पुणे बाजार समितीसह उपबाजार टाळेबंदीदरम्यान राहणार बंद

पुणे ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली असून याकाळात बाजार समितीच्या मुख्य आवारातील सर्व बाजारांसह चारही उपबाजार बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली असून याकाळात बाजार समितीच्या मुख्य आवारातील सर्व बाजारांसह चारही उपबाजार बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. अडते, कामगार, शेतकरी आणि सर्व घटकांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली. यामध्ये सोमवार (ता. १३) ते गुरुवारी (ता.२३) या कालावधीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड, जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 

दरम्यान, शहरातील व्यापारी महासंघाने संपूर्ण टाळेबंदीला विरोध दर्शविला आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया यांनी पत्रक काढून पुन्हा लॉकडाउन लागू करू नये, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाला केली आहे.

पुन्हा संपूर्ण टाळेबंदी केल्यास व्यवसायाची मोठी हानी होणार असून ती सहन करण्यापलीकडे असणार आहे. तसेच होणारे आर्थिक आणि मानसिक नुकसान कधीही भरून येणार नाही. व्यापाऱ्यांमध्ये मानसिक ताण वाढत असून उद्रेक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाउन न करता शहरातील सर्व दुकाने सकाळी नऊ ने सायंकाळी सात या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्‍यक ती उपयोजना सर्व दुकानदारांनी केली असल्याचे त्या त्या असोसिएशनकडून हमीपत्र घेऊन दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, असेही महासंघाच्या पत्रात म्हटले आहे.

भुसार बाजार रविवारी सुरु राहणार सोमवारी मध्यरात्रीपासून (ता. १३) बाजार समिती बंद असल्याने भुसार बाजार रविवारी सुरू राहणार आहे. रविवारी भुसार बाजाराला सुट्टी असते. परंतु शहरातील आणि उपनगरातील खरेदीदारांना अन्नधान्य, किराणा माल खरेदी करता यावा, खरेदीदारांना जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून रविवारी भुसार बाजार चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दि पूना मर्चंटस्‌ चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com