मुर्सिया भागातील अत्यंत काटेकोर नियोजन असलेली दर्जेदार द्राक्षबाग
मुर्सिया भागातील अत्यंत काटेकोर नियोजन असलेली दर्जेदार द्राक्षबाग

पेटेंडेट द्राक्षवाण, अन्नद्रव्ये, रसायनांचा काटेकोर वापर

पेटेंटेड जातींची गरज दौऱ्यात सहभागी प्रयोगशील शेतकरी गणेश मोरे म्हणाले की आपल्याकडे थॉमसन वाणावर अधिक भर आहे. त्याला ‘नॅचरल थिनिंग’ मिळत नाही. स्पेनमधील द्राक्षजाती पेटेंटेड आहेत. त्यांना ‘नॅचरल थिनिंग’ असल्याने ते स्वतंत्र करण्याची गरज भासत नाही. मण्यांचा आकार वाढवण्यासाठी ‘स्प्रे’ घेतले जात नाहीत. त्यामुळे मजुरी, पैसा यांची बचत होते. इटालीयासारख्या बिया असलेले वाण देशाची स्थानिक गरज अोळखून घेतात. अन्य देशांतील पेटेंटेड जाती भारतात आणणे ही काळाची गरज झाली आहे.

दौऱ्यात सहभागी शेतकऱ्यांना मुर्सिया व अॅलिकॅंटे भागातील द्राक्ष बागायतदारांची शेती जवळून अभ्यासता आली. सूक्ष्म बारकावे टिपण्यात व चपलख प्रश्न विचारण्यात आपले शेतकरी वाकबगार होते. जाणवलेली महत्त्वाची निरीक्षणे. मुर्सिया प्लाॅट

  • प्रत्येक झाडाच्या खोडाला खाली निळ्या रंगाचे गोल आच्छादन. येथे सशांची समस्या आहे. त्यांना रोखण्यासाठी तसेच वॉटरशूटस येऊ नयेत व तणनाशक फवारल्यास खोडाला इजा होऊ नये यासाठी या पद्धतीचा वापर.
  • वर्षातून नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये एकदाच छाटणी. आॅगस्टमध्ये हार्वेस्टिंग.
  • अतिथंडीचा कालावधी (चिलिंग डेज) अत्यंत कमी. हिवाळा खूप कमी, उन्हाळा जास्त.
  • शून्याखाली काही दिवस तापमान जाऊ शकते.
  • लोह, झिंक आदींच्या कमतरता असल्यास चिलेटेड स्वरूपात वापर. (ईडीटीए किंवा ईडीडीएचए रूपात)
  • कॅल्शियम फोलियरद्वारे. (चार ते पाच वेळा). मॅग्नेशियमची गरज फारशी भासत नाही. झिंक वर्षातून दोन वेळा.
  • फॉस्फोरिक ॲसिड दिले जात नाही. कारण इथल्या मातीत कॅल्शियम आहे. हे ॲसिड मातीतील ‘बायकार्बोनेटस’ना ‘रिलीज’ करते. त्यामुळे मातीचा पीएच नऊपर्यंत वाढतो.
  • सेंद्रिय घटक दर तीन वर्षांनी. वीस किलो प्रतिझाड. लेंडीखताचा मुख्य वापर.
  • सेंद्रिय कर्ब दोनपेक्षा अधिक नेणे तसे अवघड. द्राक्षासाठी तो एक टक्क्यापर्यंत असणे योग्य, असे चर्चेतून निष्पन्न.
  • टिमसन वाणात इथेफॉनचा वापर नाही. युरोपात त्याच्या वापरासच बंदी.
  • प्रतवारीनुसार दर. मालाचे ‘रिजेक्‍शन’ नाही. द्राक्षांना ०.७ युरो प्रतिकिलो दर.
  • दौऱ्यात सहभागी पिंपळगाव (जि. नाशिक) येथील प्रयोगशील युवा द्राक्ष बागायतदार गणेश मोरे यांनी नोंदवलेली निरीक्षणे

  • पाहिलेल्या दोन प्लॉटसपैकी पहिला- व्हाइट सीडलेस टीमसन वाण. रूटस्टॉक- ११० आर.
  • तिसऱ्या वर्षाच्या बागेचे प्रतिझाड उत्पादन ४० किलो
  • वाढ नियंत्रकांचा (पीजीआर) किंवा संजीवकांचा वापर शक्‍यतो नाही. पूर्ण सेटिंग झाल्यानंतर जिबरेलिक ॲसिडचा एक स्प्रे मण्यांचा आकार वाढवण्यासाठी.
  • दुसरा प्लॉट - सुपिरियर सीडलेस वाण - रूटस्टॉक - पोलसन. तो ११० आरपेक्षा अधिक जोमदार.
  • दहा वर्षे वयाच्या या बागेत ८० ते ८५ किलो उत्पादन प्रतिझाड.
  • वाणाच्या निवडीनुसार रूटस्टॉक
  • पाणी

  • प्रत्येकी चार लिटरचे डिस्जार्च असलेल्या ड्रिपर्सचा वापर. पहिल्या दोन वर्षांपर्यंत प्रतिझाडाला दोन व तिसऱ्या वर्षानतर चार ड्रिपर्स वापरण्यास सुरवात.
  • कटिंग व सुरवातीच्या अवस्थेत दर दिवशी किंवा एकाड एक दिवशी वातावरण पाहून दोन तासांपर्यंत ड्रिप. सेटिंग व फळाचा आकार वाढतो त्या वेळी चार तासांपर्यंत ड्रिपर. हार्वेस्टिंगनंतर चार तासांतील दोन तास कमी करून दोन ते अडीच तास पाणी.
  • मोनो अमोनियम फॉस्फेट (१२-६१-०) खतांचा वापर. त्यातून नत्र व फॉस्फेट देण्याची व्यवस्था.
  • कॅल्शियमचे चार स्प्रे हे सेटिंगनंतर. (पाच ते सहा दिवसांच्या फरकाने). झिंकचे एक ते दोन स्प्रे.
  • या भागात मॉलिडेब्लमची कमतरता. चिलेडेट स्वरूपात वापर.
  • प्रत्येक झाडाला चार ब्रॅंचेस (ओलांडे). प्रत्येक ओलांड्याला पहिल्या वर्षाच्या उत्पादनाच्या वेळी चार ते पाच शूटस ठेवतात. प्रत्येक शूटला एकेक घड. बागेचे वय वाढत जाईल त्याप्रमाणे शूटस वाढवले जातात.
  • अॅलिकॅंटे भागातील प्लाॅट

  • बियांचा वाण - इटालिया.
  • सिंचन- प्रत्येक चार दिवसांनी १६ तास
  • डिस्जार्च - प्रतिड्रिपर- ३.८ लिटर प्रतितास, दोन ड्रिपर्स
  • प्रत्येक महिन्यात देठ परीक्षण, मगच पुढील अन्नद्रव्य व्यवस्थापन
  • नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये प्रूनिंग.
  • फॉस्फरस हा हार्वेस्टिंगनंतर व हिवाळा सुरू होण्यापूर्वी एमएपी (१२-६१-०) स्वरूपात
  • फॉस्फोरिक ऍसिडचा वापर प्रत्येक ‘इरिगेशन’सोबत. पाण्याचा सामू (पीएच) आठ असल्याने तो संतुलित करण्यासाठी. फॉस्फोरिक ॲसिडचे प्रमाण वापरत असलेल्या खतांवर अवलंबून.
  • कंपोस्ट - प्रत्येक तीन वर्षांनी. तीन किलो प्रतिझाड.
  • 'प्रूनिंग’ झाल्यानंतर काड्यांचा खत म्हणून वापर. (तुकडे करून). चार टन प्रतिहेक्टरी.
  • 'रेसिड्यू फ्री’ जैविक रसायनांचा वापर. त्यामुळे अंश राहण्याचा धोका कमी.
  • ठळक निरीक्षणे

  • मातीत कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांपासून ६० ते ७० टक्क्यांपर्यंत
  • मातीचा पीएच ८ किंवा अधिक.
  • या दोन्ही बाबींवर मात करण्यासाठी अन्नद्रव्यांचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक.
  • स्पेनमध्ये बहुतेक द्राक्षबागा नेटखालीच. पक्षी, गारपीट, वाऱ्यांपासून संरक्षण करणे हा त्यामागील हेतू. शिवाय नेटमुळे नियंत्रित वातावरण राहून पिकाची वाढ चांगली होते. गारपीट क्वचित. मात्र इथले शेतकरी नेटद्वारे प्रतिबंधात्मकरीत्या सज्ज.
  • तणनाशकांचा वापर नाही. आत्यंतिक गरज भासलीच तरच केवळ बांधावर.
  • अळ्यांच्या नियंत्रणासाठी गंधसापळे. डाऊनी मिल्ड्यूची समस्या शक्यतो नाही. पावडरी मिल्ड्यूसाठी गंधक.
  • किडी-रोग निहाय स्पिनोसॅड, मॅंकोझेब, जोजोबा तेल, सिनामोन आॅइल आदींचा वापर
  •  कीडनाशक वापरासंबंधी युरोपीय महासंघाच्या सर्व नियमावलींची काटेकोर अंमलबजावणी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com