Agriculture Agricultural Marathi News over two lacks citizens enjoying Shivbhojan Thali Mumbai Maharashtra | Agrowon

दोन लाखांवर नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

‍मुंबई  : गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. ११ फेब्रुवारीला योजनेच्या अंमलबजावणीस १७ दिवस पूर्ण झाले. या १७ दिवसांच्या कालावधीत राज्यातील २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. या योजनेतून राज्यात १३९ शिवभोजन केंद्रे सुरू झाली आहेत.

‍मुंबई  : गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. ११ फेब्रुवारीला योजनेच्या अंमलबजावणीस १७ दिवस पूर्ण झाले. या १७ दिवसांच्या कालावधीत राज्यातील २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. या योजनेतून राज्यात १३९ शिवभोजन केंद्रे सुरू झाली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शिवभोजन योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रजासत्ताकदिनी योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीतच म्हणजे २ फेब्रुवारीपर्यंत शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या १ लाख ५ हजार ८८७ होती. आता ११ फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे.
शिवभोजन योजनेतून जेवण देताना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी मुख्यमंत्री ठाकरे स्वत: या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी योजना सुरू झाल्यानंतर शिवभोजन केंद्रात जेवण घेत असलेल्या नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला होता. जेवणाबाबत समाधानी आहात का, जेवणाची चव व्यवस्थित आहे का, काही सूचना असल्यास सांगण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले होते. त्यावर जेवण छान आहे, अशी प्रतिक्रिया योजनेतून थाळीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली होती.  


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...