Agriculture Agricultural Marathi News people scared due to earthquake Palghar Maharashtra | Agrowon

पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 एप्रिल 2020

मुंबई  ः पालघर जिल्हा रविवारी (ता.५) रात्री पुन्हा भूकंपाने हादरून गेला. रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी डहाणू आणि तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.१ एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचे धक्के बसताच अनेकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात रस्त्यांवर मोठी गर्दी जमली होती. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक घरांना तडे गेल्याचे सांगितले जाते. 

मुंबई  ः पालघर जिल्हा रविवारी (ता.५) रात्री पुन्हा भूकंपाने हादरून गेला. रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी डहाणू आणि तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.१ एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचे धक्के बसताच अनेकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात रस्त्यांवर मोठी गर्दी जमली होती. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक घरांना तडे गेल्याचे सांगितले जाते. 

गेल्याच आठवड्यात बुधवारी पालघरमध्ये रात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी रात्री ११ वाजता भूकंपाचा दुसरा धक्का बसला होता. लागोपाठ दिवसाआड भूकंपाचे धक्के बसल्याने पालघरमधील रहिवासी घाबरलेले असतानाच रविवारी रात्रीही भूकंपाचा धक्का बसल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सावरोली, बोरमाळ आणि कोचाराई आदी ठिकाणचे ग्रामस्थ भीतीने घराबाहेर पडले. यामुळे या दोन्ही तालुक्यांत रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. या भूकंपामुळे येथील घरांना तडे गेल्याने नागरिक अधिकच घाबरले. त्यामुळे येथील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. 

दरम्यान, ‘कोरोना’च्या भीतीने घराबाहेर पडण्यास असलेली मनाई आणि दुसरीकडे भूकंपामुळे निर्माण झालेली दहशत यामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांची चांगलीच कोंडी झाली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...