जळगावच्या भेंडीने मिळविले मुंबई, सुरतचे हमीचे मार्केट

मी बारमाही भेंडीचे उत्पादन घेतो. उन्हाळ्यात बाजारात भेंडी आणावी लागते. कारण सुरत येथील मागणी कमी असते. या काळात २० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. पावसाळ्यात ऑगस्टपर्यंत हाच दर १५ रुपये असतो. सप्टेंबरमध्ये मात्र मुंबई व सुरतमधून मागणी असते. व्यापारी थेट शेतातून भेंडीची उचल करतात. वाहतूक खर्च लागत नाही. -देवराम किसन माळी, पथराड, ता. धरणगाव
लाडली (ता. धरणगाव) येथे भेंडीची प्रतवारी करताना शेतकरी.
लाडली (ता. धरणगाव) येथे भेंडीची प्रतवारी करताना शेतकरी.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, जळगाव आदी तालुक्‍यांमध्ये भेंडीचे दर्जेदार उत्पादन शेतकरी घेत अाहेत. या भेंडीला मुंबई, सुरत (गुजरात) येथील बाजारात चांगली मागणी असते. अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकामुळे सुधारले अाहे. अलीकडे बाजारातील मागणी लक्षात घेता लागवड वेळापत्रकात बदल करून रसायन अंशमुक्त भेंडी उत्पादनासाठी शेतकरी प्रयत्न करू लागले आहेत. केळी, कापूस व भरताच्या वांग्यांसाठी प्रसिद्ध जळगाव जिल्ह्यातील गिरणा काठालगतच्या शेतकऱ्यांनी भेंडी पिकातून आपले अर्थकारण सुधारले आहे. भेंडीची बारमाही लागवड जिल्ह्यात होऊ लागली असून, वाशी (मुंबई)च्या बाजारात सतत वाहतूक सुरू असते. दिवाळीनंतर सुरत (गुजरात) येथेही मोठ्या खरेदीदारांच्या माध्यमातून भेंडी पाठवली केली जाते. भेंडीची लागवड करणारे टापू धरणगाव तालुक्‍यातील शेरी, धार, पथराड, पाळधी, रेल, एकलग्न, मुसळी, लाडली, वंजारी, झुरखेडा, टाकळी, भूलपाट, दोनगाव, भोकणी, जळगाव तालुक्‍यातील गिरणा व तापी नदीकाठावरील देवगाव, फुपणी, करंज या गावांत तर एरंडोलातील हिवरे, बोरगाव, आडगाव, भवरखेडे आणि पारोळा तालुक्‍यातील पळासखेडा भागात भेंडीची वर्षभर लागवड केली जाते. उन्हाळ्यात मुंबईसह स्थानिक बाजारपेठेत भेंडीचा पुरवठा होतो. दर व खरेदी एप्रिल व मे महिन्यादरम्यान धरणगाव व एरंडोल येथून प्रतिदिन २०० क्विंटल भेंडी खरेदीदारांच्या माध्यमातून मुंबईत येते. ते थेट शेतातून खरेदी करतात. सध्या धरणगाव, अंमळनेर, जळगाव येथील बाजारात भेंडीची आवक अधिक होते. जळगाव बाजार समितीत जून व जुलैमध्ये सरासरी १६ क्विंटल प्रतिदिन आवक झाली. सध्या प्रतिकिलो १५ ते २० रुपये दर मिळत आहे. एप्रिल व मेमध्ये दररोजजी आठ क्विंटल आवक झाली. त्या वेळी २० रुपये दर होता. दर्जेदार भेंडीला मागणी दिवाळीनंतर अधिक दर मिळू लागतो. मुंबई येथील मोठे खरेदीदार भेंडीची युरोप व ऑस्ट्रेलियात निर्यात करतात. तेथे रसायन अवशेषमुक्त भेंडीला मागणी आहे. मुंबई येथून बॉक्‍स पॅकिंगमधून ती पाठवली जाते. या बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भेंडी लागवडीचे वेळापत्रक बदलले अाहे. हिवाळ्यात अधिक भेंडी मिळावी यासाठी ऑगस्टमध्ये लागवड केली जाते. ती दिवाळीनंतर बाजारात येऊ लागते. मुंबई येथील मोठ्या खरेदीदारांना शेरी, पथराड, एरंडोल येथील खरेदीदार भेंडी पाठवितात. ठळक बाबी

  • रसायन अंशमुक्त भेंडी उत्पादनाचे प्रयत्न शेरी, रेल, लाडली, दोनगाव भागात शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. त्यामध्ये जैविक घटकांचा वापर वाढविला आहे.
  • भेंडी एकाच दिवशी तोडून मुंबई येथील एकाच व्यापाऱ्याला पाठविली जाते. त्यास किलोमागे तीन ते चार रुपये अधिकचे दर मिळतात.
  • एप्रिल व मे यादरम्यान प्रतिदिन १००० क्विंटल तर जून व जुलैमध्ये प्रतिदिन दीड हजार क्विंटल भेंडीचा पुरवठा धरणगाव, एरंडोल व जळगाव तालुक्‍यात मिळून होतो. सप्टेंबरपासून सुरत व मुंबई येथून मागणी वाढते. त्या वेळेस हाच पुरवठा १८०० क्विंटलपर्यंत पोचतो. यातील कमाल भेंडीची निर्यात सुरत व मुंबई येथे केली जाते.
  • भेंडी तोडण्यासाठी हिवाळा व उन्हाळ्यात मजूर पुरेसे मिळतात. परंतु पावसाळ्यात ते फारसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे २०० रुपये प्रतिदिन मजुरी या काळात द्यावी लागते.
  •  सरासरी दर प्रतिकिलो (जळगाव बाजार समिती)

  • सन २०१६ - २० रु.
  • २०१७ - २४
  • यंदा जानेवारी ते जून - २० रु.
  • बाजार समितीमधील काही व्यापारी बारमाही थेट शेतकऱ्याकडून भेंडी खरेदी करतात. तेजी किंवा मंदी असली तरी २० रुपये कराराचा दर ठरला आहे. फक्त भेंडीचा दर्जा नेहमी चांगला हवा अशी अट असते.
  • भेंडीला पसंती कशासाठी? भेंडीला लागवडीसाठी एकरी तीन हजार रुपयांचे बियाणे लागते. दिवसा आड ६० ते ७० तोडे होतात. त्यासाठी प्रतिदिन किमान ७५० रुपये मजुरी लागते. एकरी सुमारे २० क्विंटल उत्पादन मिळते. साधारण चार महिन्यांत क्षेत्र रिकामे होते. कमी कालावधीचे व बऱ्यापैकी दर देणारे पीक म्हणून शेतकरी भेंडीला पसंती देतात. धरणगावच्या पूर्व व मध्य भागात उन्हाळ्यात काही शेतकऱ्यांकडे सिंचनाचे कृत्रीम स्रोत आटतात. त्यामुळे उन्हाळ्यात भेंडी कमी उपलब्ध होते. गिरणा काठावरील गावांमध्ये म्हणजेच जळगाव तालुका, धरणगाव तालुक्‍यातील काही ठिकाणी आठवडी बाजारात भेंडीची बारमाही आवक सुरू असते. ग्राहकांना टवटवीत, ताजी भेंडी उपलब्ध होते. प्रतिक्रिया भेंडीला कायम मागणी असते. अलीकडे रासायनिक खते व कीडनाशके यांचा कमी वापर करायला सुरवात केली आहे. सेंद्रिय भेंडीला मागणी अधिक आहे. -शंकर पीतांबर सोनवणे, देवगाव, ता. जळगाव संपर्क- अनिल सपकाळे - ९७६४८९७३४३ करंज (जि. जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com