Agriculture Agricultural Marathi News entrance exams result declared Pune Maharashtra | Agrowon

कृषी पदव्युत्तर पदवी प्रवेशाच्या सामाईक परीक्षेचा निकाल जाहिर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

पुणे  : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळामार्फत चारही कृषी विद्यापीठांच्या २०२०-२१ या वर्षातील पदव्यत्तर पदवी प्रवेशासाठी १४ ते १६ मार्च या कालावधीत सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल रविवारी (ता.२८) जाहिर करण्यात आला. यामध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विद्याशाखेचा विशाल सरवदे ८३ टक्के तर पुण्यातील उद्यानविद्या शाखेतील मयुर माने ७८.५० टक्के गुण मिळवून प्रथम आले आहेत.

पुणे  : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळामार्फत चारही कृषी विद्यापीठांच्या २०२०-२१ या वर्षातील पदव्यत्तर पदवी प्रवेशासाठी १४ ते १६ मार्च या कालावधीत सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल रविवारी (ता.२८) जाहिर करण्यात आला. यामध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विद्याशाखेचा विशाल सरवदे ८३ टक्के तर पुण्यातील उद्यानविद्या शाखेतील मयुर माने ७८.५० टक्के गुण मिळवून प्रथम आले आहेत.

यंदा दहा विषयांसाठी एकूण १८ हजार १८४ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ५०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. परीक्षा मंडळामार्फत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या http://mcaer.org या संकेत स्थळावर शनिवारपासून (ता.२७) निकाल जाहिर करण्यात आला आहे. विद्यार्थी आपले गुणपत्रक संकेत स्थळावरून डाऊनलोड करून घेऊ शकतात. तसेच निकालाबाबत शंका असल्यास विहित फी भरून कार्यालयीन सात दिवसांच्या आत निकाल जाहिर झाल्यापासून फेर तपासणीसाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या नियंत्रक विभागात अर्ज करता येतील. परीक्षा मंडळाने यावर्षी परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडल्याने चालू वर्षी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला जून - जुलैमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू करणे शक्य होईल.

पदव्युत्तर पदवीच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी कृषी शाखेतील सर्वाधिक १० हजार ५० विद्यार्थी बसले होते. उद्यानविद्या, वनशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, गृहविज्ञान, मत्स्यशास्त्र, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, काढणीपश्चात व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. वनशास्त्र शाखेतील ललितकुमार मौर्या हा ७८.०० टक्के, कृषी अभियांत्रिकीतील विजय शिंदे ७६.०० टक्के, अन्नतंत्रज्ञान विभागातील राधा लोळगे ७७.५० टक्के, गृहविज्ञान विभागातील मीरा शिंदे ७९.५० टक्के, मत्स्यशास्त्र विभागातील प्रकाश पटेकर ७९.०० टक्के, कृषी जैवतंत्रज्ञानमधील तुषार धनगरे ८५.००, कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखेतील अक्षय चिखले ६४.०० टक्के, काढणी पश्चात तंत्रज्ञान शाखेतील किरण खोमणे ६४.५० गुण मिळवून प्रथम आले आहेत, अशी माहिती परिक्षा नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...