सांगलीच्या रसाळ, मधुर द्राक्षांना सर्वत्र मागणी

सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ होत चाचली आहे. द्राक्षाला देशासह परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. यामुळे द्राक्षाची गुणवत्ता चांगली राखण्यात शेतकऱ्यांच्या हातखंडा झाला आहे. केवळ राज्यातच नव्हे, तर भारतात द्राक्षाची विक्री होऊ लागली आहे. देश पातळीवर नव्या बाजारपेठा उपलब्ध झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि नव्या वाटा शोधण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे व्यापाऱ्यांची संख्या वाढल्याने स्पर्धेतून द्राक्षाला अधिक दर मिळू लागला आहे.
 विनायक पाटील दरवर्षी देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांची विक्री करतात.
विनायक पाटील दरवर्षी देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांची विक्री करतात.

सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ होत चाचली आहे. द्राक्षाला देशासह परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. यामुळे द्राक्षाची गुणवत्ता चांगली राखण्यात शेतकऱ्यांच्या हातखंडा झाला आहे. केवळ राज्यातच नव्हे, तर भारतात द्राक्षाची विक्री होऊ लागली आहे. देश पातळीवर नव्या बाजारपेठा उपलब्ध झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि नव्या वाटा शोधण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे व्यापाऱ्यांची संख्या वाढल्याने स्पर्धेतून द्राक्षाला अधिक दर मिळू लागला आहे.   द्राक्षशेतीसाठी केवळ राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध म्हणून सांगली जिल्ह्याचे नाव घेतले जाते. तासगाव, पलूस, वाळवा, मिरज हे त्यातील मुख्य आणि हुकमी द्राक्षपट्टे आहेत. द्राक्षाचा काढणी हंगाम सुरू झाला की, जिल्ह्यात सर्वत्र द्राक्ष उत्पादकांची लगबग सुरू होते.

मार्केटमधील मागणीनुसार वाणबदल

सांगली जिल्ह्याचे ‘टेबलग्रेप्स’सह बेदाणा उत्पादनातही चांगले नाव आहे. बदलत्या जागतिक द्राक्षशेतीसोबत इथला शेतकरीही बदलत निघाला आहे. एकेकाळी प्रचंड नाव मिळवलेले तास ए गणेश हे द्राक्षाचे वाण आजही लोकप्रियता मिळवून आहे. आज मार्केटच्या मागणीनुसार माणिक चमन, सुपर सोनाका, थॉमसन या द्राक्षांच्या वाणांसह शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या आर. के. एसएस या नव्या वाणांकडेही शेतकरी वळला आहे. त्याचा प्रसार तितक्‍याच ताकदीने होतो आहे.   सांगलीची द्राक्ष बाजारपेठ  

  • पूर्वी महाराष्ट्र, दक्षिण भारतापुरती अधिक मर्यादित होती. आता उत्तर भारत, जम्मू काश्‍मिर, बिहार, पंजाबपर्यंत ती विस्तारली आहे.
  • लांबट द्राक्षाला मागणी. त्यामुळे सुपर सोनाका वाणाच्या लागवडीवर भर  
  • द्राक्षाची गोडी, रंग आणि टिकवणक्षमता चांगली
  • जिल्ह्यातून युरोप आणि अाखाती देशात निर्यातीला मिळालाय वाव
  • सिंगापूर, चीन, हॉंगकॉंग, मलेशिया या बाजारपेठाही झाल्या आहेत उपलब्ध
  • केवळ निर्यातीकडे लक्ष देण्यापेक्षा देशांतर्गत मागणीदेखील चांगली अाहे. अनेक ग्राहक व राज्याबाहेरील व्यापारी त्या कारणामुळेच
  • सांगलीच्या द्राक्षाला पसंदी देतात. यामुळे देशांतर्गत विक्री वाढली आहे.  
  • प्रातिनिधीक  स्वरूपातील टक्केवारी

  • निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन व विक्री  : १० ते १५ टक्के
  • बेदाणा निर्मिती :
  • २० टक्के
  • देशांतर्गत विक्री :
  • ७० टक्के
  • आयातशुल्क कमी करण्याची मागणी

    गेल्यावर्षी बांगलादेशातील व्यापारी सांगलीत दाखल झाले. त्यामुळे ही नवी बाजारपेठ निर्माण झाली. या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात द्राक्षाची खरेदी केली. यंदा हे व्यापारी सांगलीत आलेच नाहीत. द्राक्षाला प्रति किलोस शंभर रूपये आयात शुल्क लागू केल्याचे कारण ते सांगतात. सरकारने बांगलादेशाशी बोलून यासंबंधी काही केल्यास आमचा फायदा होईल असे इथले द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगतात.     खुणावणारे देशांतर्गत ‘मार्केट’

    अनेक शेतकरी ‘अर्ली’ फळछाटणी घेतात. जानेवारीच्या दरम्यान द्राक्षे बाजारपेठेत येतात. या वेळी प्रति चार किलोस सुमारे २५० रुपये किंवा त्याहून अधिक दर  मिळतो. फेब्रुवारी-मार्च व त्यानंतरही एप्रिलमध्ये येणाऱ्या द्राक्षांना २२०, २५० व कमाल ३००, ३५० रुपयांपर्यंत दर प्रति चार किलोस मिळतो. अर्थात आवक, हवामान यावर दरांचे बहुतेक गणीत अवलंबून असते. गेल्या दोन ते तीन वर्षांत दर स्थिर राहिले आहेत. अनेकवेळा दर किलोला ३० रुपयांपर्यंतही खाली घसरले आहे.

    द्राक्ष उत्पादकांचे अनुभव मी १९९४ पासून द्राक्षशेती करतोय. बेदाणाही तयार करायाचो. ज्या पद्धतीने शेतीत आधुनिकता आली तसा शेतीत बदल करीत गेलो. आजमितीस सुमारे १५ एकर द्राक्षशेती आहे. यामध्ये माणिक चमन, सुपर सोनाका, थॉमसन या वाणांची लागवड आहे. माणिक चमन आणि थॉमसन ही द्राक्षे युरोपसाठी आहेत. द्राक्ष हे हवामानाला संवेदनशील पीक आहे. साहजिकच निर्यातक्षम द्राक्षांची खूप निगा राखावी लागते. बागेतील घड एकसमान आकाराचे आणि दर्जेदार ठेवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे व्यापारी ज्या वेळी बागेत येतात त्या वेळी नक्कीच दर वाढवून देतात असा माझा अनुभव आहे. - विनायक पाटील, वायफळे, ता. तासगाव, जि. सांगली., : ९९७५७५९४४४

    वडिलांची द्राक्षशेतीची परंपरा कायम ठेवली आहे. निर्यात सुरूच होती. पण पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने अडचणी आल्या. आज निर्यातीपेक्षा देशातंर्गतच विक्री करण्यावर भर देतो. निर्यातक्षम द्राक्षांना मिळणारा दर देशातच मिळू लागला तर नक्कीच फायदा होतो. निर्यातक्षम शेतीसाठी उत्पादनखर्चही वाढतो. मात्र, देशांतर्गंत बाजारपेठ हस्तगत करताना त्यातील सातत्य महत्त्वाचे   आहे. - नीलेश माळी, सावळज, ता. तासगाव,  : ८००७१५७००८     बेदाणा आढावा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून द्राक्षाला मिळणारे दर पाहाता बेदाणा उत्पादकही ‘टेबलग्रेप्स’ कडे वळला आहे. अर्थात समाधानाची बाब अशी, की सांगलीच्या बेदाण्याला भौगोलिक नामांकन (जीआय) मिळाले आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादन घेण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठ मिळण्यास वाव तयार झाला आहे. यंदाच्या हंगामात बेदाण्याच्या दरात ३० रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. यामुळे बेदाणा उत्पादकांना चांगले दिवस येतील. ‘रेसीड्यू फ्री’ बेदाणा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार होऊ लागले आहेत. यामुळे जगात मागणीनुसार विक्री करणे शक्‍य असल्याचे बेदाणा उत्पादकांनी सांगितले.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com