सातारा जिल्ह्यात १८५६ शेततळी पूर्ण 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेतून आतापर्यंत १८५६ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात माण तालुक्यात सर्वाधिक ३९५ शेततळी पूर्ण झाली आहेत. शेततळ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने पाणीसाठा वाढला असून पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. 

राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. या योजनेतून जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ६६५२ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये ५०७५ अर्ज पात्र; तर १३६० अर्ज अपात्र ठरले असून, १६६ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी ४३३६ अर्जांना मंजुरी देण्यात आली. ३४९२ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या ६३ शेततळ्यांचे काम सुरू असून, १८५६ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. 

माण तालुक्यात या योजनेस सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून, या तालुक्यात ३९५ शेततळी पूर्ण झाली आहे. पाच शेततळ्यांची कामे सुरू आहेत. त्यानंतर फलटण तालुक्यात ३४८ शेततळी पूर्ण झाली असून ३५ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात पूर्व भागात दमदार पाऊस झाल्याने शेततळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. यामुळे टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. पश्चिम भागात दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत या योजनेत प्रतिसाद कमी मिळत आहे. 

तालुकानिहाय शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे ः सातारा ११०, कोरेगाव २४७, खटाव ३२५, माण ३९५, फलटण ३४८, वाई ९३, खंडाळा १०५, महाबळेश्वर १३, जावली २०, पाटण ८४, कऱ्हाड ११६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com