Agriculture Agricultural Marathi News Demand for to give two months to open an account in a nationalized bank Mumbai | Agrowon

राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते उघडण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

मुंबई  : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेतनासाठी राष्ट्रीयीकृत बँकेतच खाते उघडण्याची सक्ती केली आहे. पण लॉकडाउनमुळे अनेक कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडता आलेले नाही. परिणामी एप्रिल महिन्याचे वेतन लांबणीवर पडण्याची भीती असून वेतनासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी सरकारने दोन महिन्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे.  

मुंबई  : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेतनासाठी राष्ट्रीयीकृत बँकेतच खाते उघडण्याची सक्ती केली आहे. पण लॉकडाउनमुळे अनेक कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडता आलेले नाही. परिणामी एप्रिल महिन्याचे वेतन लांबणीवर पडण्याची भीती असून वेतनासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी सरकारने दोन महिन्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे.  

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर  राज्य सरकारने मार्च महिन्याचे ७५ टक्के वेतन कर्मचाऱ्यांना दिले आहे. त्यातच राज्याच्या वित्त विभागाच्या १३  मार्च २०२० रोजीच्या एका शासन निर्णयानुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन फक्त राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करावेत, असे आदेश जारी केले.

खरेतर गेली अनेक वर्षे सरकारच्या नियमानुसार राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच काही निवडक  खासगी बँकांमधून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतात. सरकारने राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात वेतन जमा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर  राज्यात लगेच लॉकडाउन सुरु झाल्याने अनेक शासकीय विभागांना बँक खाते राष्ट्रीयीकृत बँकेत बदलण्याची कार्यवाही करता आलेली नाही. वास्तविक अशा परिस्थितीत वित्त विभागाने  राष्ट्रीयीकृत बँकेमार्फतच वेतन देण्याच्या शासन निर्णयाला किमान दोन महिने मुदतवाढ देणे अपेक्षित होते.

या उलट २४  एप्रिलच्या परिपत्रकान्वये सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे सक्तीचे केले असून त्याशिवाय पगार मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता संचारबंदीच्या काळात राष्ट्रीयिकृत बँकेत  नवीन खाते कसे उघडावे, असा प्रश्न लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना पडला आहे. या कारणाने एप्रिल महिन्याचे वेतन लांबणीवर पडण्याच्या भीतीने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करून राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी,  अशी विनंती बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  अर्थमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे केली आहे.

अजूनही ऍक्सिस बँकेत खाती
मुंबईतल्या चारही राज्य सरकारी रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलीस ‘कोरोना’च्या विरोधात रात्रंदिवस लढा देत असून या सर्वांची पगाराची खाती ऍक्सिस या खासगी बँकेत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणे अतिशय आवश्यक आहे, याकडेही संघटनेने सरकारचे लक्ष वेधले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...