नऊ एकर जमीन आहे. उद्योगाकडे त्यांचा अधिक अोढा राहिला. मुंदडा बंधूंचे वडील अशोककुमार यांचा किराणा मालाचा व्यापार होता. त्यांच्या निधनानंतर २००१ ते २००४ या काळात तो गोपाल यांनी चालवला. गोपाल यांच्या आई छायाताई घरगुती पद्धतीने मसाले तयार करून गावातच विक्री करायच्या. ग्राहकांना मसाल्यांची चव खूप आवडली. विविध समारंभ, कार्यक्रमांसाठी मागणी येऊ लागली. त्यानुसार मसाले तयार करुन दिले जाऊ लागले. मागणी वाढतच राहिली. या अनुषंगाने उद्योग म्हणूनच त्याकडे पाहावे, अशी कल्पना गोपाल यांनी मांडली. घरच्यांना ती पटली. २- सन २००४ मध्ये छाया महिला गृहउद्योग नावाने नोंदणी. घरच्या ६४ चौरस फुटाच्या जागेत मिरची कांडप यंत्र बसवून काळा आणि गरम अशा दोन प्रकारच्या मसाल्याची दररोज ५ ते १० किलो एवढी निर्मिती सुरू

३- शेजारील गावांपर्यंत या मसाल्यांची चव पोचल्याने तेथूनही मागणी येऊ लागली होती. त्या वेळी वाहनांची सुविधा नसल्याने गोपाल यांनी दोन वर्षे झरी परिसरातील गावागावांत सायकलवर फिरून मसाल्यांची विक्री केली.

४. ग्राहकांची पसंती आणि वाढती मागणी लक्षात घेऊन २००६ मध्ये उद्योगाचा विस्तार. (गावातच पाचशे चौरस फूट जागा घेतली). प्रदीप मसाले ब्रॅंडची नोंदणी. उद्योगाची वाढ

  • प्रदीप ब्रॅंड
  • काळा व गरम मसाला, सांबर मसाला, हळद, मिरची आणि धणे पावडर
  • दररोजचे उत्पादन ४०० किलोपर्यंत सुरू झाले.
  • हातानेच ५० ग्रॅम ते तीन किलो वजनाचे पॅकिंग करून विक्री
  • उत्पादन क्षमता वाढल्याने विक्री वाढविण्यासाठी दोन वाहने आणि एक दुचाकी घेतली.
  • परभणी, हिंगोली, नांदेड, जालना या चार जिल्ह्यांतील थेट किराणा व्यावसायिकांपर्यत मसाले पोच करणे शक्य झाले.
  • या बाबी झाल्या साध्य

  • गावातील दहा जणांसाठी रोजगारनिर्मिती
  • दिवसेंदिवस वाढती मागणी पाहता उत्पादनक्षमता वाढविणे आवश्यक होते. गावातील प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण कांतराव देशमुख यांनी जागा उपलब्ध करून दिली. सन २०१० मध्ये उद्योगाचे रामभरोसे रस्त्यावरील सहा हजार चौरस फुटांच्या जागेत स्थलांतर
  • दररोज ८०० ते एक हजार किलो मसालेनिर्मिती क्षमतेची यंत्रसामग्री बसविली.
  •   आजचा उद्योग दृष्टिक्षेपात

  • प्रदीप व झरीकर असे दोन ब्रॅंड, सुमारे २३ उत्पादनांची निर्मिती
  • सुरवातीला वार्षिक उलाढाल- एक लाख रुपये, आज- सहा कोटी. यंदाचे टार्गेट- आठ कोटी
  • वितरक- शंभरहून अधिक. मराठवाडा, विदर्भ व राज्यभर
  • वितरण व्यवस्थेसाठी आठ वाहने
  • दररोजचे उत्पादन व विक्री- ७००, एकहजार किलोपासून ते कमाल दोनहजार किलोपर्यंत
  • लवकरच निर्यातक्षम उत्पादन सुरू करणार. तशी क्षमता तयार केली.
  • जबाबदारी

  • गोपाल- मार्केटिंग, विक्री, वितरण व्यवस्था
  • धाकटे बंधू मंगेश- बी.टेक (फूड टेक्नालाॅजी)- त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या मोठी मदत. नवी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने सादर करण्यामध्ये आघाडी.
  • मसाले उत्पादननिर्मिती व कच्चा माल खरेदी
  • तांत्रिक ‘सपोर्ट’

  • प्रकल्पस्थान- झरी, २६ हजार चौरस फूट जागेत. अद्ययावत यंत्रसामग्रीने सज्ज. यंत्रांव्दारे उत्पादन निर्मिती व पॅकिंग.
  • अद्ययावत प्रयोगशाळा
  • उत्पादनांची झलक

  • कांदा पोहा इन्स्टंट मिक्स- उत्पादन व सुमारे २०० मिलि गरम पाणी यांच्या द्रावणातून अगदी दहा मिनिटांत पोहे खाण्यासाठी तयार होतात.
  • सुंठवडा, सुपारी विरहित मुखवास ही नवी उत्पादने
  • मसाले- काळा तसेच गरम, चिवडा, खिचडी, सांबार, दाल फ्राय, व्हेज ग्रेव्ही, मटन ग्रेव्ही, चिकन, शाही गरम, कांदा लसूण, चटपट मसाला, काळे वाटण,
  • अस्सल देशी स्वादाचा येस्सूर -बंगा मसाला,
  • मिरची, हळद व धणे पावडर.
  • त्यासाठी कच्चा मालाची खरेदी

  • शेतकरी- आले, लसूण, हळद आदीं
  • दालचिनी, शहाजिरे, कर्णफुले, खसखस- केरळ
  • कसुरी मेथी- मुंबई व राजस्थान
  • मिरची- आंध्र प्रदेशातील गुंटूर
  • गुणवत्ता टिकवण्यास कारणीभूत बाबी

  • घरचाच फॅब्रिकेशनचा व्यवसाय. त्यामुळे मसाले निर्मितीची यंत्रे घरीच तयार केली. ती विकत आणण्याचा खर्च वाचला.
  • आयएसओ ९००१-२०१५ हे मानांकन
  • कच्चा माल खरेदी केल्यानंतर व पक्का माल तयार झाल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेचे स्वतःच्या प्रयोगशाळेत पृथक्करण. त्यातून दर्जेदार निर्मिती.
  • गावातच प्रकल्प. त्यामुळे शहरातील अौद्योगिक खर्च वाचले. त्यामुळे दर्जा वाढवणे शक्य झाले.
  • उद्योगासाठी आवश्यक आत्मविश्वास, सचोटी, मेहनत, गुणग्राहकता, काळानुसार बदल हे गुण अंगी बाणवले.
  • गोपाल मुंदडा- ९४२१४५७०२५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com