Agriculture Agricultural Marathi News Rafik naikwadi take a temporary charge of Co-director pune maharashtra | Agrowon

कृषी सहसंचालकपदाचा पदभार तात्पुरता नाईकवडींकडे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पुणे  : राज्याच्या ‘पोकरा’ प्रकल्पाचे कृषी व्यवसाय विशेषज्ञ रफिक नाईकवडी यांनी पुणे कृषी विभागाच्या सहसंचालकपदाचा (जेडीए) तात्पुरता पदभार स्वीकारला आहे. 

कृषी आयुक्तालयाच्या दैनंदिन कामकाजात पुणे ‘जेडीए’ पद अतिशय महत्त्वाचे समजले जाते. मंत्र्यांचे दौरे, मुंब्ईतील बैठका, पश्चिम महाराष्ट्रातील प्रशासकीय निर्णय तसेच आयुक्तांकडून स्थानिक पातळीवर होत असलेले दौरे व इतर कामकाजाच्या नियोजनात ‘जेडीए’ची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच नाशिकच्या कृषी सहंसचालकपदावर कार्यरत असलेले दिलीप झेंडे यांची काही महिन्यांत पुण्याच्या ‘जेडीए’पदी वर्णी लागली. 

पुणे  : राज्याच्या ‘पोकरा’ प्रकल्पाचे कृषी व्यवसाय विशेषज्ञ रफिक नाईकवडी यांनी पुणे कृषी विभागाच्या सहसंचालकपदाचा (जेडीए) तात्पुरता पदभार स्वीकारला आहे. 

कृषी आयुक्तालयाच्या दैनंदिन कामकाजात पुणे ‘जेडीए’ पद अतिशय महत्त्वाचे समजले जाते. मंत्र्यांचे दौरे, मुंब्ईतील बैठका, पश्चिम महाराष्ट्रातील प्रशासकीय निर्णय तसेच आयुक्तांकडून स्थानिक पातळीवर होत असलेले दौरे व इतर कामकाजाच्या नियोजनात ‘जेडीए’ची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच नाशिकच्या कृषी सहंसचालकपदावर कार्यरत असलेले दिलीप झेंडे यांची काही महिन्यांत पुण्याच्या ‘जेडीए’पदी वर्णी लागली. 

“श्री. झेंडे सध्या व्यक्तिगत कारणामुळे महिनाभर रजेवर आहेत. त्यामुळे ‘जेडीए’चा पदभार श्री. नाईकवडी यांच्याकडे देण्यात आला आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली. पुण्याच्या ‘जेडीए’च्या अखत्यारित नगर, पुणे, सोलापूर अशी तीन महत्त्वाचे जिल्हे देण्यात आले आहेत. पुणे ‘जेडीए’ कार्यालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील कोणत्याही ‘जेडीए’ संलग्न  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) पदापेक्षा पुण्याचा ‘जेडीए’ संलग्न ‘एसएओ’ वजनदार समजला जातो. याच ‘एसएओ’पदावर दादासाहेब सप्रे यांनी प्रशासकीय हुकूमत ठेवली होती. 

“शासनाने ‘एसएओ’ श्री.सप्रे यांना ‘जेडीए’पदावर बढती दिली. विशेष म्हणजे बढतीवर नवे पद देतांना ‘मृदसंधारण’ विभागात दिले गेले आहे. त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पुण्याच्या जेडीए संलग्न ‘एसएओ’ पदावर श्री. नाईकवडी यांची वर्णी लागली. त्यांनी यापूर्वी राज्याच्या दक्षता विभागाचे प्रमुख म्हणून कारकीर्द गाजविली असून त्यांच्या काळात सुरू झालेल्या चौकश्या अजूनही सुरू आहेत.”, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

दक्षता पथकाच्या कारवाया राज्यभर वेग घेत असताना श्री. नाईकवडी यांची अचानक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा प्रकल्पात झाली. माझी कोणीही बदली केली नसून मी स्वतःच वैयक्तिक कारणास्तव बदली करून घेतली, अशी भूमिका श्री. नाईकवडी यांनी त्या वेळी घेतली होती. आता तेच नाईकवडी पुन्हा ‘एसएओ’ म्हणून पुण्यात परतले आहेत. विशेष म्हणजे कृषी भवनात दक्षता पथकाच्या कार्यालयाला लागूनच त्यांचेही कार्यालय आहे.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...