पीक फेरपालटासह खताचे नेटके नियोजन

अकोला देव (ता. जाफ्राबाद, जि. जालना) कपाशी उत्पादक भाऊराव दरेकर यांची एकूण २५ एकर शेती आहे. दरवर्षी त्यातील १० एकरांवर कपाशीचे पीक घेतात. कपाशी लागवडीमध्ये सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत असल्यामुळे त्यांचे उत्पादन इतरांपेक्षा खूपच जास्त राखण्यात त्यांनी यश मिळविले अाहे. सघन लागवड, पीक फेरपालट व रासायनिक खतांचे शास्त्रोक्‍त नियोजन यामुळे त्यांना हे यश साधता आले आहे .
कपाशीच्या शेतात भाऊराव दरेकर
कपाशीच्या शेतात भाऊराव दरेकर

अकोला देव (ता. जाफ्राबाद, जि. जालना) कपाशी उत्पादक भाऊराव दरेकर यांची एकूण २५ एकर शेती आहे. दरवर्षी त्यातील  १० एकरांवर कपाशीचे पीक घेतात. कपाशी लागवडीमध्ये सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत असल्यामुळे त्यांचे उत्पादन इतरांपेक्षा खूपच जास्त राखण्यात त्यांनी यश मिळविले अाहे. सघन लागवड, पीक फेरपालट व रासायनिक खतांचे शास्त्रोक्‍त नियोजन यामुळे त्यांना हे यश साधता आले आहे . गावात सगळे त्यांना आदराने मामा म्हणतात. पूर्वी ते फुल्या पाडून कपाशी लावायचे तेव्हाही इतर कपाशी उत्पादकांचे उत्पादन एकरी ५ ते ७ क्‍विंटल तर त्यांचे ८ ते ९ क्‍विंटलपर्यंत जायचं. मात्र, २००५-०६ मध्ये गावात गटशेतीची सुरुवात झाली. डॉ. भगवानराव कापसे यांच्या माध्यमातून गावात आलेले डॉ. एस. एस. बैनाडे, डॉ. एस. बी. पवार आदींनी सघन लागवडीसह (५ x ५ फूट अंतर) खतव्यवस्थापनाच्या सुधारित तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. त्यानुसार खतव्यवस्थापन केले. परिणामी कपाशीचे एकरी उत्पादन १५ ते २५ क्‍विंटलपर्यंत जाऊन पोहाेचले, असे ते सांगतात. गत वर्षी गुलाबी बोंड अळीच्या आक्रमणाने सारेच हतबल झाले; पण तशाही परिस्थितीत खत, फवारणी आणि इतर व्यवस्थापनामुळे बऱ्यापैकी उत्पादन मिळाले. यंदा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कपाशी लागवड त्यांनी १० जूननंतरच केली आहे. जमीन खडकाची असल्याने २५ एकरांत धरणातला गाळ मोठ्या प्रमाणात टाकला आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहे. ठिबक सिंचन संचावरच कपाशीला सिंचन केले जाते. परिणामी गरजेनुसार विद्राव्य खतेही मुळांच्या कक्षेत सोडली जातात. यंदा लागवड करताना त्यांनी पहिला डोस एकरी १५.१५.१५, १०० किलो या प्रमाणात दिला. दुसरा डोस आणखी १५ दिवसांनी (पेरणीनंतर १ महिना) पेरूनच १०.२६.२६ १ बॅग अधिक युरिया १ बॅग असा देणार आहे. तिसरा डोस पेरणीनंतर ६० दिवसांनी १०.२६.२६ दोन बॅग अधिक १ बॅग युरिया किंवा पाऊस झाला असल्यास डीएपी २ बॅग असा देणार आहेत. विद्राव्य खते देताना ७० व्या दिवशी १९.१९.१९ एकरी दोन किलो या प्रमाणात तर ८० व्या दिवशी ०.५२.३४ एकरी दोन किलो या प्रमाणात देणार आहे. केवळ मुख्य अन्नद्रव्यांचाच वापर न करता ठिबकने सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मिश्र खत ग्रेड २ ठिबक संचातून एकरी २ किलो (७० व्या व ८० व्या दिवशी) या प्रमाणात देणार आहे.

पीकफेरपालट व वाढनियंत्रकाचा वापर : केवळ खतव्यवस्थापन महत्त्वाचे नसून पीक फेरपालटीलाही ते महत्त्व देतात. त्यासाठी कपाशीवर बेवड म्हणून दरवर्षी गव्हाचे पीक घेतले जाते. कपाशीवर लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी वाढरोधकाची फवारणी केली जाते. पुन्हा पंधरवड्याने अशीच फवारणी घेतली जाते. हे शक्‍य न झाल्यास शेंडा खुडणी केली जाते. कपाशीची वाढ चार ते साडेचार फुटांपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घेतली जाते. संपर्क : भाऊराव दरेकर, ८३९०१७१३८०  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com