जिरायती उटगीत केली फायदेशीर फळबाग केंद्रित शेती

एकत्रित कुटूंब राबते हणमंत दुधगी यांनी वडिलोपार्जीत शेतीत भर टाकून शेती ६० एकरांवर नेली. त्यांना चार मुले आहेत. सर्वजण शेती करतात. त्यांचे १८ सदस्यांचे मोठे कुटूंब आहे. शेतीची विभागणी केली असली तरी सर्वजण मिळूनच कष्ट करतात. तेव्हाच शेती फायद्याची ठरते असे दुधगी म्हणतात. मुलगा काशिनाथ शेतीची तर परमेश्‍वर विक्रीची जबाबदारी पाहतो.
हणमंत दुधगी यांचे वय ७६ वर्षे असूनही शेतात काम करण्याचा उत्साह तरूणालाही लाजवेल असा असतो.
हणमंत दुधगी यांचे वय ७६ वर्षे असूनही शेतात काम करण्याचा उत्साह तरूणालाही लाजवेल असा असतो.

शेतीत एकाचवेळी गुंतवणूक धोक्याची ठरू शकते. दरही आपल्या हाती नाहीत. अशावेळी बाजारपेठेतील मागणी अोळखून टप्प्याटप्प्याने पीकपद्धतीची रचना व क्षेत्र यांचे नियोजन फायदेशीर ठरते. उटगी (जि. सांगली) येथील हणमंत बाळाप्पा दुधगी (वय ७६) यांनी याच कार्यपद्धतीतून विविध फळबागांची जोपासना केली. चार मुलांना एकत्र ठेवत आज ६० एकरांवरील फळबाग केंद्रित शेती त्यांनी सक्षम केली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचा दुष्काळ काही हटत नाही. पाणी, हवामान यांची आव्हाने झेलत इथला शेतकरी शेतीतील अर्थकारण फुलवताना दिसतो आहे. उटगी (ता. जत) येथील हणमंत बाळाप्पा दुधगी हे त्यातीलच एक शेतकरी. त्यांचे वय ७६ वर्षे आहे. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ऐन तिशीतील तरुणाला कामात मागे टाकतील असा त्यांचा उत्साह आहे. अपुऱ्या पगारावरची नोकरी दुधगी सांगतात की आमची वडिलोपार्जित २५ एकर शेती. संपूर्ण माळरान. पाणी नसल्याने केवळ पावसावर शेती पिकायची. आजोबांच्या बरोबर मीही शेतीत राबायचे. आजोबा आणि वडील शून्यातून उभे राहिले. मला घडवलं. सन १९६५ मध्ये दुधगी शिक्षक म्हणून सोलापूर जिल्ह्यात रुजू झाले. शंभर रुपये मासिक पगार होता. चौदा वर्षे विद्यार्थ्यांना घडवलं. पुढे पगार २५० रुपये झाला. सांगली जिल्ह्यात बदली झाली. अपुरा पगार आणि शेतीतील उत्पन्न यातून ताळमेळ लागत नव्हता. सन २००१ मध्ये दुधगी सेवानिवृत्त झाले. पूर्वी वडिलांकडे असलेली शेतीची सूत्रे आता त्यांच्याकडे आली. फळबागेचा विकास पाणी, हवामान व मार्केट या बाबींचा अभ्यास केला. त्यानुसार पीकपद्धतीची निवड करताना १९७७ मध्ये फळबाग लागवडीवर शिक्कामोर्तब केले. मुळात जत तालुक्याच्या पूर्व भागात माडग्याळी बोरं प्रसिध्द आहेत. त्यांची लागवड करण्याचे ठरले. मावस भाऊ ए. आर. व्हणसुरे हे राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अकाउंट विभागात कार्यरत होते. त्यांच्यामार्फत हा प्रश्न सुटला. रोपवाटिका उभारली वनाधिकारी श्री. पाटील यांनी जंगली बोरांची रोपवाटिका सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार शासकीय परवाना देऊन रोपवाटिकेची नोंदणी केली. या रोपांपाठोपाठ लिंबाच्या रोपनिर्मितीत ते उतरले. मात्र शेतीच्या व्यापात रोपवाटिका सांभाळणे अवघड बनल्याने हा व्यवसाय थांबवला. फळबाग केंद्रित शेतीचा विकास

  • एकूण शेती - ६० एकर
  • पीकनिहाय क्षेत्र (सुमारे)
  • लिंबू शाही सरबती - चार एकर
  • ॲपल बोर - साडेचार एकर
  • साधे बोर - चार एकर-
  • पेरू - एक एकर- यंदा लागवड
  • डाळिंब - चार एकर
  • द्राक्ष-सव्वा पाच एकर- यंदा लागवड
  • दररोज सकाळी शेतीच्या कामांची चर्चा. त्यानुसार कामांचे नियोजन
  • शेतीसह घरातील हिशोबाची दररोज नोंद
  • घरातील सर्व सदस्य शेतात राबत असल्याने खर्चात बचत
  • फळांचा दर्जा जपण्यावर सर्वाधिक प्राधान्य
  • चार देशी गायींचे संगोपन. यामुळे शेणखत, गोमूत्र यांचा शेतीत वापर
  • पाण्याची सोय चार कूपनलिका, तीन विहीर घेतल्या. पैकी एका कूपनिलकेला तर दुसऱ्या विहिरीला पाणी लागले. संपूर्ण शेतीला पाणी पुरावे म्हणून सुमारे एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले. पीक नियोजन व बाजारपेठ काशिनाथ म्हणाले की, वयाच्या सोळाव्या वर्षांपासून वडिलांच्या हाताखाली सर्व कामे शिकलो. आजचे यांत्रिकरणाचे युग आहे. त्यावर भर दिला. परमेश्‍वर सांगतात की सांगली, सोलापूर, विजापूर, कर्नाटक, रायचूर, दावणगिरी, कोल्हापूर अशा विविध बाजारपेठा आम्ही हाताळतो. बाजारपेठांशी वीस वर्षांचं नातं आहे. कोणत्या पिकाला केव्हा मागणी होईल, आवक आणि दर यांची स्थिती याचा अभ्यास करूनच पिकांचे नियोजन करतो.   उत्पादन व उत्पन्न

  • अॅपलबेर एकरी १० टनांपर्यंत उत्पादन तर दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न. १५ ते २० रुपये प्रति किलो दर. सोलापूर, सांगलीला विक्री
  • साध्या बोरांची विक्री कर्नाटकातील दावणगिरी, रायचूर येथे किलोला ५ ते २० रुपये दराने. प्रति झाड एक ते दीड क्विंटल उत्पादन.
  • डाळिंबाचे एकरी १० टन उत्पादन. वीस रुपयांपासून ते कमाल ६०, १०० रुपये दर
  • लिंबे वर्षभर सुरू. आठवड्याला १० गोणी ( प्रति गोणी ७०० लिंबू) माल मिळतो. उन्हाळ्यात गोणीला २००० तर अन्य हंगामात २५० ते ५०० रूपयांपर्यंत दर. लिंबाचे मुख्य मार्केट कोल्हापूर तर विजापूर, पंढरपूर, सोलापूर यांचाही पर्याय. रोपांची विक्रीही प्रति नग २० रुपयांप्रमाणे.
  • गावकऱ्यांमुळे लोकप्रतिनिधी गावात दुधगी यांच्याबाबत जिव्हाळा, प्रेम अाहे. त्यातूनच २००७ मधील पंचायत समितीच्या निवडणुकीत लढण्यासाठी गावकऱ्यांनी प्रोत्साहन दिले. त्यातून २०१२ पर्यंत पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. मात्र त्यानंतर राजकारणात सक्रिय न होता शेतीकडेच अधिक लक्ष दिल्याचं दुधगी म्हणाले.   संपर्क- हणमंत बाळाप्पा दुधगी - ८८०६११३०१९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com