agriculture advisory in marathi, brinjal crop advisory | Page 2 ||| Agrowon

वांगी पीक सल्ला

सी.बी. बाचकर, एस.ए. पवार, डॉ. एम.एन.भालेकर
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सद्यस्थितीत वांगी पिकात पर्णगुच्छ, फळसड, पानावरील करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच शेंडे व फळे पोखरणारी अळी या कीडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्वरित त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात.

सद्यस्थितीत वांगी पिकात पर्णगुच्छ, फळसड, पानावरील करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच शेंडे व फळे पोखरणारी अळी या कीडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्वरित त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात.

वांगी पिकातील पर्णगुच्छ रोग.
प्रसार : तुडतुड्यांमार्फत होतो.
लक्षणे : रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटते. पाने लहान आकाराची, मऊ पातळ व पिवळसर गुच्छासारखी झालेली दिसतात. अशा झाडांना फुले लागत नाहीत.
नियंत्रण :
वांगी कुळातील तणांचा नाश करावा.
पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांपासून दर १५ - २० दिवसांच्या अंतराने टेट्रासायक्लिन *१ - १.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
लागवडीनंतर दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने निंबोळी अर्क ४ टक्के (अॅझाडिरॅक्टीन ४,००० पीपीएम ४ मि.लि. प्रतिलिटर पाणी) याप्रमाणात फवारणी करावी.
   
पानांवरील करपा व फळसड :
रोगकारक बुरशी : फेमॉप्सीन व्हेक्झान्स
प्रादुर्भावाचे ठिकाण : पाने व फळे
लक्षणे : करड्या ते तपकिरी रंगाचे गोलाकार ते लंबाकृती डाग पान व फळांवर दिसतात. फळे सडतात.
नियंत्रण :
फवारणी प्रतिलिटर पाणी
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
मॅंकोझेब २.५ ग्रॅम
वेळ : रोगाची लक्षणे दिसताच

कीडनियंत्रण :
शेंडे व फळ पोखरणारी अळी :   
एकात्मिक कीड नियंत्रण :
कीडग्रस्त शेंडे दर आठवड्यास खुडून नष्ट करावेत.
कीडग्रस्त फळे जमिनीत गाडून टाकावीत.
ल्युसील्युर कामगंध सापळे (प्रतिहेक्टरी १००)वापरावेत. त्यातील ल्युर दोन महिन्यांनी बदलावा.
अधून- मधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
क्विनॉलफॉस (२५ टक्के) २ मि.लि. किंवा
इमामेक्टीन बेंझोएट (५ एस.जी.) ०.४ ग्रॅम किंवा
क्लोरअॅन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एस.सी.) ०.४ मि.लि.

संपर्क : डाॅ. एम. एन. भालेकर, ०२४२६- २४३३४२
(अखिल भारतीय समन्वयित संशाेधन प्रकल्प, भाजीपाला पिके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

टॅग्स

इतर फळभाज्या
खरीप हंगामातील भाजीपाला लागवडआपल्या देशात भाजीपाल्यासाठी योग्य हवामा­न,...
फळवर्गीय भाजीपाला पीक सल्ला सद्यःस्थितीत मिरचीवर चुरडा-मुरडा...
कांदा, लसूण पीक सल्लासद्यस्थितीत कांदा पिकाच्या बीजोत्पादनासाठी...
कांदा पीक सल्लामे महिन्यात खरीप कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार...
घेवडा लागवडीविषयी माहिती...घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...
वांगी पीक सल्लासद्यस्थितीत वांगी पिकात पर्णगुच्छ, फळसड, पानावरील...
कृषी सल्ला : ऊस, कांदा, लसून घास,...सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण,...
फळवर्गीय भाजीपाला सल्लामिरची रोगनियंत्रण : चुरडा- मुरडा नियंत्रण...
बदलत्या तापमानात पिकांची काळजी...सद्यस्थितीत तापमानात दिवसा वाढ व रात्री घट असे...
‘एक्झॉटिक’ भाजीपाला शेतीतून वेगळी वाट...सांगली जिल्ह्यातील शिगाव (ता. वाळवा) येथील...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
कोबीवर्गीय भाजीपाला पिकांवरील किडींचे...कोबीवर्गीय भाजीपाला पिकावर सद्यस्थितीत काळी माशी...
शिफारशीनुसार द्या शेवग्याला खतमात्राशेवगा पिकाला शेणखताबरोबरच माती परीक्षणानुसार...
कोबीवरील भुरी, घाण्या रोगनियंत्रणराज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट...
कोबीवर्गीय पिकांवरील रोगांचे नियंत्रण सद्यःस्थितीत कोबीवर्गीय पिके वाढीच्या अवस्थेत...
भाजीपाल्यास द्या गरजेइतकेच पाणीभाजीपाला पिकास योग्य प्रमाणात पाणी मिळण्यासाठी...
वाटाणा पीक सल्लारब्बी हंगामात भरपूर आर्थिक उत्पन्न देणारे वाटाणा...
वाटाणा पीक सल्लारब्बी हंगामात भरपूर आर्थिक उत्पन्न देणारे वाटाणा...
शेंगवर्गीय भाजीपाला लागवडशेंगवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये गवार, श्रावण घेवडा...