Agriculture Agricultural Marathi News market committee will remain closed during the lock down Pune Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुणे बाजार समितीसह उपबाजार टाळेबंदीदरम्यान राहणार बंद

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली असून याकाळात बाजार समितीच्या मुख्य आवारातील सर्व बाजारांसह चारही उपबाजार बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली असून याकाळात बाजार समितीच्या मुख्य आवारातील सर्व बाजारांसह चारही उपबाजार बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. अडते, कामगार, शेतकरी आणि सर्व घटकांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली. यामध्ये सोमवार (ता. १३) ते गुरुवारी (ता.२३) या कालावधीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड, जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 

दरम्यान, शहरातील व्यापारी महासंघाने संपूर्ण टाळेबंदीला विरोध दर्शविला आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया यांनी पत्रक काढून पुन्हा लॉकडाउन लागू करू नये, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाला केली आहे.

पुन्हा संपूर्ण टाळेबंदी केल्यास व्यवसायाची मोठी हानी होणार असून ती सहन करण्यापलीकडे असणार आहे. तसेच होणारे आर्थिक आणि मानसिक नुकसान कधीही भरून येणार नाही. व्यापाऱ्यांमध्ये मानसिक ताण वाढत असून उद्रेक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे लॉकडाउन न करता शहरातील सर्व दुकाने सकाळी नऊ ने सायंकाळी सात या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्‍यक ती उपयोजना सर्व दुकानदारांनी केली असल्याचे त्या त्या असोसिएशनकडून हमीपत्र घेऊन दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, असेही महासंघाच्या पत्रात म्हटले आहे.

भुसार बाजार रविवारी सुरु राहणार
सोमवारी मध्यरात्रीपासून (ता. १३) बाजार समिती बंद असल्याने भुसार बाजार रविवारी सुरू राहणार आहे. रविवारी भुसार बाजाराला सुट्टी असते. परंतु शहरातील आणि उपनगरातील खरेदीदारांना अन्नधान्य, किराणा माल खरेदी करता यावा, खरेदीदारांना जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून रविवारी भुसार बाजार चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दि पूना मर्चंटस्‌ चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...