इथे नांदतात हापूस, केसर, रत्ना, पायरी गुण्यागोविंदाने

अनिल परांजपे यांच्या शेतीमध्ये मलगोबा मोठा, हापूस, पायरी अाणि मलगोबा लहान अशा विविध प्रकारच्या अाब्यांच्या जातींची लागवड अाहे.
अनिल परांजपे यांच्या शेतीमध्ये मलगोबा मोठा, हापूस, पायरी अाणि मलगोबा लहान अशा विविध प्रकारच्या अाब्यांच्या जातींची लागवड अाहे.

औरंगाबाद जिल्ह्यात खुल्ताबाद तालुक्‍यातील शंकरपूरवाडी शिवारात डोंगराच्या पायथ्याशी विविध प्रकारच्या आंबा जातींची सुमारे चारशे झाडांची आमराई अनिल परांजपे यांनी वसविली आहे. पाडाला आल्यानंतरच रसाळ, चवदार व अधिकाधिक सेंद्रिय आंब्यांची विक्री ते करतात. थेट विक्रीतूनही त्यांनी फळांना मार्केट तयार केले आहे.

सहायक प्राध्यापक ते शेतकरी मूळचे कोकणचे (राजापूर) असलेले अनिल वामन परांजपे आज अौरंगाबाद जिल्ह्यातील शंकरपूरवाडी (ता. खुल्ताबाद) येथे स्थायिक झाले. त्यांची इथे नांदणारी ही तिसरी पिढी. आजोबा या भागात आले ते इथेच स्थायिक झाले. अनिल यांनी १९८४ ते १९८८ या काळात दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदी नोकरी केली. परंतु नोकरीत मन न रमल्याने राजीनामा देऊन शंकरपूरवाडी येथील शेतीतच राबण्याचा निर्णय घेतला.   फुलवली आमराई

आजोबांनी इथे घेतलेल्या शेतीत आंब्याची जवळपास तीनशे झाडे होती. हापूस, निलम, लंगडा, बोरस्या, मलगोबा, तोतापरी, दिलपसंद, गधेमार, पायरी, अमृत, दूधपेढा अशा ५० ते ६० प्रकारच्या वाणांचा समावेश होता. आपल्या कृषी शिक्षणाचा उपयोग करून आमराई विकसित करण्यासाठी अनिल यांनी  प्रयत्न सुरू केले. केसर, हापूस, रत्ना हे वाण कोकणातून आणून वाढविले. काहींचे कलमीकरण केले. कोयींच्या माध्यमातूनही वृद्धी केली.   जुने वाण जपले

  • तीस बाय ३० फूट अंतरावर लागवड. सन १९९० ते १९९३ या काळात दहा एकरांवर आंबा बागेचा विस्तार. जुने वाण नष्ट होणार नाहीत याचीही घेतली खबरदारी.  
  • बागेत शंभरावर अशी झाडे की त्यांनी १९७२ चा दुष्काळ सोसला.
  • सुरुवातीच्या पाच वर्षांच्या काळात मिळालेले उत्पन्न बागेच्या नियोजनासाठी वापरून नव्या वाणांची लागवड   
  • पाण्याचे नियोजन

  • सन १९९० ते १९९५- पाच वर्षे ठिबकने पाणी. त्यानंतर पारंपरिक पद्धत व निसर्गाच्या भरवश्‍यावर बाग सोडण्याचा निर्णय. त्यामुळे झाडांना पाण्याचा ताण सोसण्याची व त्यातून तरण्याची सवय झाली.
  • फळे बोराएवढी झाली की पाणी सुरू तर पाड लागण्याच्या एक महिन्याआधी बंद.
  • बहार नियोजनानुसार एप्रिल अखेरपर्यंत पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा पाणी. या नियोजनामुळे फळगळ थांबून फळे देठाला पक्‍की होत असल्याचा अनिल यांचा अनुभव. दोन विहिरी दिमतीला.
  •   ठळक बाबी

  • अधिकाधिक सेंद्रिय व्यवस्थापन. मोहोर येण्याआधी व फळसेटिंगनंतर अशा दोन वेळा कीडनाशकांची फवारणी.
  • आंतरमशागतीवर विशेष भर. जमीन भुसभुशीत राहण्यासाठी विशेष काळजी.
  • झाडाखाली पडणारा पालापाचोळा जागेवरच कुजविला जातो. तीस वर्षांच्या कारकिर्दीत रासायनिक खते अत्यंत कमी किंवा शक्यतो नाहीच. शेणखताचा चांगला वापर.
  • खर्चाच्या मागे लागून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न नाही.  
  • तीस एकर शेती बटईने

    तीस एकर शेती बटईने. पाच कुटुंबे ती कसतात. बटईदारांची दुसरी पिढी परांजपे यांच्या शेतात राबते आहे. त्यांच्यावर टाकलेला विश्वासच महत्त्वाचा ठरला. या शेतीत बाजरी, मका, तूर, गहू, हरभरा आदी पिके.   परांजपे यांची यशाची पाच गृहितके

  • फळबाग, वर्षाचं पीक, धान्यपीक, भाजीपाला आणि जनावरे.
  • यातील कोणतीही तीन फायद्यात तर दोन तोट्यात असा अनुभव.  
  • दरवर्षी पन्नास हजारांपर्यंत खर्च तर तीन लाखाचं उत्पन्न आंबा बाग देते.  
  • नियमांना कडक पण स्वभावाने दिलदार स्वभावाचे अनिल सर्वांनाच सक्षमपणे उभे करण्याचे काम करतात. पुढच्या पिढीला सकस जमीन देण्याची त्यांची धडपड.  
  • सगळी शेती तोट्यात गेली तरी जास्त वर्षे जगणाऱ्या फळपिकांनी अनेकदा साथ दिल्याचा त्यांचा अनुभव सांगतो.
  • पुढच्या पिढीला शेतीची आवड अमेरिकेत वैद्यकशास्त्राची पदवी घेतलेला मुलगा तर कायद्याची पदवीधर मुलगी अशा दोघांनाही शेतीची विशेष आवड आहे. पुढच्या पिढीची नाळ शेतीशी जुळवून ठेवण्याचे काम परांजपे दांपत्याने केले आहे. आंबा झाडांची संख्या (सुमारे) हापूस :१०० रत्ना : ५०   केसर : ५० गावरान : २००  

    नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले किंवा पाडाला आल्यानंतरच विक्री. त्यामुळे रसाळ, चवदार, गोड चवीचे आंबे ग्राहकांना मिळतात. दर- किलोचे

  • केसर, रत्ना - १०० रु. हापूस- २०० रु.
  • वर्षाला विक्री - एक ते दीड टन  
  • औरंगाबादच्या जाधव मंडीतही दहा ते वीस टन आंब्यांची ठोक विक्री. गावरान आंब्यांना सहा ते दहा रुपये प्रतिकिलो दर  
  • काही वर्षांपूर्वी ३०० किलो केसर आंब्यांची लंडनला पणन विभागाच्या साह्याने निर्यात
  • हे व्यावसायिक फक्त परांजपे यांचेच आंबे विकतात. त्यांना मार्केटिंगमध्ये परांजपे यांनी तयार केले आहे.
  • आंबा- मार्केटिंग- विक्री अौरंगाबाद : डिपार्टमेंटल स्टोअर, चष्मा दुकान अशी थेट विक्रीची दोन ठिकाणे उत्पन्न देतेय जांभूळ

  • आंब्याचा मोसम संपला की जांभळांचा हंगाम सुरू.  
  • चाळीस एकरांत बांधावर- जांभूळ- ३० झाडे- उत्पादन- ३ टन-दर ५० ते १०० रु. प्रति किलो.
  • एका व्यक्‍तीकडून दरवर्षी व्यवस्थितरीत्या काढणी करून घेतात.
  • अंजलीताईंची समर्थ साथ प्राध्यापक पदाची नोकरी सोडून शेतीची जोखीम स्वीकारणाऱ्या अनिल यांच्या पाठीशी पत्नी अंजली खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या साथीमुळेच आपण शेती कसू शकलो, जगण्याचा खरा आनंद मिळाला, असं अनिल अभिमानानं सांगतात. झाड तोडायचे नाही हा नियम शेतातील धुऱ्या-बांधावर वाढलेले कोणतेही झाड तोडायचे नाही हा नियम अनिल यांनी सर्वांसाठी घालून दिला आहे. त्यामुळेच शिवारात बोरी, बाभळीसह विविध झाडांची संख्या लक्षणीय दिसते.

    संपकर्  : अनिल परांजपे, ७५८८८१८३९४, ७०३०४०९४३०  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com