agricultural success story in marathi, agrowon, SOIL WATER CONSERVATION | Agrowon

पाणलोट क्षेत्रानुसार जलसंधारण आवश्‍यक
अतुल अत्रे, उज्ज्वला दांडेकर
मंगळवार, 3 एप्रिल 2018

जलसंधारण ही संकल्पना राबविताना प्रत्येक पाणलोट क्षेत्राचा व्यवस्थित अभ्यास करावा. पाणलोट क्षेत्रातील अपधाव, जमिनीची धूप इत्यादी बाबतींतील निरीक्षणांची नोंद ठेवणे आवश्‍यक आहेत. या नोंदीनुसार जलसंधारणाच्या कामात योग्य ते बदल करावेत.  

पाणलोट क्षेत्रावरील जलसंधारणासाठी करावयाच्या ओघळीवरील उपचारात सिमेंट नाला बांध, शेततळे, पुनर्भरण चर, शेततळे, वळण बंधारा या रचनाही उपयुक्त ठरतात. आपली जमीन, तिची रचना, शेतीची विभागणी याबाबींचा विचार करून जलसंधारण रचनांची निर्मिती करावी.

सिमेंट नाला बांध
 जागेची निवड :

जलसंधारण ही संकल्पना राबविताना प्रत्येक पाणलोट क्षेत्राचा व्यवस्थित अभ्यास करावा. पाणलोट क्षेत्रातील अपधाव, जमिनीची धूप इत्यादी बाबतींतील निरीक्षणांची नोंद ठेवणे आवश्‍यक आहेत. या नोंदीनुसार जलसंधारणाच्या कामात योग्य ते बदल करावेत.  

पाणलोट क्षेत्रावरील जलसंधारणासाठी करावयाच्या ओघळीवरील उपचारात सिमेंट नाला बांध, शेततळे, पुनर्भरण चर, शेततळे, वळण बंधारा या रचनाही उपयुक्त ठरतात. आपली जमीन, तिची रचना, शेतीची विभागणी याबाबींचा विचार करून जलसंधारण रचनांची निर्मिती करावी.

सिमेंट नाला बांध
 जागेची निवड :

 •  पाणलोट क्षेत्र ४० ते १००० हेक्‍टरपर्यंत असावे.
 •  नाल्याच्या तळाचा उतार ३ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये.
 •   नाल्याच्या तळापर्यंत खोली कमीत कमी २ मीटर असावी.
 •  बांधाच्या व पाणीसाठ्याच्या भागामध्ये विजेचे खांब तसेच उच्च दाबाच्या तारा असू नयेत.
 •  सिमेंट नाला बांधामध्ये गाळ भरू नये, यासाठी वरील भागात प्रथम गाळ प्रतिबंधक कामे पूर्ण झालेली असावीत.

शेततळे  
शेततळ्याचा उद्देश भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठविणे व त्याचा उपयोग जलसिंचनासाठी करण्यासाठी होतो. ज्या ठिकाणी सहजासहजी विहीर खोदणे शक्‍य नाही, त्या ठिकाणी शेततळे लाभदायक ठरते.

जागेची निवड

 •  काळी व चिकणमातीचे प्रमाण जास्त असणारी जमीन निवडावी. मुरमाड, वालुकामय सच्छिद्र खडक अशी जमीन शेततळ्यास घेऊ नये.
 •  शेततळ्याभोवतालची जमीन दलदल होईल, अशा ठिकाणी शेततळे घेऊ नये.
 •  जमिनीचा उतार ३ टक्केपर्यंत असला तरीही चालू शकेल.

पुनर्भरण चर  
पाणी अडवून जमिनीमध्ये पाणी पुनर्भरणाची प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी पुनर्भरण चर वापरण्यात येतात. पुनर्भरण चरामुळे पाण्याचे स्रोत कायम होण्यासाठी मदत होते.

जागेची निवड

 •  पुनर्भरण चर हा पाण्याच्या स्रोतापासून वरील बाजूस जास्तीत जास्त १०० मीटर अंतरावर असावा.
 •  नाल्याची रुंदी कमीत कमी १० मीटर असावी.
 •  पुनर्भरण चर हा नाला पात्रात खोदावयाचा असल्याने नाल्याच्या तळात  ४ ते ५ मीटरपर्यंत कच्चा मुरूम असावा.
 •  पुनर्भरण चराची लांबी आवश्‍यकतेनुसार २० ते ३० मीटरपर्यंत ठेवावी.

वळण बंधारा  
नाल्यामधून वाहणारे पाणी पाटाद्वारे शेतात वळविण्यासाठी नाला पात्रामध्ये जो सिमेंट बांध घातला जातो, त्यास वळण बंधारा असे म्हणतात. नाला बांधामुळे पिकांना उपलब्ध असलेल्या पाण्यात वाढ झाल्यामुळे भीज क्षेत्रात वाढ होते, पर्यायाने उत्पादनात वाढ होते.

जागेची निवड

 •  ज्या नाल्याला नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत किमान १५० लिटर/ सेकंद एवढा पाणी प्रवाह आहे, अशा नाल्याची निवड करावी.
 •  नाल्याची खोली ३ मीटरपेक्षा जास्त नसावी.
 •  नाल्याची रुंदी ३० मीटरपेक्षा जास्त नसावी.
 •  पाणलोट क्षेत्र ५०० हेक्‍टरपेक्षा कमी असावे.

 : अतुल अत्रे, ९८६०५९३८३६
(डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि. नगर )

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...