वीस गुंठ्यांत ‘एक्साॅटीक' भाजीपाला शेतीतील यश

परदेशी भाजीपाला किंवा त्यातील अनेक भाज्या आपल्याकडील ग्राहकांना नव्या आहेत. त्यामुळे त्यांची बाजारपेठ फार मोठी नाही. मात्र ज्यांना हा प्रकार माहित आहे त्यांना अनेकवेळा या भाज्या उपलब्धच होत नाहीत असेही आहे. मार्केटची मागणी अोळखून आपण त्यात टिकून राहणे महत्त्वाचे असते. -ज्ञानेश्वर शेंद्रे
आपल्या शेतातील दर्जेदार झुकीनी दाखविताना ज्ञानेश्वर शेंद्रे
आपल्या शेतातील दर्जेदार झुकीनी दाखविताना ज्ञानेश्वर शेंद्रे

जालना जिल्ह्यातील साष्टे पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर शेंद्रे यांनी बाजारपेठेतील मागणी अोळखून एक्सॉटीक म्हणजेच परदेशी भाजीपाला शेतीची वेगळी वाट शोधली. गेल्या पाच वर्षांपासून त्यात सातत्य ठेवले आहे. मुख्य म्हणजे अौरंगाबाद शहरातील होटेल्स, मॉल्स या बाजारपेठा शोधून त्यांनी उत्पादनाबरोबरच विक्रीव्यवस्थाही सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. जालना जिल्ह्यातील साष्टे पिंपळगाव (ता. अंबड) येथील ज्ञानेश्वर शेंद्रे यांनी पंचक्रोशीत एक्सॉटीक अर्थात परदेशी भाजीपाला शेतीत आपली नवी अोळख तयार केली आहे. वास्तविक या वेगळ्या मार्गाने जाणाऱ्या शेतीचा शोध त्यांना ॲग्रोवनमुळेच लागला. त्यातील यशकथेद्वारे परदेशी भाजीपाला शेतीविषयी त्यांना समजले. पंचतारांकीत हॉटेल्स, मॉल्समध्ये या मालाला मागणी असते. चांगला दरही घेण्याची संधी असते याची कल्पना आली. नव्या वाटेवरची शेती होमवर्क

  • परदेशी भाजीपाला शेतीसाठी जमीन, पाणी, हवामान या गोष्टींची अनुकुलता जाणून घेतली.
  • पुणे येथे या शेती तंत्राचे दोन दिवसांचे प्रशिक्षण घेतले.
  • बाजारपेठांचा अभ्यास केला.
  • ज्ञानेश्वर यांची सुमारे दोन हेक्‍टर शेती आहे. पैकी वीस गुंठ्यांत लागवडीचे नियोजन केले.
  • अत्यल्प क्षेत्र निवडीमागे या उत्पादीत मालाला जवळ सक्षम बाजारपेठ नसल्याची जाणीव हे मुख्य कारण होते. मात्र घेतलेल्या माहितीचा उपयोग एक प्रयोग म्हणून करून त्याचे मार्केटींग स्वत: करण्याचा निर्धार पक्का होता.
  • क्षेत्राचे नियोजन

  • वर्षभर रोटेशन पद्धतीने विविध पिके उदा.
  • लीक ५ गुंठे
  • झुकीनी ग्रीन २ गुंठे
  • झुकीनी यलो २ गुंठे
  • बेबी कॉर्न १ गुंठा
  • रेड कॅबेज ४ गुंठे
  • ब्रोकोली ५ ते ६ गुंठे
  • मार्केट शोध उत्पादनाएवढेच विक्रीलाही महत्त्व होते. त्यादृष्टीने औरंगाबाद शहर गाठून तेथील काही तारांकीत हॉटेल्स, मॉलमध्ये भेट देण्यास सुरवात केली. त्यात सुरवातीला अनेक अडचणी आल्या. परंतु ,त्यातून मार्ग काढताना अनेक व्यक्‍तींशी ओळखी झाल्या. त्यातूनच मालाला मागणी निर्माण करण्यात काही अंशी यश मिळाले. त्यामुळेच आठवड्यातून किमान दोन वेळा मागणीनुसार मालाचा पुरवठा काही व्यापाऱ्यांकडे तसेच हॉटेल्स व मॉल्समध्ये करीत असल्याचे शेंद्रे सांगतात. प्रयत्नातून मिळालेल्या यशाची शिदोरी सोबत घेऊन मुंबई व अन्य ठिकाणीही मागणी निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू अाहेत. अशी आहे परदेशी भाजीपाला शेती

  • साधारणपणे ब्रोकोलीची लागवड सप्टेबरनंतर
  • रेड कॅबेज, चायनीज कॅबेज, झुकीनी, लीक यांची लागवड तशी कधीही मात्र मार्केटची मागणी अोळखून करता येते असा शेंद्रें यांचा अनुभव सांगतो.
  • यातील बहुतांश पिके ९० ते १०० दिवस कालावधीची आहेत. झुकीनीचे उत्पादन साधारण ४५ दिवसांनंतर लीक साडेचार महिन्यांनंतर काढणीसाठी तयार होतो.
  • उत्पादन

  • ब्रोकोली २०० ते ३०० किलो-  क्षेत्र ४ ते ५ गुंठे
  • लीक - साधारण ७०० किलो ते त्यापुढे- पाच गुंठे
  • झुकीनी यलो व ग्रीन- ३५० ते ४०० किलो- ८०० झाडे
  •  रेड कॅबेज (एकवेळ घेतले)-३०० किलो क्षेत्र- -४ गुंठे
  • चायनीज कॅबेज (एकवेळ घेतले)- २०० किलो- २ गुंठे
  • पाच वर्षांतील दरांचा अनुभव (प्रति किलो)

  • ब्रोकोली - ५० ते २०० रु.
  • लीक - ६० ते १२५ रु.
  • झुकीनी एलो व ग्रीन - ६० ते १०० रु.
  • रेड कॅबेज - २० ते ६० रु.
  • चायनीज कॅबेज - ७० ते १०० रु.
  • बेबी कॉर्न - ५० ते १४० रु.
  • घसरणारे दर वरील दर प्रत्येकवेळी असेच मिळतील याची हमी नसते. सप्टेंबर, आॅक्टोबर हा काळ दरांसाठी अनुकूल असतो. मात्र त्यापुढे अन्य शेतकऱ्यांकडून आवक वाढली किंवा मार्केटमधील मागणी घटली की दरांवर परिणाम होतात. काही वेळा हे दर किलोला १०, २०, ३० रुपये इतकेदेखील खाली येतात. अशावेळी नुकसान निश्चित होते. बियाणे, खते, खुरपणी, फवारणी, काढणी किंवा तत्सम मिळून खर्च वगळता २० गुंठ्यांतून सुमारे ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याची संधी असते. या शेतीव्यतिरीक्‍त शेंद्रे ऊस, डाळिंब आदी पिकेही घेतात. संपर्क- ज्ञानेश्वर शेंद्रे - ९८६०५५९५२५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com