डाळप्रक्रियेतून शेतकरी गटाने मिळवली आर्थिक वृद्धी

धान्य महोत्सवात विक्री गेल्या वर्षी ५० क्‍विंटल तूर खरेदी करून प्रक्रिया करण्यात आली. यवतमाळ येथे यंदा १७ ते २१ मार्च या कालावधीत धान्य महोत्सवात या डाळीची विक्री केली. गटाने सुमारे ५० सेंद्रिय शेतकऱ्यांचे नेटवर्क उभारले आहे. या सेंद्रिय डाळीला ७० रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर मिळाला. गहू, ज्वारी, उडीद, मुगाचीही काही प्रमाणात विक्री झाली. गटाने सुमारे ४०० ग्राहकांचे नेटवर्कही उभारले आहे.
तुरीच्या दर्जावर गटाने भर दिला आहे. हा दर्जा पाहताना उपविभागीय कृषी अधिकारी
तुरीच्या दर्जावर गटाने भर दिला आहे. हा दर्जा पाहताना उपविभागीय कृषी अधिकारी

धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने दर महिन्याला एकत्र येणाऱ्या वेणी (खुर्द) (जि. यवतमाळ) येथील काही शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग उभारणीचा विचार मांडला. तो प्रत्यक्ष कृतीतही आणला. श्री सप्त खप्ती पुरुष शेतकरी गटाचे स्वरूप त्याला आले. त्या बळावर डाळमिलची उभारणी होत गटाने आर्थिक वृद्धीकडे वाटचाल सुरू केली. त्यातून उद्यमशील अशी ओळख मिळविली. यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुका ठिकाणपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर वेणी (खुर्द) हे गाव आहे. पूस धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने सिंचनाच्या बळावर भाजीपाला आणि उन्हाळ्यात भुईमूग घेण्यावर येथील शेतकऱ्यांचा भर राहतो. सुमारे २५० एकरांवर कापूस घेतल्यानंतर भुईमूग घेतला जातो. जानेवारीच्या पंधरवड्यात त्याच्या लागवडीला सुरवात होते. भुईमुगाच्या विक्रीनंतर हाच पैसा खरिप हंगामाच्या कामी येतो. असे व्यावसायिक नियोजन गावातील शेतकऱ्यांचे राहते. उत्सवातून मिळाली दिशा बागापूर येथील संत खप्ती महाराज हे वेणीचे ग्रामदैवत आहे. मारुती मंदिर परिसरात त्यांच्या पूजनासाठी ग्रामस्थ एकत्र येतात. गावात दर महिन्याला शिवरात्र साजरी होते. या निमित्ताने दर महिन्याला पूजा व ग्रंथवाचन केल्यानंतर दीडशे व्यक्‍तींना जेवण दिले जाते. प्रत्येक महिन्याला जेवण देणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्‍तीवर जबाबदारी ठरवून देण्यात आली आहे. अशाच एका महिन्यात एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्‍यात शेतीपूरक उद्योगाचा विचार आला. हळूहळू त्याचे रूपांतर कृतीत झाले. समूहाची स्थापना श्री सप्त खप्ती पुरुष शेतकरी समूह या नावाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्प व आत्माअंतर्गत शेतकरी गटाची नोव्हेंबर २०११ मध्ये नोंदणी झाली. सध्या जगदेव टेमकर यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पूर्वी रवींद्र पुंड गटाचे सचिव होते. आज ते सदस्य असून, डाळमिल उद्योगाची मुख्य जबाबदारी सांभाळतात. गटात सचिव शाम कोंडबा अराडे, तर सदस्यांमध्ये संतोष नारायण वाशीमकर, सतीश सखाराम वाशीमकर, दत्ता कोंडबा अराडे, संदीप भोने यांच्यासह सुमारे १७ जणांचा समावेश आहे. समूहाचे खाते विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बॅंकेच्या हार्शी शाखेत आहे. महिन्याला शंभर रुपये बचतीचे उ.िद्दष्ट ठरविण्यात आले. समूहाची बचत, तसेच महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे अनुदान या निधीतून डाळमिल उद्योग उभारण्याचा निर्णय गटातर्फे घेण्यात आला. उद्योगाबाबत ठळक बाबी

  • सन २०१५-१६ मध्ये सुमारे एक लाख एक हजार ६२५ रुपयांना डाळमिलची खरेदी अकोला येथील खासगी उद्योगाकडून करण्यात आली. सुमारे ४० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. उर्वरित रक्कम
  • गटाने गुंतवली. आता पॉलीशरचीदेखील लवकरच खरेदी करण्याचे प्रस्तावित अाहे. त्याची
  • किंमत सुमारे ६५ हजार रुपये आहे.
  • डाळमिलची क्षमता दिवसाला सरासरी १२ क्‍विंटल तूरीवर प्र.िक्रयेची आहे.
  • दर वर्षी जानेवारीच्या सुमारास प्रक्रियेस सुरुवात होते. ती ३१ मेपर्यंत सुरू राहते.
  • त्यानंतर पावसाळ्यात ओलाव्यामुळे उद्योग बंद ठेवावा लागतो.
  • एका क्‍विंटल तुरीपासून सरासरी ६५ ते ७० किलोपर्यंत डाळ मिळते.
  • सन २०१६-१७ मध्ये एकूण सुमारे २५० क्‍विंटल तुरीवर, तर १५० क्विंटल गव्हावर प्र.िक्रया करण्यात आली. त्याचबरोबर ३५ क्विंटल एवढी उडीद आणि मुगावर प्रक्रिया झाली.
  • या वर्षीचा प्रक्रिया हंगाम फेब्रुवारीत सुरू झाला. आत्तापर्यंत सुमारे १७५ क्‍विंटलपर्यंत तुरीवर, तर
  • १०० क्‍विंटलपर्यंत गव्हावर प्रक्रिया झाली आहे.
  • भांडवल व ताळेबंद गटाच्या उद्योगाला गेल्या वर्षी सुमारे साडे ५५ हजार रुपयांचा नफा झाला. त्यासोबतच महिन्याची बचत मिळून बॅंक खात्यात आज एक लाख ६१ हजार रुपयांचे भांडवल आहे. आवश्‍यक त्या वेळी समूहातील सदस्यांना तीन रुपये व्याजदराने पैशांची उपलब्धता करून दिली जाते. डाळमिल सद्या भाडेतत्त्वावरील जागेवर उभी अाहे. तुरीसाठी किलोला चार रुपये म्हणजेच ४०० रुपये, तर गव्हासाठी १५० रुपये प्रतिक्विंटल दराने प्रक्रियेसाठी शुल्क आकारले जाते. मजुरी, वीज व अन्य असा खर्च अपेक्षित धरता सुमारे ४० टक्के नफा मिळतो. राईच्या तेलाचा वापर डाळप्रक्रियेवेळी करावी लागते. हे तेल ९५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे मिळते. त्यामुळे मजुरी खर्च वाढतो.

    बीबीएफ यंत्रासाठी घेतला पुढाकार गटातील शेतकऱ्यांचे व्यवसायातील सातत्य पाहता कृषी विभागाकडून अनुदानावर बीबीएफ (रुंद सरी वरंबा) यंत्राचा पुरवठा करण्यात आला. गेल्या वर्षी भुईमूग पेरणीसाठी त्याचा वापर करण्यात आला. गटाकडे त्या वेळी ट्रॅक्टर नसल्याने केवळ यंत्र भाडेतत्त्वावर देण्यात आले. त्या माध्यमातून दीडशे एकरावर पेरणी पहिल्या वर्षी झाली. प्रतिएकर १०० रुपयांप्रमाणे भाडे शुल्क आकारण्यात आले. गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला ट्रॅक्‍टरची खरेदी दीड लाख रुपये रोख, तर उर्वरित कर्ज रकमेतून करण्यात आली. स्थानिक बॅंकेकडून पाच लाख रुपयांच्या कर्जाला संमती मिळाली आहे. या पैशाचा विनियोग वेणी बसस्थानक परिसरात जागा खरेदीतून करण्याचा मानस असल्याचे गटाचे सदस्य रवींद्र पुंड यांनी सांगितले. संपर्क- -रवींद्र पुंड-९७६७१७१०६६ सदस्य, श्री संत खप्ती पुरुष शेतकरी स्वयंसहाय्यता गट

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com