तीनच एकरांत २० प्रकारचा भाजीपाला

जोखीम केली कमी भाजीपाल्याचे दर सतत चढउतार दाखवतात. अनेकवेळा कवडीचीही किंमत मिळत नसल्याचा वाईट अनुभव येतो. त्यामुळे कोणत्याही एका भाजीवर विसंबून राहायचे नाही हे सूत्र पंचवीस वर्षांपासून कायम ठेवले आहे
भाजीपाला शेतीत आप्पासाहेब पाटील यांना पत्नी सौ. जयश्री यांची साथ आहे.
भाजीपाला शेतीत आप्पासाहेब पाटील यांना पत्नी सौ. जयश्री यांची साथ आहे.

शेती केवळ तीन एकर. मात्र त्यातील उसात आंतरपीक तसेच स्वतंत्र असा दोन्ही पद्धतीने वर्षभर सुमारे २० प्रकारचा भाजीपाला. कोणताही माल व्यापाऱ्याला न देता थेट ग्राहक विक्री. अगदी थोडे क्षेत्र असूनही त्याचा पुरेपूर वापर करून त्यातूनच शेतीचे अर्थकारण बळकट करणाऱ्या आप्पासाहेब पांडूरंग पाटील (मौजे सांगाव, जि. कोल्हापूर) यांचे शेतीचे छोटेखानी मॉडेल अभ्यासण्यासारखे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे सांगाव (ता. कागल) हा भाग उसासाठी तसेच विविध भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील आप्पासाहेब पांडूरंग पाटील हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांची एकूण शेती केवळ तीन एकर. पण शेतकरी हिंमतवान व प्रयत्नशील असेल तर क्षेत्राचा अडसर त्याला येत नाही. पाटील यांच्याबाबत हेच म्हणावे लागेल. त्यांनी अत्यंत हुशारीने एकूण जागेच्या पुरेपूर इंचाचा वापर केला. त्यातून उत्पन्न कमावण्याचा प्रयत्न केला. असे आहे पाटील यांचे छोटेखानी मॉडेल

  • क्षेत्र तीन एकर
  • ऊस
  • एक एकर
  • लागवडीच्या उसात
  • जून ते सप्टे-आॅक्टो.- विविध आंतरपिके
  • उदा. वांगी, मिरची, कोबी, फ्लाॅवर
  • उन्हाळी हंगाम

  • सलग क्षेत्रावर भाजीपाला, मिश्र पध्दतीने, थोड्या थोड्या गुंठ्यात
  • खोडवा उसात- भेंडी, तीळ, अंबाडी आदी आंतरपिके

  • अन्य- हंगामानुसार- दोडका, कारली, कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक, तांदळी,
  • वर्षभरातील एकूण भाजीपाला पिके - सुमारे २० ते २५
  • शेतीची वैशिष्ट्ये

  • सरीच्या बोदावर ठिबक सिंचन करून भाजीपाला. त्यानंतर एक महिन्यात आडसाली उसाची लागवड
  • उसाची भरणी झाली की प्लॉट बदलला जातो.
  • शेत तयार करताना शेणखताचा वापर. मेंढ्याही शेतात बसविल्या जातात.
  • भाजीपाला पिकात रासायनिक खतांचा कमी वापर. निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काची फवारणी
  • विहिरीला मुबलक पाणी असले तरी भाजीपाल्यांसाठी ठिबकचाच वापर
  • ऊस बनले दुय्यम पीक कोल्हापूर जिल्ह्यात उस प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. भाजीपाला पिके दुय्यम म्हणून घेतली जातात. पण पाटील यांचे सूत्र वेगळे आहे. उसातील उत्पन्नापेक्षा त्यांनी भाजीपाल्यातून येणाऱ्या उत्पन्नाला प्राधान्य दिले. उसाचे त्यांचे उत्पादन गुंठ्याला दीड ते दोन टन इतके आहे. ऊस व भाजीपाल्याचा फायदेशीर मेळ त्यांनी शेती करताना घातला आहे. पाटील यांच्या यशातील मुद्दे  भाजीपाल्यांत विविधता भाजीपाल्याचे दर सतत चढउतार दाखवतात. अनेकवेळा कवडीचीही किंमत मिळत नसल्याचा वाईट अनुभव येतो. त्यामुळे कोणत्याही एका भाजीवर विसंबून राहायचे नाही हे सूत्र पंचवीस वर्षांपासून कायम ठेवले आहे. संकरीत व देशी अशीही काही पिकांची लागवड. एकाचे दर घसरले तरी अन्य दोन भाज्या पैसे देऊन जातात. निष्कर्ष - शेतीतील जोखीम कमी केली कायम थेट विक्रीच कोणताही माल व्यापाऱ्याला द्यायचा नाही. तर तो थेट विकायचा हे सूत्र ठेवले. त्यामुळे मध्यस्थांकडे जाणारा पैसा स्वतःकडे आला. आठवडी बाजारात हातविक्रीचे नियोजन

  • दर रविवारी कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपूरी -
  • सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार या दिवशी कागल येथे दोन बाजार
  • गरज भासल्यास जवळच्या हुपरी गावातील आठवडी बाजार
  • दररोज ५०० ते १००० रुपयांचे एकूण उत्पन्न
  • निष्कर्ष - नफ्याचे मार्जिन वाढले मेहनत

  •  पाटील पती-पत्नी (सौ. जयश्री), आई-वडील (पांडूरंग व सौ. केराबाई) व भावजय असे शेतीत काम करतात.
  • साहजिकच श्रमांची विभागणी होते. त्यावरील ताण कमी होतो.
  • मजूरखर्च कमी होतो.
  • दररोज माल काढणीनंतर त्याची प्रतवारी. वेगवेगळ्या पिशव्या, बुट्या यातून शेतमाल तयार ठेवला जातो.
  •  टू व्हीलर किंवा प्रसंगी फोर व्हीलरमधून भाजीपाला बाजारात नेला जातो.
  • ताजा व दर्जेदार मालामुळे बाजारात त्वरित खप होऊ जातो.
  • मालाचा दर्जा व मार्केटिंग

  • मोठा, मध्यम व लहान आकार अशा तीन पद्धतीत मालाची प्रतवारी
  • मांडणी आकर्षक. त्यामुळे ग्राहक पटकन खरेदी करतो.
  • पंचवीस वर्षांत ग्राहकांची मानसिकता अोळखल्याने त्यादृष्टीने विक्री व्यवस्थेचे नियोजन
  • पडवळाची लिम्का बुक रेकॉर्ड मध्ये नोंद सन २००८ मध्ये पाटील यांनी ८ फूट दोन इंच लांबीच्या घेतलेल्या पडवळाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली. महाराष्ट्र शासनाच्या शेतीनिष्ठ पुरस्काराबरोबरच विविध पीक स्पर्धांमध्ये त्यांनी लक्षणीय यश मिळविले आहे. शेतीत उल्लेखनीय करियर पाटील यांनी एम. कॉम केल्यानंतर नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. स्पर्धा परीक्षाही दिल्या. पण काही वर्षे प्रयत्न केल्यानंतर यात अपयश आले. पण भाजीपाला शेतीत यशस्वी करिअर केले. फौजदार होण्याची इच्छा होती. पण आज शेतीत प्रगतशील अशी अोळख मिळवली. कागल तालुका ‘आत्मा’ समितीचे ते अध्यक्ष आहेत. एकेकाळी बसच्या पाससाठी पैसे नाहीत म्हणून झगडणाऱ्या पाटील यांच्याकडे आजमितीला दोन चारचाकी वाहनांसह अन्य दुचाकी वाहने आहेत. दोन गायी व म्हैसही आहे. टुमदार घरही उभे केले. वकिली व्यवसाय करणारे बंधू आनंदराव यांची मोठी साथ आहे. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे सर्वांना एकमेकांचा मोठा आधार असल्याचे पाटील सांगतात.

    संपर्क- आप्पासाहेब पाटील - ९४२०१३४६०२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com