Agriculture Agricultural Marathi News Jillha parishad members gives one month payment Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य देणार एक महिन्याचे मानधन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

पुणे  : ‘कोरोना’ या राष्ट्रीय आपत्ती निर्मूलनासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे जिल्हा परिषदेने संवेदनशीलता दाखवत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य एका महिन्याचे मानधन, तर अधिकारी आणि कर्मचारी एका महिन्याचा पगार याकरिता देणार आहेत, अशी माहिती अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

पुणे  : ‘कोरोना’ या राष्ट्रीय आपत्ती निर्मूलनासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे जिल्हा परिषदेने संवेदनशीलता दाखवत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य एका महिन्याचे मानधन, तर अधिकारी आणि कर्मचारी एका महिन्याचा पगार याकरिता देणार आहेत, अशी माहिती अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
 

राज्यातील सामाजिक संघटना व दानशूर व्यक्तींकडून ‘कोरोना’मुळे फटका बसलेल्या नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तू, अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. कोरोना विषाणूने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर साधनसामुग्रीची गरज आहे. विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तेथे निवास व जीवनावश्‍यक बाबींची सोय करण्याचे काम शासनास्तरावर सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च अपेक्षित असून, नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरु असून जिल्हा परिषदेनेही सकारात्मक निर्णय घेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सर्व सदस्यांनी एक महिन्याचे मानधन व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे ठरवले असल्याचे पानसरे यांनी कळविले आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आवाहन
‘कोरोना’ या राष्ट्रीय आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या साधनसामुग्रीची आवश्यकता आहे, असे पत्र ससून सर्वोपचार रुग्णालयाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाला दिले आहे. समाजातील सर्व दानशूर व्यक्ती, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांनी वस्तू व पैशांच्या स्वरुपात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन पुणे विभागाचे धर्मादाय सह आयुक्त दिलीप देशमुख यांनी केले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...