फ्रेश, सॅलड, ज्यूसनिर्मितीसाठी डाळिंबाच्या खास जाती

शेतकऱ्यांचा जणू परिसंवाद या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासू शेतकऱ्यांचा सहभाग. तेथील तंत्रज्ञानाचे सूक्ष्म बारकावे ते टिपायचे. चपखल प्रश्न विचारायचे. नोटस लिहायचे. तेथील शेतकरी, कंसल्टंट यांच्यासोबत संवाद नव्हे तर दररोज शास्त्रीय परिसंवादच सुरू अाहे, अशीच अनुभूती यायची. सारंग काळे, गणेश मोरे, अश्विनकुमार भोसले, रमेश बामणे, राहुल ठाकरे, समीर कुबडे, सुरेश एकुंडे, एन. डी. पाटील-पिलीवकर, रामेश्वर थोरात, भरत अहेर, परीक्षित ढोकरे, ब्रह्मा जाधव यांचा दौऱ्यात समावेश राहिला.
डाळिंबाची बाग व दर्जेदार नर्सरी
डाळिंबाची बाग व दर्जेदार नर्सरी

स्पेनमधील मुर्सिया भागातील डाळिंब पैदासकाराची बाग आणि गुणवत्ताप्रधान फळबाग नर्सरी पाहण्याची संधी दौऱ्यातील मंडळींना मिळाली. कॅली प्लॅंट व पोम जेनेसीस या दोन कंपन्यांद्वारे हा व्यवसाय केला जातो. मागणी काय अोळखली? - जागतिक बाजारपेठ मिळवायची तर एकाच वाणावर विसंबून राहता येत नाही.

 काय केले?

  • विविध बाजारपेठांची मागणी अोळखून विविध वैशिष्ट्यांच्या वाणांची निर्मिती
  • दर्जेदार रोपनिर्मिती व विक्री
  • स्पॅनिश भाषेत वेबसाईट. त्याद्वारे आपल्या कंपनीचा प्रसार
  • मार्केट खाण्यासाठी (फ्रेश),फळांच्या सॅलेडसाठी  व डाळिंब ज्यूसनिर्मितीसाठी पर्पल क्वीन, मेली, एमआर-१००, किंगडम आदी जाती. वैशिष्ट्ये मार्केटची मागणी अोळखून त्या वेळेनुसार (विंडो पिरीएड) जाती बाजारात आणता येईल असा पक्व कालावधी पर्पल क्वीन -

  • पक्व कालावधी- आॅगस्ट ते सप्टेंबर
  • अत्यंत गडद लाल किंवा जांभळट आकर्षक रंग
  • गोड स्वाद, कोवळे दाणे
  • फळाचे वजन- ३०० ग्रॅम
  • झाडाची उंची मध्यम ते उंच
  • उत्पादकता- २५ ते ३० टन प्रति हेक्टरी
  •  मेली

  • सालीचा आणि दाण्यांचाही लालगर्द आकर्षक रंग
  • अर्ध आम्लयुक्त स्वाद, ज्यूसचे अधिक प्रमाण, सेमी टेंडर दाणे
  • उत्पादकता- ३० ते ३५ टन प्रति हेक्टरी
  •  एमआर १००

  • मध्य हंगामातील वाण, फळहंगाम- आॅक्टोबर अखेरपर्यंत
  • साल व दाण्यांचा गुलाबी-लाल रंग, सनबर्नची समस्या अत्यंत कमी
  • फळाचे वजन- ४०० ग्रॅम
  • उत्पादकता- कमाल ४० टन हेक्टर
  • किंगडम

  • पक्व कालावधी- आॅक्टोबर-नोव्हेंबर
  • अत्यंत मधुर स्वाद, किंचीत आम्लयुक्त
  • फळगळ, सनबर्न या समस्या अत्यंत कमी
  • उत्पादकता- ४० टन प्रति हेक्टर
  • उत्पादकता- योग्य हवामान, व्यवस्थापनावर अवलंबून या बागेतील ठळक निरीक्षणे

  • अत्यंत कमी पाणी देणे हाच मातीतून येणाऱ्या रोगांना दूर ठेवण्याचा हुकमी उपाय इथले शेतकरी वापरतात.
  • वाणांची टिकवणक्षमता अत्यंत जास्त काळ
  • फळे कॅनोपीच्या आतील भागात. त्यामुळे ‘सनबर्निंग’ कमी
  • पाच वर्षे वयानंतरच्या प्रति झाडाचे उत्पादन- ६० ते ८० किलो
  • उन्हाळ्यात पाणी खूप कमी. त्यामुळे उच्च दर्जाचे प्लॅस्टिक वापरून बाष्पीभवन टाळण्यात येते.
  • प्रूनिंग वर्षातून एकदाच. (जानेवारीत)
  • बागायतदारांचे निरीक्षण

  • दौऱ्यात सहभागी एन. डी. पाटील-पिलीवकर (पिलीव, जि. सोलापूर) येथील प्रयोगशील बागायतदार आपले निरीक्षण नोंदवताना म्हणाले की पाऊस १५० ते २५० मिमीपर्यंतच पडत असल्याने पाण्याचे महत्त्व इथल्या बागायतदारांनी अोळखले आहे.
  • आपला पाणी वापर जास्त. इथे आठवड्याला प्रति झाड सोळा लिटरपेक्षा जास्त पाणी देत नाहीत. पाऊस जास्त पडतो त्या वेळी भूजल पातळी वाढते. नदी, नाले यांचा अभाव. त्यामुळे पाण्याचे ‘लिचींग’ कमी.
  • बागेत झाडांच्या आधारासाठी अत्यंत मजबूत स्ट्रक्चर. त्याला दोन अँगल्स. वापरलेल्या धातूचे मटेरियल अत्यंत चांगल्या दर्जाचे. झाडांना त्याचा ताण चांगला दिला आहे. तो सैल किंवा घट्ट करण्यासाठी नट बोल्ट व खटके यांची उत्कृष्ट पद्धती.
  • पाच वर्षे वयापेक्षा अधिक झाडाचे उत्पादन ८० किलो
  • तीन किंवा चार फळे असलेल्या जागी दोन फळे काढून एकच ठेवले जाते.
  • रासायनिक फवारण्या खूप कमी. सेंद्रिय वा जैविक पद्धतीवरच भर
  •  कॅली प्लॅंट या नर्सरीची वैशिष्ट्ये

  • हायड्रोपोनीक्स किंवा कोकोपीट पद्धतीने रोपनिर्मिती
  • मुळांची व शाकीय वाढ अत्यंत सुदृढ
  • झाडाची सुरवातीच्या काळातील विकास जलद
  • एकसमान वयाची व दर्जाची रोपे
  • एकूण पीककालावधी कमी करता येतो.
  • रोपांची वाहतूक सुलभपणे करता येते.
  • लिंबू, संत्रा, डाळिंबाची दर्जेदार, रोगमुक्त रोपनिर्मिती. डाळिंबाची रोपे कटींगची तर लिंबू, संत्र्याची रोपे ‘डबल ग्राफ्टेड’.
  • ऑगस्ट-सप्टेंबरच्या काळात डाळिंब शेतातील काड्या काढून नर्सरीमध्ये आणून बॅग्जमध्ये लावल्या जातात. साधारण आठ ते नऊ महिने रोपे वाढवून शेतकऱ्यांसाठी मार्चमध्ये उपलब्ध केली जातात.
  • डाळिंबाच्या थेट काड्या लावण्याचा फायदा म्हणजे रोपे एकसमान पद्धतीने वाढतात. ती सक्षम व कणखर होतात.
  • भारतीय संत्रा उत्पादकांना मिळणार स्पेनचे तंत्रज्ञान संत्रा पिकात स्पेन

  • लिंबू, संत्र्याच्या विविध जातींच्या उत्पादनात जगात अग्रेसर
  • युरोपीय महासंघातील (इयू) सर्व देशांचे मिळून संत्रा क्षेत्र- २ लाख ८० हजार हेक्टर
  • त्यातील अर्धे क्षेत्र एकट्या स्पेनमध्ये
  • स्पेनची निर्यात- १.६ दशलक्ष टन- वर्ष-२०१६
  • एकूण युरोपीय महासंघ देशांत त्याचा वाटा- ५७ टक्के
  • मुर्सिया भागातील प्रातिनिधीक बाग दौऱ्यात पाहाता आली. त्याची ठळक वैशिष्ट्ये

  • लिंबू व संत्र्याच्या जाती भरपूर रसासाठी प्रसिद्ध
  • सालीचा रंग आकर्षक, सोनेरी पिवळा, स्वाद गोड. त्यामुळे अन्य युरोपीय देशांत चांगली मागणी
  • एकरी तब्बल ४० टन उत्पादन इथल्या संत्रा बागा देतात.
  • पाणी, नत्र यांचा एकूणच वापर कमी. नत्र नियंत्रित करून पोटॅशचा योग्य वापर केल्यास संत्रा पोकळ होणार नाही असे बागेच्या कन्सल्टंटचे मत.
  • ठिबकच्या लॅटरल्स झाडाजवळ न ठेवता त्यापासून काही इंचावर प्रत्येक बाजूला तीन. म्हणजेच प्रति झाड सहा ड्रीपर्स. जेणे करून फायटोप्थोरा किंवा पाण्याद्वारे उदभवणाऱ्या रोगांना प्रतिबंध.
  • दौऱ्यात ‘महाआॅरेंज’चे राहुल ठाकरे (विदर्भ)यांचा समावेश होता. या वेळी महाराष्ट्रातील संत्रा उत्पादकांना उदभवणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्या दृष्टीने येथील कन्सल्टंटना भारतात आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन येथील शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
  • संपर्क- मंदार मुंडले-९८८१३०७२९४ . . . . . . .

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com