Agriculture Agricultural Marathi News few villages seal due to corona issue Pune Maharashtra | Agrowon

हवेली तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा परिसर सील

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हवेली तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा परिसर शुक्रवारी (ता.१७) मध्यरात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर सचिन बारवकर यांनी आदेशान्वये दिली आहे.

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हवेली तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा परिसर शुक्रवारी (ता.१७) मध्यरात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर सचिन बारवकर यांनी आदेशान्वये दिली आहे.
 

साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ मधील तरतुदी व तहसीलदार हवेली यांच्या अहवालानुसार हवेली तालुक्यातील वाघोली, आव्हाळवाडी, बावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी आणि कोळेवाडी या ग्रामपंचायतींचा परिसर कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सील करण्यात आला आहे. या परिसरातील संबंधित पोलीस स्टेशन प्रमुखांनी परिसर सील करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सील करण्यात आलेल्या भागात नागरिकांना प्रवेशबंदी व त्याभागातून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक कामांकरिता घराबाहेर पडताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तथापि सील करण्यात आलेल्या भागात लावण्यात आलेल्या निर्बंधातून कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यवहार व तेथील मालाची आवक-जावक, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने काम करणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

तसेच येत्या काळात रुग्णांची संख्या लक्षात घेता इतर भागात देखील या प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी किमान सात दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची गर्दी न करता खरेदी करावी, अशी माहिती श्री. बारवकर यांनी दिली आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...