संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी ग्रामस्वच्छतेचं प्रबोधन

शेतकरी जगला तर जग जगेल नागटिळक शेतीचीही जबाबदारी पाहतात. त्यांच्या पत्नी सौ.अनिता, मुलगा दत्तप्रसाद आणि मुलगी सुकन्या यांनाही पित्याचं हे गाडगेबाबांचं रूप आवडत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांविषयी ते गावच्या कारभाऱ्यांना सांगतात की शेतकरी वाचवा असादेखील संदेश देण्याची वेळ आली आहे. या देशाचा अन्ननिर्माता संपला तर लोक उपाशी मरतील. शेतकऱ्याला कमी लेखू नका. शेतकरी जगला तर जग जगेल.
संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी ग्रामस्वच्छतेचं प्रबोधन
संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी ग्रामस्वच्छतेचं प्रबोधन

संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही ग्रामस्वच्छतेचा प्रसार किंवा प्रबोधन प्रभावीपणे करणे शक्य होते. सोलापूर जिल्ह्यातील खैराव (ता. माढा) येथील फूलचंद नागटिळक हे अल्पभूधारक शेतकरीदेखील गाडगेबाबा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या शिकवणींचा प्रसार गावोगावी करीत आहेत. अशा प्रकारच्या लोकजागरातूनच ग्रामविकासाची चळवळ पुढे वाटचाल करीत राहील असे त्यांचे म्हणणे आहे. राज्याच्या ग्रामविकासात प्रबोधनकर्त्यांचं कार्य अतुलनीय आहे. ग्रामविकासालाच देशसेवा मानणारे संत आपल्याकडे होऊन गेले. त्यात मग गावकऱ्यांचं आयुष्यभर प्रबोधन करणारे संत तुकडोजी महाराज असोत, की स्वच्छतेचा मूलमंत्र देत आपलं जीवन ग्रामविकासाला समर्पित करणारे संत गाडगेबाबा असोत. संतांच्या विचारांचा भक्कम आधार घेतल्याशिवाय गावच्या प्रगतीला दिशा मिळत नाही. राज्य शासनाच्याही ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळेच सध्या राज्यभर सुमारे अडीचशे कलावंतांची पथके गावोगावी जात आहेत. संतविचार तसेच लोककलांमधून ग्रामस्वच्छतेचा आग्रह धरीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील खैराव (ता. माढा) येथील फूलचंद नागटिळक हा ४९ वर्षे वयाचा अल्पभूधारक शेतकरी देखील गाडगेबाबा यांच्या वेषात असाच राज्यभर लोकजागर करीत फिरत आहे. गाडगेबाबांचे अस्सल भक्त "फाटका वेष, हाती खराटा आणि डोक्यावर गाडगं असा माझा अवतार पाहून लोक मला काही वेळा वेगळ्या नजरेने बघतात. पोलिसही काही वेळा हटकतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की, मी गाडगेबाबा यांचा अस्सल भक्त अाहे. त्यांचे विचार मी नुसते सांगत नाही. तर रस्ते झाडतो. लोकांचं प्रबोधन करून त्यांच्यासारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आहे असं नागटिकळ सांगतात. सध्या ते पंढरपूरच्या वारीत असून गावोगावी लोकांचं रसाळ वाणीतून प्रबोधन करीत आहेत. कलेवर प्रेम करणारा हाडाचा शेतकरी मी हाडाचा शेतकरी आहे. माझे वडील शेती करायचे. माझ्यातही शेतीचे संस्कार झाले आहेत. मात्र शेतकरीपुत्राबरोबरच मी कलावंत देखील आहे. नटसम्राट या प्रसिद्ध नाटकातील तात्यासाहेब बेलवलकर हे पात्र माझ्या रोमारोमात भिनले आहेत. आत्तापर्यंत नटसम्राट नाटकाचे मी चार हजार ५९१ प्रयोग केले आहेत. महाबळेश्वर, बेळगाव, अंदमान, हैदराबादपर्यंत माझे प्रयोग झाले. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. सन १९९० मध्ये आठवीत असताना पहिली कविता लिहिली. कलेवर माझं खूप प्रेम. पण शेती आणि उदरनिर्वाहासाठी बारावीनंतर शिक्षण सोडणं भाग पडलं. पुढे शिकता आलं नसलं तरी पुस्तके भरपूर वाचतो. सर्वगुणसंपन्न होण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करण्याचं आवाहन मी गावोगावी करतो असे नागटिळक सांगतात. त्याचवेळी कवितेच्या काही पंक्ती गुणगुणून दाखवतात. पावसानं बघा धरावा जोर शाळात गेली लाडकी पोरं कर्जाचा बोजा आहे उताऱ्यावर कष्ट करून जीव झाला बेजार लागी जिवाला घोर मात्र शिकवावच लागणार आपली ही हुशार पोरं नटसम्राट ही ग्रामीण भागातील व्यथा फूलचंदजी लहानपणीदेखील छोट्या भूमिका करायचे. मी शाळेतून पळून जाऊन एकदा नटसम्राट नाटक पाहिले. तेव्हापासून मला त्यातील आप्पासाहेब या भूमिकेने घेरलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील हजारो आई-वडिलांची व्यथा म्हणजे नटसम्राट आहे. त्यामुळे मी नटसम्राटचे एकपात्री प्रयोग करू लागलो. सन १९९७ मध्ये ज्येष्ठ साहित्यिक व कवी कुसुमाग्रज यांना भेटलो. तुमचे प्रयोग पुण्यातील बालगंधर्व मंदिरापासून अमेरिकेपर्यंत होतात. पण राज्याच्या खेडेगावाला नटसम्राट कळावा म्हणून ग्रामीण भागात तुमच्या नाटकाचे प्रयोग करतो आहे असे तात्यासाहेबांना सांगताच त्यांना आश्चर्य वाटले. तुझं काम सुरू ठेव असे आशीर्वाद त्यांनी दिले अशी आठवण नागटिळक सांगतात. आधुनिक शेती करा, पाणी, लेक वाचवा सन २००६ मध्ये सोलापूर येथील साहित्य संमेलनात नागटिळक यांना गाडगेबाबा यांची वेषभूषा केलेला एक कलावंत दिसला. त्याचवेळी गाडगेबाबा म्हणून वावरण्याचा संकल्प केला. लोक मला स्विकारतील का, ते वेडयातही काढतील असे किती तरी प्रश्न डोक्यात येत होते. दोन वर्षे चिंतन केले आणि मग त्यात भूमिकेत वावरण्याचं ठरवलं. बाबांच्या रूपाने खेडेगावात गावकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. आधुनिक शेती करा, लेक वाचवा, पाणी वाचवा, ग्रामस्वच्छता अशा मुद्द्यांवर गावकऱ्यांचं प्रबोधन करतो असे ते सांगतात. मनाचीही मशागत करा नागटिळक एरवी शेतीच करतात. त्यांच्या पत्नी सौ.अनिता, मुलगा दत्तप्रसाद आणि मुलगी सुकन्या यांनाही पित्याचं हे गाडगेबाबांचं रूप आवडत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांविषयी ते गावच्या कारभाऱ्यांना सांगतात की शेतकरी वाचवा असादेखील संदेश देण्याची वेळ आली आहे. या देशाचा अन्ननिर्माता संपला तर लोक उपाशी मरतील. शेतकऱ्याला कमी लेखू नका. शेतकरी जगला तर जग जगेल. पंढरपूरच्या वारीतदेखील ते शेतकऱ्यांशी संवाद साधतात. तुम्ही शेताची जशी मशागत करतात तशी मनाचीदेखील मशागत करा. मन स्वच्छ ठेवा, असा संदेश ते देतात. चिंब पावसात निघालेल्या दिंडीत पावसाचं जोरदार स्वागत करीत पुन्हा ग्रामस्वच्छतेचा संदेश देतांना ते गातात... बरसतात सरीवर सरी चिंब भिजला माझा वारकरी होऊ देत किती तारांबळ दूर व्हावा दुष्काळ साहित्यातून संवाद वारीमध्ये नागटिळक यांनी चौदा अभंगांची रचना केली असून ‘पंढरीच्या वाटेवर’ या नावाने २५ अभंगांचं पुस्तक ते प्रसिद्ध करणार आहेत. मायभूमी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह अाहे. ग्रामीण साहित्याशी नाळ जुळलेले नागटिळक अनेक वर्षांपासून आपल्या खैराव गावात छोटे ग्रामीण साहित्य संमेलनदेखील भरवितात. विठ्ठल हा शेतकऱ्यांचा देव विठ्ठल हा आम्हा शेतकऱ्यांचा खरा देव. त्याच्या भेटीसाठी हजारो दिंड्या चंद्रभागेच्या तिराकडे वाटचाल करीत आहेत. त्यांच्याबरोबर नागटिळक देखील गावच्या आणि मनाच्या स्वच्छतेसाठी गावोगावी विचारांचा प्रसार करण्यासाठी फिरत आहेत. गाडगेबाबा जसे रीतीरिवाजांवर कोरडे ओढून नितीव्यवहारांचा आग्रह धरीत असत. तशीच कठोर भूमिका नागटिळक व्यक्त करतात. ते म्हणतात विठ्ठला तुझ्या भेटीसाठी नाही केला आटापिटा नीतीमत्ता विकून नाही मिळवायच्या आम्हाला नोटा संपर्क- फूलचंद नागटिळक - ८८०५५००२०८  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com