agricultural success story in marathi, agrowon, Vadner Budruk, Parner, Nagar | Agrowon

वडनेर बुद्रुक गावाने मिळवली स्वच्छता, लोकसहभागातून समृद्धी

सूर्यकांत नेटके
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

ग्रामविकासासाठी गावकरी एकत्र आले. प्रत्येक कामात त्यांचं योगदान मोलाचं ठरलं. त्यातूनच नगर जिल्ह्यातील वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) गावाने स्वच्छता, लोकसहभागातून गावांत समृद्धी आणली आहे. शंभर टक्के हागणदारीमुक्तीसह वृक्षारोपण, तंटामुक्‍ती, बायोगॅस प्रकल्प उभारणी, सामुदायिक विवाह सोहळे, दारूबंदी, व्यसनमुक्ती आदी विकासकामे केली. त्यातून जिल्ह्यात आपली अोळख ठळक केली.

ग्रामविकासासाठी गावकरी एकत्र आले. प्रत्येक कामात त्यांचं योगदान मोलाचं ठरलं. त्यातूनच नगर जिल्ह्यातील वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) गावाने स्वच्छता, लोकसहभागातून गावांत समृद्धी आणली आहे. शंभर टक्के हागणदारीमुक्तीसह वृक्षारोपण, तंटामुक्‍ती, बायोगॅस प्रकल्प उभारणी, सामुदायिक विवाह सोहळे, दारूबंदी, व्यसनमुक्ती आदी विकासकामे केली. त्यातून जिल्ह्यात आपली अोळख ठळक केली.

नगर- पुणे जिल्ह्याच्या सीमेवर जगप्रसिद्ध रांजणखळगे आणि मळगंगा देवी असलेल्या निघोजपासून चार किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या काठी पारनेर तालक्‍यात वडनेर बुद्रुक गाव वसले आहे. पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने भागातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी समाधानकारक आहे. सुमारे तीनहजार लोकसंख्येच्या या गावात सन २००० पासून स्वच्छता अभियान राबवले जात आहे. सन २००६ पासून माजी सरपंच दिनेश बाबर यांच्या पुढाकाराने आणि गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून लोकसहभागातून कामांना वेग आला. टप्प्याटप्प्याने कामे होत गावाचं रुपडं पालटू लागलं.

बारा वर्षांपासून दारूबंदी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या गावांचा आदर्श घेऊन वडनेर बुद्रुकमध्ये २००६ मध्ये ग्रामसभेत दारुबंदी ठराव झाला. त्याची ग्रामपंचायतीने प्रभावी अंमलबजावणी केली. प्लॅस्टिकबंदी, तंबाखुबंदी यांचाही ठराव घेऊन अंमलबजावणी केली जात आहे.

स्वच्छतेतून समृद्धीकडे- ठळक बाबी

 • प्रत्येक कुटूंबाकडे शौचालय
 • सार्वजनिक ठिकाणी नळ
 • गावठाण, वाजेवाडी, चौधरी वस्ती, बाबरमळा या ठिकाणी चार शाळा, तीन अंगणवाडी केंद्रे,
 • सोसायटी, तलाठी कार्यालय, पोस्ट, बॅंक आदी सुविधा
 • सर्व शाळा, अंगणवाडीत स्वतंत्र शौचालये, हात धुण्याची व्यवस्था आहे.
 • गावात सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त आलेल्या पाहुण्यांसाठी दोन सार्वजनिक शौचालये
 • - नियमानुसार पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून तीन मीटरपेक्षा अधिक अंतरावर त्यांचे बांधकाम
 • सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी शोषखड्डे
 • सुमारे २५७ कुटुंबांकडे परसबागा. वीस वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून पाच हजारांपेक्षा अधिक झाडांची एकूण लागवड. पंचवीस कुटुंबांकडे औषधी वनस्पती

कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिती
गावात संकलित होणारा ओला व सुका कचरा यांचे विभाजन केले जाते. त्यापासून गांडूळखत तयार केले जाते. सात कुटुंबांकडे गांडळखत प्रकल्प असून त्यांना ग्रामपंचायतीकडून मोफत कचरा दिला जातो. दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असल्याने गंगाराम पवार यांनी सांगितले. गांडूळखतामुळे आर्थिक हातभार लागला आहे. प्लॅस्टिकचा कचरा नष्ट केला जातो.
लोकसहभागातून स्मशानभूमी, मंदिराचे काम
गावकऱ्यांनी एकत्र येत गावच्या स्मशामनभूमीचे साडेसहा लाख रुपये खर्च करून सुशोभीकरण केले आहे. त्यासाठी माजी सरपंच दिनेश बाबर, यांच्यासह दादा थोरात, संतोष नरे, माजी उपसरपंच गेणू बोराडे, विश्राम येवले यांनी आर्थिक योगदान दिले. सरपंच स्वाती अनिल नऱ्हे, उपसरपंच रमेश वाजे, गणेश शेटे, सुनील बाबर, शांता चौधरी, लता बाबर, रेखा येवले, गणेश सुकाळे, सुवर्णा पवार यांचा सातत्याने पुढाकार असतो. सात मंदिराचा लोकसहभागातून जीर्णोद्धार केला आहे. शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक दत्तात्रय मेरगळ, संतोष नऱ्हे यांच्यासह पुढाकारातून वृक्षारोपण, मोकळ्या जागेत उद्यान विकसित केले असून बसस्थानक शेड उभारले आहे.

बायोगॅसची उभारणी
तीस कुटूंबे दुग्ध व्यवसाय करतात. शेण उपलब्ध होत असल्याने तब्बल ५१ कुटूंबानी बायोगॅस युनीटची उभारणी केली अाहे. त्यातून दर वर्षाला सुमारे पाच लाख रुपयांच्या इंधनाची बचत होत आहे, असे ग्रामसेवक हरिचंद्र काळे यांनी सांगितले.

साथीचे आजार गायब
वस्तीवर पिण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी तीन सार्वजनिक विहिरी, दोन विंधनविहिरी व सहा हातपंप आहेत. पाणी जिरवण्यासाठी शोषखड्डे घेतले आहेत. पावसामुळे अथवा अन्य कारणाने पाणी साठल्यास
त्यात गप्पी मासे तातडीने सोडले जातात. त्यामुळे साथीचे वा पाण्यातून येणाऱ्या आजारांना प्रतिबंध घालणे
शक्य झाले आहे. गेल्या तीन वर्षांत अशा रोगाची साथ दृष्टीस आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने वडनेरकरांचे चंदेरी प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी असलेल्या हातपंपाला सौरऊर्जा जोडण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने प्रस्ताव मंजूर केला असून पाच लाख सत्तर हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.

पुरस्काराने कामाला उभारी
वडनेर बुद्रुक ग्रामपंचायतीला गेल्यावर्षी तालुका स्तरावरील स्मार्टग्राम प्रथम पुरस्कार मिळाला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते गावकऱ्यांचा गौरव झाला. यंदा संत गाडगेबाबात ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्‍यात प्रथम, जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला अाहे.

गाळ काढला, रामनळा पॅटर्नने वृक्षारोपण
वाजेवाडी आणि बाबर मळा येथील बंधाऱ्यांतून दोन वर्षांत गाळ उपसून त्याचा वापर शेतकऱ्यांनी शेतात केला आहे. त्याचा पन्नास हेक्‍टर क्षेत्राला फायदा झाला आहे. गाव शिवारात दहा वर्षांपासून विविध उपक्रमातून वृक्षारोपण केले जात आहे. अलिकडील काळात गावांतील व्यक्ती मृत झाल्यास त्यांच्या स्मरणार्थ, मुलगा- मुलगी जन्माचे स्वागत, वाढदिवस व लग्न झालेल्या मुलींची आठवण म्हणून गावांत "रानमळा' पॅटर्ननुसार झाडे लावली जात आहेत. त्यातून आत्तापर्यंत सहा हजारांपेक्षा जास्ती झाडे लावली असून त्यांचे जगण्याचे प्रमाण शंभर टक्के आहे.
 
दृष्टिक्षेपात वडनेर बुद्रुक

 • साक्षरतेचे प्रमाण - ९७ टक्के
 • महिला बचतगट - ३२
 • भौगौलिक क्षेत्रफळ - १०७९.३४ हेक्‍टर
 • लागवडीखालील क्षेत्र - ९१२.२८ हे.
 • बागायती क्षेत्र- ७०० हे. जिरायती क्षेत्र-२१२.२८ हे.
 • एकूण शौचालये- ५१७
 • प्रमुख पिके- ऊस, डाळिंब, सोयाबीन

अन्य वैशिष्ट्ये

 • जिल्हा परिषदेच्या निधीतून दलितवस्तीसाठी रस्ता
 • कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिती
 • सामुदायिक विवाह सोहळ्यातून आर्थिक बचत
 • शेततलावातील गाळ काढण्यासाठी सामूहिक पुढाकार
 • नळांद्वारे ९४ टक्के कुटूंबांना पाणीपुरवठा
 • विद्यार्थ्यांच्या सहभागातून राष्ट्रीय सेवा योजनांमधून सहभाग
 • ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढला
 • ग्रामपंचायतीच्या ग्राहक तक्रार निवारण कक्षामधून तक्रारीचे निराकरण
 • गावांच्या सुरक्षेसाठी "सीसीटीव्ही" ची नजर

प्रतिक्रिया
स्वच्छता अभियान आमच्या गावाने "लोकचळवळ' केली आहे. गावांत एकोप्याने झालेल्या कामांचे समाधान मानसिक सुख देणारे आहे. प्रत्येक गावांत अशी कामे होण्याची अपेक्षा आहे.
दिनेश बाबर, ९०९६५१५०००
माजी सरपंच व पंचायत समिती सदस्य, पारनेर

एकत्र केलेल्या कामांचे फळ म्हणून वडनेर बुद्रुकला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्‍यात प्रथम, जिल्ह्यामध्ये द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. आता विभागीय पातळीवर तपासणीसाठी निवड झाली आहे. तिथेही आम्हाला बक्षीस मिळेल असा विश्वास आहे. '
स्वाती अनिल नऱ्हे, ९९२२६६५०४५
सरपंच, वडनेर

गावविकासाला प्रोत्साहन मिळावे, तरुण, महिला, ज्येष्ठांचा कामांत समन्वय रहावा हेच उद्दीष्ट असते. त्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह गावांतील पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून गावाने स्थापन केलेली स्पर्धा समन्वय समिती कार्यरत आहे.
लक्ष्मण बोऱ्हाडे, अध्यक्ष, स्पर्धा समन्वय गाव समिती, वडनेर बुद्रुक
 
ग्रामसेवक हरिचंद्र काळे - ९४०४३१९९५०


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...
राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी...मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीचपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, ढगाळ...
राज्य खत समितीचा ‘रिमोट’ कोणाकडे?पुणे : शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ‘...
महारेशीम अभियानांतर्गत पाच हजार एकरची...औरंगाबाद: रेशीम विभागाच्यावतीने राबविल्या जात...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सामूहिक...नाशिक : देशातील कृषी व ऋषी संस्कृतीमध्ये काळ्या...
हार्वेस्टर मालकांकडून ऊस उत्पादकांची...सोलापूर ः ऊसतोडणीसाठी शेतकरी हार्वेस्टर मशिनला...
कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...
बदनापूर येथे कडधान्य पिकांचे आदर्श ‘...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत...
बोराच्या दोनशे झाडांची उत्कृष्ट बागढवळपुरी (जि. नगर) येथील सुखदेव कचरू चितळकर यांनी...
खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा...जळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...
बाजार समित्यांत शेतकऱ्यांना थेट मतदान...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
नीरेपासून साखरनिर्मितीचा रत्नागिरीत...रत्नागिरी ः नारळाच्या झाडातून काढल्या जाणाऱ्या...
परवाना निलंबनातही बिनदिक्कत खतविक्रीपुणे : ‘नियमांची पायमल्ली करून विदेशातून...
शेतकरी प्रश्न सुटण्यासाठी...मुंबई : राज्यात तालुकास्तरावर उद्यापासून...
शनिवारपासून किमान तापमानात घट होण्याची...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
विमाभरपाई प्रक्रिया रिमोट सेन्सिंगशी...पुणे : पीककापणी प्रयोगाच्या आधारावर पंतप्रधान...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...