Agriculture Agricultural Marathi News Incentive allowance to fourteen thousand employees pune Maharashgtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील चौदा हजार कर्मचाऱ्‍यांना प्रोत्साहनपर भत्ता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कर्मचारी जोखीम पत्करून काम करीत आहेत. त्यांच्या कामाबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी भत्ता देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. कोरोना उपाययोजनांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, पुणे.

पुणे  : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोखीम पत्कारून गावस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. जिल्ह्यातील १४ हजार ११६ जणांना प्रोत्साहन भत्याचा लाभ मिळणार आहे. कोरोनाच्या निर्मुलनासाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना विम्याचे सुरक्षा कवचदेखील जिल्हा परिषदेकडून देण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील ५ हजार २३८ ग्रामपंचायत कर्मचारी, ३ हजार २९२ अंगणवाडी सेविका, २ हजार ६८९ अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर २ हजार ८९७ असे कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना उपाययोजनांसाठी आवश्‍यक विविध जबाबदाऱ्या पार पडल्या जात आहेत. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवणे, क्वारंटाइनच्या सूचना देणे, शासनाचे आदेशानुसार आवश्‍यक कामे करणे आदी कामे केली जात आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतन, मानधनाव्यतिरिक्त एक हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार आहेत.

आंबेगाव तालुक्यातील १ हजार ३००, बारामती तालुक्यातील १ हजार ३७, भोरमधील ६७५, दौंड तालुक्यातील ७८८, हवेलीतील १ हजार ६४१, इंदापूरमधील ९५६ , जुन्नरमधील १ हजार ५८९, खेडमधील १ हजार ३९१, मावळमधील १ हजार २०३, तर मुळशीमधील ८५४, पुरंदरमधील १ हजार १२, तर शिरूरमधील १ हजार ३७४ आणि वेल्हे तालुक्यातील २९६ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून १ कोटी ४१ लाख १६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...