Agriculture Agricultural Marathi News corona fear in villagers Solapur Maharashtra | Agrowon

येळेगाव, वांगी परिसरातील ग्रामस्थांना `कोरोना`ची धास्ती

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संशयित रुग्ण सुदैवाने अद्याप सापडलेला नाही. पण दक्षिण सोलापुरातील येळेगाव, वांगी परिसरातील एका बेदाणा शेडवर ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील एक कामगार कोरोना पॅाझिटिव्ह आढळला. सध्या हा मजूर त्याच्या गावी मध्यप्रदेशमध्ये आहे. पण पंधरवड्यापूर्वी त्याच्या संपर्कातील सर्वांची तपासणी जिल्हा प्रशासनाने सुरु केल्याने परिसरातील पाच ते सहा गावात ‘कोरोना’ची चांगलीच धास्ती बसली आहे. त्यामुळे या भागात चिंतेचे वातावरण आहे. पण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घाबरु नका, योग्य ती तपासणी झाल्यानतंरच चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले आहे. 

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संशयित रुग्ण सुदैवाने अद्याप सापडलेला नाही. पण दक्षिण सोलापुरातील येळेगाव, वांगी परिसरातील एका बेदाणा शेडवर ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील एक कामगार कोरोना पॅाझिटिव्ह आढळला. सध्या हा मजूर त्याच्या गावी मध्यप्रदेशमध्ये आहे. पण पंधरवड्यापूर्वी त्याच्या संपर्कातील सर्वांची तपासणी जिल्हा प्रशासनाने सुरु केल्याने परिसरातील पाच ते सहा गावात ‘कोरोना’ची चांगलीच धास्ती बसली आहे. त्यामुळे या भागात चिंतेचे वातावरण आहे. पण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घाबरु नका, योग्य ती तपासणी झाल्यानतंरच चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले आहे. 

ग्वाल्हेरमध्ये तिथल्या जिल्हा प्रशासनाला दोनच दिवसांपूर्वी हा रुग्ण कोरोना संशयित आढळला. तिकडून तातडीने जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाली. वांगी, येळेगाव, गावडेवाडी हा परिसर जिल्हा प्रशासनाने सील केला. तसेच या गावाला जाणारे सर्व रस्ते सील केले. तसेच गावातील एकालाही बाहेर आणि आत सोडले जात नाही. अतिशय वेगाने प्रशासनाने या भागातील अडीच हजारांहून अधिक लोकांची तपासणी केली. विशेष म्हणजे आत्तापर्यंत सोलापूर जिल्ह्यात एकही ‘कोरोना’चा रुग्ण आढळलेला नाही. पण इथून गेलेला कामगार कोरोना पॅाझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली. महादेव पांगळे आणि खांडेकर यांच्या बेदाणा शेडवर हा कामगार कामावर होता. हा कामगार इथे वास्तव्यास असताना कोणा कोणाला भेटला, याचीही माहिती घेण्यात येत आहे.

त्यामुळे या परिसरात सध्या चिंतेचे वातावरण असले, तरी तालुक्यातील अन्य गावांत मात्र ‘कोरोना’ची चागंलीच धास्ती बसली आहे. या कामगारासोबत काम करणाऱ्या आणि त्याला भेटलेल्या कामगारांची तपासणी सुरु आहे. पण पंधरा दिवसापूर्वी तो ग्वाल्हेरला गेला. त्या दरम्यान इथल्या एकालाही अशी कोणतीच लक्षणे आढळली नाहीत. बहुधा प्रवासादरम्यान संबंधित कामगाराला त्याची लागण झाली असावी, असे वैद्यकीय पथकाला वाटते. पण आता बहुतेकांचे नमुने तपासणीस घेतले आहेत. त्याच्या तपासणी अहवालानंतरच त्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. पण तूर्त तरी ग्रामस्थ घाबरून गेले आहेत.


इतर बातम्या
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...