सोयाबीनसह तूर भुईमुगासाठी अमरावती बाजारसमिती

बाजारसमितीत झालेली शेतमालाची आवक .
बाजारसमितीत झालेली शेतमालाची आवक .

सोयाबीनसह तूर, भुईमुगासाठी अमरावती बाजार समिती सोयाबीनसह तूर, हरभरा खरेदी विक्रीचे ‘हब’ म्हणून अमरावती बाजार समितीने ओळख मिळविली आहे. हंगामात १५ लाख क्‍विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक या बाजार समितीत होते. शेतमाल तारण, गोदामे, जनावरे बाजार, एसएमएसद्वारे बाजारभाव आदी विविध सुविधांही बाजार समितीद्वारे देण्यात आल्या आहेत.

सोयाबीनसाठी प्रसिद्ध मात्र त्याबरोबर तूर, भुईमूग यांचीही आवक होणारी अमरावती बाजार समिती ''अ'' वर्ग बाजार समितीत येते. अमरावती व भातकुली या दोन तालुक्‍यांचा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात समावेश होतो. तब्बल २३६ गावे बाजार समितीच्या अंतर्गंत आहेत. बाजार समितीची स्थापना २७ ऑक्‍टोबर १९५६ रोजी बाजार समितीची स्थापना झाली. बडनेरा, भातकुली, शिराळा, आष्टी, खोलापूर, माहूली जहाॅँगीर, भातकुली, शिराळा, आष्टी, खोलापूर येथे समितीचे उपबाजार आहेत. बाजार समितीला ई-नाम प्रणाली मंजूर झाली आहे. रविवारी इथला धान्य बाजार बंद राहतो.

ठळक बाबी

  • धान्य व्यवहारासाठी ३७७, कापूस ८, भाजीपाला व्यवहारासाठी २०६, फळांसाठी ७४, बडनेरा उपबाजारासाठी ३०, जनावरे बाजारासाठी १० असे एकूण ७१२ अडते
  • खरेदीदार व्यापाऱ्यांची संख्या-३२४
  • खुल्या पद्धतीने लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाते.
  • बाजार समितीचा परिसर १८ एकर १७ गुंठे.
  • फळे व भाजीपाला बाजार ८ एकर १४ गुंठे, बडनेरा जनावरांचा बाजार पाच एकर क्षेत्रावर विस्तारित
  • संपूर्ण परिसराला आवारभिंत  
  • एसएमएसद्वारे बाजारभाव एसएमएसच्या माध्यमातून बाजारभावांची माहिती देण्याची सुविधा कार्यान्वित आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना ही सेवा निशुल्क दिली जाते. साडेसात हजारावर शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. यासाठी बाजार समितीद्वारे प्रति एसएमएस १६ पैसे खर्च केले जातात.

    बाजार समितीने पालटले भाजी बाजाराचे रूप भाजीपाला बाजाराचे नियंत्रण पूर्वी नगरपालिकेद्वारा व्हायचे. पुढे बाजार समितीकडे त्याचे नियंत्रण आले. पावसाळ्याच्या दिवसांत चिखल व्हायचा. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पुरेशी सोय नव्हती. यावर उपाय म्हणून बाजारातील व्यापाऱ्यांना कचरा ड्रम्सचे वाटप करण्यात आले. दोनशे रुपये शुल्क त्यापोटी आकारण्यात येते. खरे तर पूर्वी हे वाटप निशुल्क व्हायचे. परंतु, त्याचा दुरुपयोग झाल्याने शुल्क आकारणीचा निर्णय घेण्यात आला. आत्तापर्यंत ७० ड्रम्सचे वाटप करण्यात आले आहे. आता रस्त्यावर कचरा फेकला जात नाही. परिणामी, भाजी बाजार स्वच्छ ठेवणे शक्‍य झाले आहे. लवकरच येथील रस्त्याचे काॅँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव पणन मंडळाकडे देण्यात आल्याचे बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल राऊत यांनी सांगितले. या थोड्याशा सुधारणेमुळे प्रतीदिवस १० ते १५ हजार रुपयांचा सेस वाढला. बाजार गुरुवारी बंद राहतो.

    जनावरांच्या बाजाराचे नियंत्रण बडनेरा येथील जनावरांच्या बाजाराद्वारे आठवड्याला एक लाख रुपयांपेक्षा अधिक सेस मिळतो. दर शुक्रवारी हा बाजार भरतो. देशी, संकरित गायी, मुऱ्हा, जाफराबादी म्हशी, शेळ्या तसेच घोडेदेखील या ठिकाणी विक्रीसाठी येतात.

    शेतकऱ्यांसाठी प्रस्तावित सुविधा माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाच रुपयांत जेवण देण्याची सुविधा सद्यस्थितीत आहे. जुन्या कंत्राटदाराचे कंत्राट संपल्याने लवकरच निविदा काढून ही सोय केली जाईल. पाण्यासाठी आरओ पद्धती असून दोनहजार लिटर प्रतितास पाण्याची उपलब्धता होणार आहे.

    महत्त्वाचे प्रस्ताव 

  • भुईमूग विक्रीसाठी मेळघाटातील धारणी, चिखलदरा सारख्या दुर्गम भागातून शेतकरी बाजार समितीत येतात. खरेदी विक्रीला विलंब झाल्यास नाममात्र रुपयांत निवासाची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठविला आहे.  
  • बाजार समिती ते बस स्थानकापर्यंत शेतकऱ्यांसाठी बससेवा
  • शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी अडीच ते दोन लाख रुपयांपर्यंत मदत करण्याचे नियोजन
  • आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांच्या शिक्षणासाठीही अशाप्रकारचे धोरण
  • शेतकरी कुटुंबासाठी कमी दरात वैद्यकीय सेवा
  •   सीसीटीव्ही कक्षेत बाजार पणन मंडळाकडे ‘सीसीटीव्ही’चा प्रस्ताव दिला आहे. साडेनऊ ते दहा लाख रुपयांचे महिन्याचे वीजबिल बाजार समिती भरते. ते पैसे वाचवण्यासाठी ‘सोलर’च्या माध्यमातून वीजनिर्मिती प्रस्तावीत आहे.   तारण माल योजनेचा करणार प्रसार स्वनिधीतून राबविण्यात येणाऱ्या शेतमाल तारण योजनेला गेल्यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्यावर्षी एक कोटी ५३ लाख रुपयांचा माल तारण ठेवण्यात आला. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा यासाठी त्याचा प्रचार होण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. खरेदी विक्री सोसायटी अध्यक्षांची यासाठी मदत घेतली जाईल. गावागावात ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर)च्या माध्यमातून जागृती केली जाणार आहे. शेतमाल किमतीच्या ७५ टक्‍के रक्‍कम दिली जाते. सहा टक्‍के व्याज यापोटी आकारले जाते. गोदाम भाडे वा अन्य कोणते शुल्क आकारले जात नाही. बाजार समितीकडे नऊ गोदामे आहेत. बाजार समितीची गोदामाची व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुक्‍यातील कोणत्याही गोदामात माल ठेवल्यास त्यापोटीचे भाडेशुल्क बाजार समिती देणार असा ठराव घेण्यात आला आहे.

    बाजारातील शेतमाल आवक क्‍विंटलमध्ये

    २०१५-१६  
    सोयाबीन    ११९७०१   
    तूर     ८३५०९८   
    हरभरा    ५९००१५   
    भुईमूग     २३५११
    गहू    ९०४३७
    २०१६-१७  
    सोयाबीन    २३९११८२
    तूर     ९१११९०
    हरभरा   ४५६१११
    भुईमूग     १९२९२
    गहू    ५७१७१
    २०१७-१८  
    सोयाबीन    १३२५१८३
    तूर    ६५८५१७
    हरभरा   ४३०८२५
    भुईमूग    ३७०६३
    गहू    ४५०३८

    संपर्क : प्रफुल्ल राऊत, ८५५०९९५६७८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com