पाण्याचा नियंत्रित वापर, जमिनीच्या सुपीकतेवर कटाक्ष

पाण्याचा नियंत्रित वापर, जमिनीच्या सुपीकतेवर कटाक्ष
पाण्याचा नियंत्रित वापर, जमिनीच्या सुपीकतेवर कटाक्ष

कठोरा (ता. जि. जळगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी सुनील नारायण पाटील खरिपात कापसाची मुख्य लागवड करतात. कूपनलिका असल्याने पूर्वहंगामी लागवडीवर भर असतो. काळी कसदार जमीन असल्याने पाण्याचा नियंत्रित वापर होतोच, शिवाय जमीन कडक होऊन तिचे आरोग्य बिघडू नये यासाठी शेणखताचा वापरही करतात. माझी पाच एकर शेती आहे. कूपनलिकेला मुबलक पाणी असते. जमीन काळी कसदार असून तीन एकर जमीन भाडेतत्त्वावर करताे. कापूस प्रमुख पीक असून पूर्वहंगामी बीटी कापसाची लागवड करतो. मात्र हंगामाला सुरुवात होताना बियाणेटंचाई, खत टंचाई असे प्रश्‍न भेडसावतात. आवश्‍यक बियाणे बाजारात मिळत नाही. मग एकाच वाणाची अपेक्षा न करता विविध  वाण आणतो. कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करतो. खतांमध्ये युरियाची समस्या अनेकदा असते. कठोरा गाव जळगाव शहरापासून सुमारे ३० किलोमीटरवर अाहे. वाहतूक खर्च वाढतो. मजुरांचीही समस्या अधिक असते. म्हणून रासायनिक खतांचा कमी वापर करतो.   शेती व्यवस्थापनाला महत्त्व  

  • लागवडीपुर्वी मार्च किंवा एप्रिलमध्येच खोल नांगरणी करतो. जमीन भुसभुशीत करून एकरी ४ ट्रॉली शेणखत टाकून पसरवून घेताे.
  • लागवड पाच बाय दोन फूट अंतरावर होते.
  • सिंचनासाठी ठिबकचा वापर करतात. चांगल्या दर्जाची ठिबक सुमारे ३ वर्षे व्यवस्थित असते. दर तीन वर्षांनी ठिबक बदलतो.
  • पाणी प्रत्येक रोपानजीक मिळेल याची काळजी घेतो.
  • कीडनियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, जीवामृत यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग केली जाते.  
  • बंधू दिलीप यांची मदत असते. मात्र ठिबक अंथरणी, सबमेन पाइप बसविणे, स्वतःचा ट्रॅक्‍टर असल्याने नांगरणी, शेत भुसभुशीत करणे आदी कामे स्वतः करताे.  
  • काळ्या कसदार जमिनीत पाण्याचा निचरा कमी होतो. अति पाऊस झाला तर कापसात मर रोग येतो. पावसाळ्यात शेतात पाणी तुंबू नये यासाठी शेतातून पाणी बाहेर जाण्याचे मार्ग जूनमध्येच व्यवस्थित तयार करून घेतला जातो.
  • लागवडीवेळी कापसाला रोज २ तास ठिबक सिंचन करताे. पावसाने ताण दिल्यास हवामानाच्या अंदाजानूसार जमिनीत कायम वाफसा स्थिती राहिल याची काळजी घेतो.  
  • ऑक्‍टोबरअखेरीस कापूस वेचणीला येतो. चांगले व्यवस्थापन केले तर तणही कमी येते. पावसाळ्यात दोनवेळा तण नियंत्रण करताे.   
  •  मागील हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. फवारण्यांद्वारे फारसे नियंत्रण झाले नाही. मात्र कामगंध सापळे लावल्याने अळ्यांना  अटकाव करता आला.    
  •  कापसाचे फरदड मी कधीच घेत नाही. जानेवारी अखेरीसच कापसाचे पीक काढून क्षेत्र रिकामे केले जाते.
  •  योग्य नियोजनामुळे कापसाचे एकरी किमान १२ क्विंटल उत्पादन मला मिळते. त्यानंतर रब्बी हंगामात हरभरा व मका यांची लागवड केली जाते. मकाही ठिबकवर घेतला जातो. हरभऱ्याच्या सुधारीत जातींची पेरणी करतो. मक्‍याचेही एकरी २५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवितो.   
  • संपर्क : सुनील पाटील, ९७६३९४५६९२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com