सातारा जिल्ह्यात १२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

सातारा :कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील २, फलटण उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील २ व कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ८ अशा एकूण १२ नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी ११ निकट सहवासीत असून फलटण येथील कोरोना केअर सेंटर मधील एका महिला आरोग्य सेविकेचा यात समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
संग्रहित छायाचित्र

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता ९२ वर गेली आहे. सोमवारी साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील दोन सारी सदृश आजाराने मृत्यू झालेल्या नागरिकांचे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. याच रुग्णालयात दाखल असणाऱ्या तीन बाधित रुग्णांचे १४ दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ४८ आणि कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ६८ असे एकूण ११६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचेही पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com