agricultural success story in marathi, agrowon, islampur, valva, sangli | Agrowon

क्षारपड जमिनीत पॉलिहाऊसमध्ये हायड्रोपोनिक्स तंत्राने जरबेरा

अभिजित डाके
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील विकास साळुंखे यांची १४ एकर शेती आहे. मात्र जमीन क्षारपड असल्याने उत्पादन फार समाधानकारक मिळत नाही. मात्र साळुंखे यांची जिद्द अफाट आहे. ते सांगतात की आमचे कुटूंब शिक्षणाने परिपूर्ण आहे. मलाही नोकरी लागली असती. पण पहिल्यापासूनच आवड असल्याने शेतीच करण्याचा निर्णय घेतला. त्यात विविध प्रयोग करण्यास प्रारंभ केला. उसाला पर्याय म्हणून सुमारे २२ गुंठ्यांत पॉलिहाऊस उभारले. त्यात जरबेरा फूलशेती करून क्षारपड जमिनीतही आपण वेगळे काही करू शकतो अशी आशा निर्माण केली. यातही पुढे जाऊन हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञान वापरले.

सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील विकास साळुंखे यांची १४ एकर शेती आहे. मात्र जमीन क्षारपड असल्याने उत्पादन फार समाधानकारक मिळत नाही. मात्र साळुंखे यांची जिद्द अफाट आहे. ते सांगतात की आमचे कुटूंब शिक्षणाने परिपूर्ण आहे. मलाही नोकरी लागली असती. पण पहिल्यापासूनच आवड असल्याने शेतीच करण्याचा निर्णय घेतला. त्यात विविध प्रयोग करण्यास प्रारंभ केला. उसाला पर्याय म्हणून सुमारे २२ गुंठ्यांत पॉलिहाऊस उभारले. त्यात जरबेरा फूलशेती करून क्षारपड जमिनीतही आपण वेगळे काही करू शकतो अशी आशा निर्माण केली. यातही पुढे जाऊन हायड्रोपोनिक्‍स तंत्रज्ञान वापरले. सन २०१४ पासून वाफा पद्धतीने सुरू झालेली ही शेती आज हायड्रोपोनिक्स तंत्राने यशस्वी पुढे नेण्याचा प्रयत्न साळुंखे यांनी केला आहे. पूर्वी १० गुंठे क्षेत्र होते. नुकतेच २२ गुंठे केले आहे.

हायड्रोपोनिक्स तंत्राने जरबेरा शेती (ठळक बाबी)

 • प्रति १० गुंठ्यांच्या हिशोबाने
 • पूर्वी १० गुंठे क्षेत्र होते. नुकतेच २२ गुंठे केले आहे.
 • एकूण ७६०० पॉटस म्हणजेच रोपे.
 • सांगाडे तयार करून त्यावर पॉटस ठेवले. दोन ओळीतील अंतर अडीच फूट
 • प्रत्येक पॉटमध्ये ठिबकचा एक ड्रिपर
 • प्रति रोपाला वाढीच्या अवस्थेनुसार पाणी. यात दोन ते अडीच तासांचे चार टप्पे.
 • देशी गोमूत्र व दूध यांचा वापर
 • प्रति रोप फूल उत्पादन - पाच ते सहा प्रति महिना
 • महिन्याला एकूण फूल उत्पादन - अंदाजे ३५ ते ३६ हजार
 • जरबेरा पीक लागवडीनंतर पाच ते सात वर्षे राहू शकते. सध्या हायड्रोपोनिक्स तत्राचे दुसरे वर्ष सुरू आहे.
 • मिळणारा दर- प्रति फूल- एक रुपयापासून ते कमाल सात रुपये -
 • सरासरी दर- अडीच रुपये. खर्च ८० ते ९० पैसे प्रति फूल
 • सर्व फुले मुंबई मार्केटला पाठवली जातात.

हायड्रोपोनिक्स तंत्राचे होत असलेले फायदे

 • जमीन क्षारपड असल्याने मुळकूज रोगाचा मोठा प्रादुर्भाव होता. त्याला अटकाव करणे शक्य झाले.
 • प्रति पॉटला दोन ते अडीच किलो कोकोपीथचा वापर. ते वाळवून पुन्हा वापर शक्य.
 • उत्पादन चांगले येते. वाफा पद्धतीपेक्षा दीडपट ते दुप्पट
 • लागवड खर्चात बचत. पाण्याची बचत

गुंतवणूक- प्रति १० गुंठ्यांसाठी १६ लाख रुपये खर्च आला आहे.

संपर्क- विकास साळुंखे - ९९२३०७९८९९
 


फोटो गॅलरी

इतर पॉलिहाऊस पिके
हरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...
शेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...
निर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...पॉलिहाउसमधील गुलाब उत्पादन शेतकरी ः ज्ञानेश्वर...
पॉलिहाउसमधून घेतो दर्जेदार ढोबळी मिरचीतेरा एकर शेती असलेले भरत अाहेर २०१२ पासून...
क्षारपड जमिनीत पॉलिहाऊसमध्ये...सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा)...
हरितगृहामधील ढोबळी मिरचीवर्षभर सातत्याने, दर्जेदार आणि अधिक उत्पादन...
जिद्द, चिकाटीतून जीवनात फुलविले रंगजिद्द, चिकाटी व वेगळी वाट शोधण्याची वृत्ती असेल...