Agriculture Agricultural Marathi News officers become confuse for work due to less man power Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये कामांबाबत संभ्रम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

पुणे  : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शासनाने कडक पावले उचलली आहेत. दुसरीकडे वित्तीय वर्ष  मंगळवारी (ता.३१) संपणार असल्याचे आदेश राज्याच्या वित्त विभागाने काढले आहेत. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्याने काम करणे अवघड झाले आहे. आता ‘कोरोना’च्या संदर्भात दिलेली कामे अगोदर करायची की विभागातील वित्तीय वर्षाची कामे पूर्ण करायची अशी संभ्रमावस्था जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

पुणे  : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शासनाने कडक पावले उचलली आहेत. दुसरीकडे वित्तीय वर्ष  मंगळवारी (ता.३१) संपणार असल्याचे आदेश राज्याच्या वित्त विभागाने काढले आहेत. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्याने काम करणे अवघड झाले आहे. आता ‘कोरोना’च्या संदर्भात दिलेली कामे अगोदर करायची की विभागातील वित्तीय वर्षाची कामे पूर्ण करायची अशी संभ्रमावस्था जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दररोज शासन याबाबत विविध आदेश काढून त्याची कार्यवाही करत आहे. ‘कोरोना’च्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांना कामे दिल्याने सर्व अधिकारी, कर्मचारी त्यामध्ये व्यस्त आहेत. अल्प कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेतील विभागांमधील कामकाज सुरू आहे, त्यातच आता राज्याच्या वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिवांनी २०१९-२० चे वित्तीय वर्ष ३१ मार्च २०२० ला संपणार असल्याचे आदेश जारी केला आहे.

एकीकडे शासन कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे तर दुसरीकडे असे आदेश काढून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामे सांगत आहे. त्यामुळे नेमके कोणते काम करायचे असा प्रश्न अधिकारी व कर्मचाऱ्यांपुढे आहे.

कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची वानवा
राज्य शासनाने अगोदर शासकीय कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाच टक्क्यांवर आणली. शासकीय कार्यालयाशी होणारे पत्रव्यवहार ऑनलाइन करण्याचे आदेशही दिले. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची वानवा आहे. वरिष्ठ कार्यालयाला एखादी शासकीय माहिती देण्याची झाल्यास कार्यालयांमध्ये लिपीकसुद्धा दिसेनासे झालेत. त्यामुळे माहिती द्यायची कशी असा प्रश्न कार्यालय प्रमुखांसह अधिकाऱ्यांना पडला आहे.
----
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...