Agriculture Agricultural Marathi News four hot spot in district Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील चार ठिकाणे ‘हॉटस्पॉट’

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

नगर  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नगर शहरातील मुकुंदनगर, आलमगीर तसेच नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), जामखेड शहर ही चार ठिकाणे हॉटस्पॉट केंद्रे म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या ठिकाणाचा दोन किलोमीटर परिघ कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असून सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा वस्तु विक्री शुक्रवारपासून (ता.१०) ते  मंगळवारपर्यंत (ता. १४) बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश काढले आहेत. 

नगर  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नगर शहरातील मुकुंदनगर, आलमगीर तसेच नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), जामखेड शहर ही चार ठिकाणे हॉटस्पॉट केंद्रे म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या ठिकाणाचा दोन किलोमीटर परिघ कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असून सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा वस्तु विक्री शुक्रवारपासून (ता.१०) ते  मंगळवारपर्यंत (ता. १४) बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश काढले आहेत. 

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले अधिक रुग्ण ज्या भागात सापडले आहेत त्या नगर शहरातील मुकुंदनगर, आलमगीर तसेच नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), जामखेड शहर ही चार ठिकाणे हॉटस्पॉट केंद्रे म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केली जाणार असून जीवनावश्यक वस्तुंची व्हेंडर पथके तयार करून खरेदी व विक्री, वाहतूक आदी बाबींचे सूक्ष्म नियोजन केले आहे.

संबंधित ठिकाणी उपविभागीय अधिकारी हे संनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. या भागात मंगळवारपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा वस्तू विक्री बंद राहणार असून कोणत्याही वाहनांना आणि व्यक्तीला कोणत्याही कारणाने प्रवेश नसेल. त्याभागात कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही तिकडेच राहावे लागणार आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...