Agriculture Agricultural Marathi News ration will available in advance Nashik Maharashtra | Agrowon

स्वस्त धान्य दुकानांमधून दोन महिन्यांचे धान्य उपलब्ध होणार : मंत्री छगन भुजबळ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

नाशिक  : राज्यात कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरांवर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सोय व्हावी म्हणून स्वस्त धान्य दुकानात एप्रिलसोबतच मे व जून महिन्याचे धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

नाशिक  : राज्यात कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरांवर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सोय व्हावी म्हणून स्वस्त धान्य दुकानात एप्रिलसोबतच मे व जून महिन्याचे धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ ची अंमलबजावणी करण्यात येते. अंत्योदय अन्न योजनेखालील राज्यात २४ लाख ७ हजार ४६२ कुटुंबांना प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका ३५ किलो धान्य आणि प्राधान्य कुटुंबातील ५ कोटी ४८ लाख ६० हजार ३३१ व्यक्तींना प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो याप्रमाणात धान्य देण्यात येते. ३ रुपये प्रतीकिलो दराने तांदूळ आणि २ रुपये प्रतिकिलो दराने गहू उपलब्ध करून देण्यात येतो.

स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल महिन्याच्या सोबतच मे व जून महिन्याचे धान्यही वाटप करण्यास सुरुवात केली जाणार आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तूचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणीत करुन धान्यवाटपाची सुविधा ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट किंवा अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नसल्याचेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...