agricultural success story in marathi, agrowon,gavrai,badnapur, jalna,padhavad, sindkheda, dhule | Agrowon

सिंचनक्षमता बळकट करून फळबागशेती केली विकसित
चंद्रकांत जाधव
बुधवार, 23 मे 2018

निर्यातक्षम केळीचे उत्पादन
केळीची शेती पढावद भागात फारशी दिसत नाही. मात्र, पवार यांनी हे पीक टिकवण्याचा प्रयत्न करताना निर्यातक्षम उत्पादनही घेतले आहे. प्रतिझाड २३ किलोपासून ३२ किलोची रास मिळाली आहे. यंदा निर्यातक्षम केळीची भागातील प्रसिद्ध कंपनीने किलोला १२ रुपये दराने खरेदी केली.

केळीचे मुख्य पीक, त्याचे निर्यातक्षम उत्पादन, जोडीला विविध बीजोत्पादन आणि पपईचा आधार अशा पीकपध्दतीतून अवर्षणप्रवण पढावद (जि.धुळे) येथील पवार पिता पुत्रांनी फायदेशीर शेतीची घडी बसवली आहे. आपल्या पूर्ण ३७ एकरांत ठिबक सिंचनासह विहिरीत जलपुनर्भरणाचा प्रयोग करून जलस्राेत सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ उत्पादनावर भर न देता जमिनीची सुपीकता टिकविण्यावरही त्यांनी चांगलाच भर दिला आहे.
.
धुळे जिल्ह्यातील पढावद (ता. शिंदखेडा, जि.धुळे) हे अवर्षण प्रवण. गावशिवारात कोरडवाहू पिके अधिक असतात. फेब्रुवारीच्या दरम्यान हिरवेगार शिवार उजाड होण्यास सुरवात होते. गावातील प्रकाश पवार यांनी सुरवातीपासूनच प्रयोगशील शेतीची मनोवृत्ती ठेवत शेतीत सुधारणा सुरू केल्या. सन १९८८ च्या दरम्यान गावानजीकच्या पांझरा नदीत विहीर खोदली. नदीचे वाहणे बंद झाले तशी विहीरही बंद झाली. पवार यांच्या भिलाणे रस्त्यानजीक १५ एकर शेतातही त्याच सुमारास विहीर खोदली. तिलाही नंतर पाणी कमी होऊ लागले. या शिवारात केळी, पपईची शेती केली जाते. पवार यांना मुलगा शरद यांची समर्थ साथ शेतीत मिळते.

पीकपद्धती व शेतीतील बदल

  • केळी व पपईला पाणी कमी पडू नये म्हणून सात वर्षांपूर्वी पाच इंची व्यासाच्या पाइपची जलवाहिनी तापी नदीवरून घेतली. पांझरा नदीला पाणी आल्यास नदी ओलांडून जाण्याचा मार्ग बंद होतो. मग सुमारे २१ किलोमीटर अंतर पार करून काही किलोमीटर असलेल्या उपसास्थळी जावे लागते.
  • संपूर्ण ३७ एकरासाठी ठिबक सिंचन
  • मुख्य पीक केळी. केळीनंतर पपई व त्यानंतर हंगामी पिकांचे बीजोत्पादन
  • केळीच्या दरवर्षी साधारण साडेपाच हजार उतीसंवर्धित रोपांची लागवड
  • खरिपात मूग, उडीद, रब्बीत हरभरा, ज्वारी
  • गावात जीवनधारा शेतकरी उत्पादक कंपनी कार्यरत. पवार त्याचे अध्यक्ष. कंपनीच्या माध्यमातून बियाण्याची विक्री
  • दरवर्षी पपईचे क्षेत्र सुमारे पाच एकर असते. यंदा ते सात एकर. पपईच्या रोपांचे उष्णतेपासून संरक्षण व्हावे यासाठी क्रॉप कव्हरचा वापर केला आहे. ‘बेड’वर डबल लॅटरलचा वापर केला आहे. मागील हंगामात पपईला प्रतिकिलो सरासरी सात रुपये दर मिळाला. दर्जेदार पपईची खरेदी व्यापारी थेट शेतात येऊन करतात.
  • पीकविमा या विषयात पवार यांचा गाठा अभ्यास आहे. या विषयावर त्यांनी ॲग्रोवनमधून सातत्याने लेखन केले आहे.

ठळक बाबी

बीजोत्पादनातून दुप्पट फायदा
बीजोत्पादनासाठी बियाणे परभणी, अकोला व राहुरी (जि.नगर) येथील कृषी विद्यापीठांकडून आणले जाते. बीजोत्पादन कसे परवडते याचे उदाहरण देताना पवार म्हणाले की मागील वर्षी हरभऱ्याला बाजार समितीत क्विंटलला ४५०० रुपये दर मिळाला. हाच दर बियाण्याला ९००० रुपये मिळाला. खर्च व क्विंटलला २५०० रुपये अनुदान या बाबींचा विचार करता बीजोत्पादनात दीडपट ते दुप्पट नफा मिळाला. यंदा पवार यांनी हरभऱ्याचे सुमारे नऊ एकरांत ५२ क्विंटल, चार ते पाच एकरांतील ज्वारीचे ५० क्विंटल बिजोत्पादन केले. तर ‘जीवनधारा’ कंपनीतर्फे मुगाचे ५४ क्विंटल व उडीदाचे सुमारे १२ क्विंटल बीजोत्पादन झाले.

सेंद्रिय कर्ब वाढवला
पूर्वी केळीच्या शेतातील सामू (पीएच) 8.3 होता. काळी माती असल्याने निचरा प्रमाण कमी होते.
नंदुरबार व धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रानेही माती परीक्षण अहवाल दिला होता. या स्थितीत हिरवळीचे खत धैंचाची लागवड करून जमिनीत गाडण्याची प्रक्रिया सुरू केली. साधारण आठ एकरांत दरवर्षी धैंचाचा प्रयोग केला जातो. एकरी पाच ट्रॉलीपर्यंत शेणखताचा वापर सुरू केला. पपईचा बेवडही चांगला असल्याचा अनुभव पवार विशद करतात. निचरा होण्यासाठी गादीवाफ्याचा वापर सुरू केला. सर्व उपायांमधून पूर्वी ०.२ टक्के असलेला सेंद्रिय कर्ब ०.९ टक्क्यापर्यंत वाढल्याचे ते सांगतात.

जलपुनर्भरण
आपल्या क्षेत्रासह नजीकच्या पाच शेतकऱ्यांच्या शेतातील पाणीही आपल्या शेतात आणून विहिरीचे जलपुनर्भरण करून घेतले आहे. विहिरीभोवती वाळूचा मोठा भराव केला आहे. विहिरीत पाणी जावे यासाठी ठिकठिकाणी अडीच व तीन इंची व्यासाचे पीव्हीसी पाईप लावले आहेत. तापी नदीवरील जलवाहिनीला अडचण येऊन पाणीसमस्या उदभवली तर पढावदनजीकच्या शेतात एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. त्यात प्लॅस्टिक पेपरचे अस्तरीकरण केले आहे. मागील वेळेस समस्या आल्यानेच शेततळ्यातील पाण्याचा वापर पपई व केळीसाठी केला.

संपर्क- प्रकाश पवार- ८३०८४८८२३४

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...