नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्य

तुरीच्या काड्यांचा उपयोग आच्छादन म्हणून होतो.
तुरीच्या काड्यांचा उपयोग आच्छादन म्हणून होतो.

अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली) येथील अभिजित देशमुख तीन वर्षांपाससून सुमारे २४ एकरांत नैसर्गिक शेतीचे प्रयोग करीत आहेत. विशेष म्हणजे आपल्या शेतीमालाला त्यांनी विस्तृत बाजारपेठही देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

देशमुख टेक्‍सटाइल इंजिनियर आहेत. त्यांनी मार्केटिंग विषयात पदविका घेतली आहे. सुमारे १४ वर्षे खासगी नोकरीतील अनुभव घेतल्यानंतर आता राजिनामा देत त्यांनी पूर्णवेळ शेती सुरू केली आहे. त्यांचे खारपाणपट्टयात सहा एकर क्षेत्र आहे. तूर, मूग, उडीद, हळद, गहू, भाजीपाला आदी पिके ते घेतात. विक्रीसाठी ‘अमरावती नॅचरल'' नावाने त्यांनी आउटलेट सुरू केले आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांची किमान ५० उत्पादनांची विक्रीही ते करतात.     मातीची सुपीकता हा महत्त्वाचा उद्देश नैसर्गिक शेती करताना मातीची प्रत, सुपीकता या बाबींवर देशमुख यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केले आहे. रासायनिक खते, कीडनाशके यांचा वापर पूर्ण बंद आहे. तीन देशी गायी आहेत. त्याआधारे जीवामृत, गोमूत्राचा वापर ते करतात. द्विदल पिके घेऊन त्यामार्फत जमिनीला नत्र पुरविण्याचे काम होते.     जिवाणूसंवर्धन जमिनीचे आरोग्य राखण्याठी देशी गायीविना शेती नाही. गायीच्या शेणात व मूत्रात विश्‍वातील सर्व ऊर्जास्रोत निवास करतात. हजारो वर्षांपासून या दोन घटकांना शेतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाभदायक सूक्ष्मजीवांना आकर्षित करण्यासाठी गायीच्या शेणाएवढे सामर्थ्यवान काहीच नाही असे अभिजित सांगतात. जमिनीतील कोटी उपयुक्‍त जिवाणू अन्नद्रव्ये मुळांना पोचविण्यात महत्वाची भूमिका बजावतात. रासायनिक शेतीत खते, कीडनाशके, तणनाशके व जमिनीची ट्रॅक्‍टरने खोलवर केलेली मशागत यामुळे त्यांचे अस्तित्व संपलेले असते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पुनर्स्थापित करणे गरजेचे राहते.

उत्पादकतेत वाढ नैसर्गिक शेतीपद्धतीत जमिनीचे आरोग्य राखले जाते. उत्पादकता खर्चही कमी होतो. मात्र अनेक शेतकऱ्यांना या शेती पद्धतीत उत्पादकता कम मिळते असे वाटते. परंतु हे चुकीचे असल्याचे अभिजित सांगतात. उदाहरणच द्यायचे तर मुगाचे एकरी सव्वापाच क्‍विंटल उत्पादन त्यांना मिळाले आहे. याउलट रासायनिक शेती पद्धतीतील शेतकऱ्यांना हेच उत्पादन अवघे साडेचार क्‍विंटलपर्यंतही मिळाले आहे.

सेंद्रिय घटकांचा वापर सेंद्रिय निविष्ठांमध्ये आंबट ताक, जीवामृत यांचा वापरही ते करतात. एकरी २०० लिटर जीवामृत दर आठ दिवसांनी ते देतात. त्यासाठी जमिनीत ओलावा असावा लागतो. जीवामृत तयार करताना प्रति २०० लिटर पाणी, देशी गाईचे ताजे शेण, दहा लिटर गोमूत्र, एक किलो बेसन, द्विदल धान्य, एक किलो काळा गूळ, ज्या शेतात फवारणार त्यातील मूठभर माती यांचा वापर होतो. हे द्रावण तीन दिवस सकाळ-संध्याकाळ घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावे. फवारणी, ठिबक किंवा तुषार तसेच पाट पाण्याद्वारेही ते देता येते असे देशमुख सांगतात.  

देशमुख यांच्या शेतीतील तत्त्वे

  • प्रदूषणमुक्‍त पाणी आणि जीवाणू संवर्धन करणारी जमीन असली, तर पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटक या वातावरणात तरू शकतो, असे अभिजित सांगतात. त्यादृष्टीनेच त्यांचे शेती व्यवस्थापन असते.
  • रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे पाणी प्रदूषित होते. जमिनीतील सूक्ष्मजीवांचा ऱ्हास होतो. त्याचा जमिनीवर प्रतिकूल परिणाम होतो या विचारांवर अभिजित यांची श्रद्धा आहे.
  • पीक अवशेष, गांडुळांचे महत्त्व

  • झाडांच्या मुळांभोवती वाफसा, भरपूर सेंद्रीय पदार्थ, पुरेशी आर्द्रता व ऊब निर्माण केली की पिके अन्नद्रव्ये घेऊ शकतील अशी स्थिती तयार होते. पीक अवशेष हा त्यातील मुख्य घटक. मग बाहेरून काही देण्याची गरज भासत नाही. पुढे जमिनीची सुपीकता वाढून उत्पादकतेत वाढ होते.
  • जमिनीतील गांडुळे सक्रिय होऊन त्यांच्या विष्ठेद्वारा अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात मुळांना मिळतात. ही विष्ठाच सर्व अन्नद्रव्यांचा साठा असल्याचे अभिजित सांगतात.  - अभिजित देशमुख, ९९६०६३७५२३
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com