Agriculture Agricultural Marathi News article regarding seed conservation by Vivak Pathrudkar,Jeuur,Dist. solapur | Page 2 ||| Agrowon

देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंक

सुदर्शन सुतार
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

भाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी वनस्पतींच्या देशी बियाणे संग्रहाच्या छंदातून जेऊर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विवेक विलास पाथ्रुडकर या शिक्षकाने ‘सीड बॅंक’ तयार केली आहे. त्यांच्या संग्रहात विविध प्रकारची तीनशेहून अधिक बियाणी आहेत. या बियाण्यांच्या देवाण घेवाणीसाठी त्यांनी खास गटदेखील तयार केला आहे. 

भाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी वनस्पतींच्या देशी बियाणे संग्रहाच्या छंदातून जेऊर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विवेक विलास पाथ्रुडकर या शिक्षकाने ‘सीड बॅंक’ तयार केली आहे. त्यांच्या संग्रहात विविध प्रकारची तीनशेहून अधिक बियाणी आहेत. या बियाण्यांच्या देवाण घेवाणीसाठी त्यांनी खास गटदेखील तयार केला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी-करमाळा महामार्गावरील बाजारपेठेचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या जेऊरमध्ये अगदी मध्यवस्तीत विवेक पाथ्रुडकर यांचे घर आहे. पाथ्रुडकर हे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या पत्नी अपर्णा या देखील शिक्षिका आहेत. त्यांचे वडील व्यावसायिक आहेत. घरची थोडी शेत जमीन आहे. पण त्यातील बहुतांश रस्त्याच्या कामासाठी संपादित झाली. त्यामुळे इच्छा असूनही शेतीत त्यांना फार काही करता आले नाही, ही सल पाथ्रुडकर कुटुंबाच्या मनात कायम आहे. विवेक यांची आई वैशाली यांना शेतीचा छंद. मात्र, सध्या शेती करता आली नसली तरी परसबागेत त्यांनी विविध प्रकारची रोपे लावली आहेत. हाच छंद पुढे विवेक यांनीही जोपासला. गेल्या चार वर्षांपासून त्यांचा हा छंद झाडांबरोबरच देशी बियाण्यांच्या संवर्धानाकडे वळला. सध्या भाजीपाल्यामध्ये वाढत असलेल्या संकरीकरणातून त्यांना देशी बियाण्यांच्या संवर्धानाबाबत चिंता सतावत होती. त्यातूनच त्यांनी घरी देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी ‘सीड बॅंक’ तयार केली. पण ही सीड बॅंक व्यवसाय म्हणून नव्हे, तर छंद म्हणून स्वीकारली. 

अशी आहे  ‘एसव्हीएस’ सीड बॅंक 
फळभाज्या, भाजीपाल्याशिवायही काही दुर्मीळ वनस्पतींचे बियाणे विवेक पाथ्रुडकर यांच्याकडे आहे. काही वर्षांपूर्वी देशी बियाणे संवर्धनाच्या छंदातून विवेक यांचा श्रीरामपुरातील संजय नरोटे आणि बीडच्या श्रुती ओझा यांच्याशी संपर्क झाला. वास्तविक, त्यांची पूर्वीची कोणतीही ओळख नव्हती. विशेष म्हणजे अद्यापही हे तिघे एकमेकांना एकत्र भेटलेले नाहीत. तिघेही तीन वेगवेगळ्या जिल्ह्यात रहातात. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. पण त्यांच्यातील समान धागा म्हणजे बागकाम आवड आणि बियाणे साठवण्याचा छंद. याच छंदाने त्यांना एकत्र केले. विवेक पाथ्रुडकर प्राथमिक शिक्षक आहेत. संजय नरोटे शेफ आहेत, तर श्रुती ओझा ही अजून पदवीचे शिक्षण घेत आहे. सीडबॅंकेचे नाव या तिघांच्या आद्याक्षरातून ‘एसव्हीएस’ असे झाले. आज हे तिघेही त्यांच्या ठिकाणाहून बियाणे संवर्धन आणि प्रचार-प्रसाराचे काम करतात, तेही ना नफा, ना तोटा या तत्त्वावर.देशी बियाणे संवर्धनाचा  विषय केवळ प्रसारापुरता न राहाता चळवळ बनला आहे.

 बियाण्यांची देवाण-घेवाण 
गेल्या पाच वर्षांपासून विवेक यांचे नाव देशी बियाणे संवर्धानामध्ये आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता बरेच शेतकरी आणि बागकाम करणाऱ्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडे थेट मोबाईल किंवा पत्राद्वारे बियाण्यांची मागणी होते. अनेकजण त्यांच्याकडे असलेले बियाणेही अगदी मोफत विवेक यांच्याकडे पाठवतात किंवा त्या बदल्यात दुसरे देशी बियाणे मागतात. अर्थात, या बियाण्यांची देवाण-घेवाण ही मोजक्‍या संख्येत किंवा ग्रॅममध्ये केली जाते. त्यासाठी पोस्टखर्च वगळता अन्य कोणतेही शुल्क आकारले जात नाही. विवेक यांनी आठवड्यातील सोमवार किंवा मंगळवार हा बियाणे पाठवण्याचा वार ठरवला आहे. कोणाला कोणते बी पाठवले, याची माहिती गटाच्या फेसबुकपेजवर दिली जाते. या शिवाय किती आणि कोणते बियाणे शिल्लक आहे, याची माहिती दिली जाते. पण कोणत्याही प्रकारे बियांची खरेदी-विक्री होणार नाही याची काळजी घेतली जाते. 

जांभळी हळद अन्‌ पांढरा पळस
जेऊर येथे विवेक यांच्या दोन मजली घरावर मोठी गच्ची आहे. घरातील सीड बॅंकेबरोबरच ज्या वनस्पतींच्या बिया दुर्मीळ किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांच्या रोपांची निर्मिती ते करतात. एखादे दुर्मीळ बियाणे त्यांना मिळाले, पण त्याची माहिती मिळाली नाही, तर लागलीच ते  बियाणे गच्चीवरील बागेत लावतात. त्याच्या वाढीनंतर निरीक्षण करून त्याच्या बिया जपण्याकडे त्यांचा कल असतो. प्रामुख्याने पांढरा पळस, लाल हादगा, जांभळी हळद, पिवळा धोतरा, गुलाबी हादगा, गुलाबी गोकर्ण अशी अतिशय दुर्मीळ देशी बियाणी त्यांच्या सीडबॅंकेत उपलब्ध आहेत.

सीड बॅंकेतील उपलब्ध बियाणे 
भाजीपाला ः  अंबाडी, पालक, मेथी, शेपू, चाकवत, पोकळा, लालमाठ, राजगिरा, कोबी, करडई, तांदूळजा, तांबडे पान, कोथिंबीर, कडिपत्ता, मायाळू, काकडी, घोसाळे, कर्टुले, डबल बी, मुळा, गाजर, ढेमसे, पावटा, घेवडा, वाल, शेंदाड(चिबूड), खरबूज, कलिंगड, टोमॅटो, पडवळ, अबई, पठाडी, गवार, दोडका, दूधी व काशिफळ, मिरची,  भोपळा, कोहळा, डांगर, शेवगा, हादगा, भेंडी, रानभेंडी, कारले, वाटाणा, कारळे, अळसुंदा आदी.
धान्य : चवळी, हुलगा, राजमा, मका, ज्वारी, गहू, उडीद, भगर आदी.
वृक्ष/औषधी झाडे : सीता अशोक, अशोक, करंज, कडूनिंब, राय आवळा, आपटा, शमी, बेल, खैर, कवठ, मेंदी, खजूर, बहावा, चिंच, रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, सरकी, देव कापूस, शिरीष, कांचन, लाल हादगा, गुलाबी हादगा, अर्जुन, ऐन, शिवण, गुंज, रीठा. तुळशीचे विविध प्रकार, रतनगुंज, ताम्हण, बिक्‍सा, गुलमोहर, विलायती चिंच, हिरडा, एरंड, चिकू, पपई, कोकम, बोर, जांभूळ, काटेसावर, कॉफी, अपामारी, रिंगणी, टिकोमा,पळस आदी.
फुलझाडे : अबोली, पारिजातक, पेंटास, कमळ, डेझी, लॅव्हेंडर, आईस्क्रीम क्रीपर, सदाफुली, डेलिया, रेनलिली, मेक्‍सिकन सूर्यफूल, भेंडी, गुलाब, वैजयंती, गणेश वेल, मॉर्निंग ग्लोरी, बदक वेल, गुलबक्षी, गोकर्ण, बेसील, चिनी गुलाब, लसूण वेल, कॉसमॉस, झेंडू, झिनिया, अक्कलकाढा, गॅलार्डिया, तेरडा,ॲडेनियम, लाजाळू, पॅशन फ्रूट, चांदणी वेल, कोंबडा, शंकासूर, कोरांटी, जांभळा, पिवळा धोतरा, हळदी कुंकू, सोनचाफा, कर्दळ या व इतर अनेक परदेशी फुलांच्या बिया. याशिवाय नावे माहीत नसलेल्या अनेक वनस्पतींच्या बियांचा संग्रह.

 

देशी बियाणे संवर्धन

देशी बियाणे, भाज्यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. जुनं ते सोनं, या विचाराने मी देशी बियाणे संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले. आमच्या तिघांचे विचार जुळले आणि आम्ही समूह स्थापन केला. आज आमची विश्‍वासार्हता, लोकांचा संपर्क वाढला आहे.
- श्रुती ओझा, बीड

 

लोकांचा चांगला प्रतिसाद

सीड बॅंकेतून पैसे मिळवणे, हा आमचा उद्देश अजिबात नाही. केवळ देशी बियाण्यांचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार हाच आमचा अजेंडा आहे. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. हेही एक प्रकारचे प्रोत्साहनच आहे.
-संजय नरोटे, श्रीरामपूर (जि. नगर)

 

संग्रह वाढवण्याचा प्रयत्न

मला देशी बियाण्यांच्या साठवणुकीची आवड लहानपणापासून होती. पण आता संग्रहाचा पसारा वाढला आहे, हे माझ्या एकट्याचे काम राहिलेले नाही. आम्ही तिघे मित्र आणि आमच्या कुटुंबीयांनी दिलेली साथ, त्यामुळे हे सर्व शक्‍य झाले. यापुढेही अधिकाधिक संग्रह वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 - विवेक पाथ्रुडकर, ९४२०७०१३६०

 

 

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
यांत्रिकीरणातून शेती केली सुलभ,...नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
एरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगीनागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी...
कणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी...कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी...
शेतकरी गट, ‘एफपीओ’ची सबलीकरणाची वाट अवघडऔरंगाबाद : गटशेती सबलीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या...
‘स्मार्ट’ची तयारी पूर्ण; दिल्लीत होणार...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण...
कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान...सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या...
देशात यंदा कडधान्य आयात ४६ टक्के वाढलीनवी दिल्ली: देशात यंदा कडधान्य उत्पादन...
थंडी गायब; किमान तापमानात वाढ पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
हिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने...
तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात...नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या...
पाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला  ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
खेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...
राज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
थकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...
केंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...
शेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...
निर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस...