अकोला कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केली पदकांची लयलूट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी या विषयातील आचार्य पदवी राजेश मुरुमकार यांनी स्वीकारली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी या विषयातील आचार्य पदवी राजेश मुरुमकार यांनी स्वीकारली.

अकोला  ः येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३४ व्या दिक्षान्त सोहळ्यात सर्वाधिक पदके मिळविण्यात मुलींनी बाजी मारली.

या वर्षी अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाची बीएस्सी कृषीची विद्यार्थिनी गायत्री देवी के. हिने चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन रोख पुरस्कार अशी पदके मिळवत अव्वल स्थान प्राप्त केले. दीक्षान्त सोहळ्याला ती अनुपस्थित होती. मात्र, इतर विद्यार्थ्यांनी जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कृषिमंत्री दादा भुसे, आदित्यकुमार मिश्रा, कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते पदके स्वीकारली.  सोहळ्यात बीटेक कृषी अभियांत्रिकीचा विद्यार्थी विक्रमकुमार पुर्बे याने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन रोख पुरस्कार मिळवित मुलांच्या गटात अव्वल स्थान मिळवले. येथील स्थानिक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहे. एमएसस्सी कृषीमध्ये अमोल संजय येवले याने पाच सुवर्ण, एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली.

यानंतर एमएस्सीची अंकिता संतोष उंबरकर हिने तीन सुवर्ण, दोन रौप्य अशी पाच पदके मिळवली. अक्षदा भोंडवे हिने चार पदके मिळवली. एमएस्सी उद्यान विद्याशाखेची अमृता रमेश पवार हिने दोन सुवर्ण, दोन रोख असे चार पुरस्कार मिळवले. या सोहळ्यात २८ सुवर्ण, १६ रौप्य, ३२ रोख आणि तीन पुस्तक स्वरूपातील पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या सोहळ्यात उत्कृष्ट शिक्षक पारितोषिक सहयोगी प्रा. डॉ. संदीप हाडोळ यांना, आयसीएआर उत्कृष्ट शिक्षक डॉ. सुनील भालकरे, उत्कृष्ट संशोधक पारितोषिक (डॉ. के. जी. जोशी व राधाकिसन शांती मल्होत्रा) हरभरा पैदासकार तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अर्चना थोरात, डॉ. ए. एन. पाटील, कनिष्ठ वनस्पती पैदासकार एम. पी. मेश्राम, कनिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. व्ही. के. गौड, कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. व्ही. आर. गुप्ता, सहयोगी प्रा. डॉ. पी. व्ही. शेंडे, डॉ. डी.व्ही. दुर्गे, डॉ. जी. आर. श्‍यामकुंवर, डॉ. एन. व्ही. कायंदे, डॉ. डी. एस. फड यांना प्रदान करण्यात आले. दीपक भांडे, राजेश काळपांडे यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले.

आचार्य पदवी मिळवणारे विद्यार्थी यशवंत शंभरकर, प्रमोद पंचभाई, नागनाथ जंगवाड, सागर इंगळे, योगेश पवार, लीना परिहार, हरीश कुंभलकर, सोनल गजभिये, यशोदा ईथ्थर, साईनाथ झाल्टे, कृष्णनंदा इंगळे, योगिता गोरे, संतोष मदनकर, गणेश व्यवहारे, प्रतीक बोबडे, योगिता यादव, अशोक आगे, उषा सातपुते, तृप्ती राठोड, प्राजक्ता तेलंगे, संदेश पवार, वंदना मोहोड, माधवी जंगीलवाड, नंदकिशोर लव्हे, ज्योती पाटील, स्वप्नील तायडे, प्रितम चिरडे, संजय शेगोकार, स्वप्नील ठाकरे, रमेश कोळी, शैलेश सरनाईक, हेमंतकुमार डिके, दीपक मोहळे, श्‍वेता वानखडे, सीमा ठाकरे, गोविंद बनसोडे, रतिराम खोब्रागडे, संजुला भवर, राजलक्ष्मी पी., विक्की नंदेश्‍वर, हेमंत रोकडे, अमोल धोडगे, गजानन वसू, स्मिता सोळंकी, राखी मेश्राम,  राजेश मुरुमकार, कंचन गेडाम, विवेककुमार खांबलकर, अमरदीप डेरे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com