Agriculture Agricultural Marathi News corona patient found Nashik Maharashtra | Agrowon

नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सज्ज झाली असून पुढील कार्यवाही तातडीने सुरु करण्यात आली आहे. 

नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सज्ज झाली असून पुढील कार्यवाही तातडीने सुरु करण्यात आली आहे. 

हा कोरोना बाधित रुग्ण ३० वर्षाचा तरुण असून तो निफाड तालुक्‍यातील आहे. त्याचा तपासणीसाठी पाठवलेला ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण तपासणीसाठी पाठविलेल्या ९ नमुन्यांपैकी आठ नमुने निगेटिव्ह आले असून एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याचा अहवाल प्राप्त होताच प्रशासन सतर्क झाले आहे. 

जिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लासलगाव (ता.निफाड) जवळील नंदनवननगर, पिंपळगावनजीक येथील रहिवासी असलेला हा कोरोना बाधित तरुण रजानगर येथील बेकरीत कामाला होता. १२ मार्चला खोकला व ताप आल्याने त्याने खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले; परंतु त्याला बरे न वाटल्याने तो लासलगाव ग्रामीण रुग्णालयात २५ मार्चला उपचारासाठी गेला. न्यूमोनियासदृश लक्षणे दिसत असल्याने त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

संबंधित तरुण स्वत:च्या वाहनाने २७ मार्चला नाशिक येथे उपचारासाठी दाखल झाला. त्याला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने विलगीकरण कक्षात दाखल केले. त्याच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी (ता. २९) प्राप्त झाला, त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. विलगीकरण कक्षात दाखल सात रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ती सुधारत आहे. 

कुटुंबातील चौघे क्वारंटाइन  
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या संनियंत्रणानुसार कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील चौघांना क्वारंटाइन कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याशिवाय त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हा आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांचे पथक लासलगाव येथे रवाना झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला युवक हा निफाड येथे गेला असता त्यास ‘कोरोना’ची लागण झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. त्यादृष्टीने निफाड परिसरात कोण परदेशातून आले आहे का याचा शोध घेतला जात आहे.  


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...