Agriculture Agricultural Marathi News E-pass required for travel in district Washim Maharashtra | Agrowon

वाशीम जिल्ह्यात येण्या-जाण्यासाठी ई-पास आवश्यक 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

वाशीम  : सध्या एकही कोरोनाबाधित रुग्ण नसलेल्या वाशीम जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यात येण्यासाठी तसेच जिल्ह्यातून राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी मजूर, कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी ई-पास प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे.

वाशीम  : सध्या एकही कोरोनाबाधित रुग्ण नसलेल्या वाशीम जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यात येण्यासाठी तसेच जिल्ह्यातून राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी मजूर, कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी ई-पास प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे.

यासाठी https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून इ-पास घरबसल्या प्राप्त करून घेण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  या संकेतस्थळावर ई-पास मिळविण्यासाठी अर्ज करताना सुरुवातीला ‘जिल्हा/पोलीस आयुक्तालय’ या पर्यायाच्या ठिकाणी तुम्ही सध्या ज्या जिल्ह्यात अथवा पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अडकलेले आहात त्या जिल्हा अथवा शहराची निवड करावी. त्यानंतर अर्जामध्ये नमूद माहिती अचूकपणे भरावी.

संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरताना फोटो, आधारकार्ड अथवा फोटो असलेले ओळखपत्र तसेच कोविड-१९ विषयक लक्षणे नसल्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर मिळणारा टोकण क्रमांक जतन करून ठेवा. तुम्ही सध्या जेथे अडकलेले आहात तेथील जिल्हा प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर तुम्हाला याच संकेतस्थळावर इ-पास उपलब्ध होईल. अर्ज भरल्यानंतर मिळालेला टोकन क्रमांक टाकल्यानंतर हा ई-पास आपणास प्राप्त करून घेता येईल. प्रवासामध्ये या इ-पासची प्रिंट सोबत ठेवणे आवश्यक आहे.  


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...