Agriculture Agricultural Marathi News road repairing works begin soon Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे सुरू होणार : जिल्हा परिषदेचा निर्णय

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

पुणे  :  जिल्ह्यात मार्चपुर्वी प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेल्या रस्त्यांची कामे आणि दुरुस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अपुर्ण कामे तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुणे  : राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेली टाळेबंदी काहीशी शिथील करण्यात आल्यानंतर मॉन्सूनपूर्व अत्यावश्‍यक कामे करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विविध शासकीय निधीतून करण्यात येणारी कामेही सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मार्चपुर्वी प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेल्या रस्त्यांची कामे आणि दुरुस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अपुर्ण कामे तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आमदार, खासदार फंडातून करण्यात येणार रस्ते, त्यांची दुरुस्ती, तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि इतर ग्रामविकासाच्या योजनांमधून ३१ मार्चपुर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाला सुरवात करता येणार आहे. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांना तांत्रिक मान्यता देणे, निविदा प्रक्रिया पुर्ण करून कार्यारंभ आदेश देणे याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. याशिवाय सामाजिक अंतराचे बंधन पाळून अत्यावश्‍यक कामे करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनीही परवानगी दिली आहे.

दरम्यान ‘कोरोना’मुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरूस्ती रखडली आहे. महिन्याभरात ही दुरूस्ती न झाल्यास ठेकेदार ही कामे टाळून आनामत रक्कम काढतील यामुळे महिन्याभरात दुरूस्तीची कामे व्हावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली. दोन वर्षांमध्ये झालेल्या ग्रामीण रस्त्यांची दुरूस्ती करण्याबाबत सुचना करण्यात आल्या.

पावसाळा तोंडावर असताना रस्ता दुरुस्तीची कामे होणे गरेजेचे असल्याने या कामांना तत्काळ सुरवात करण्यात यावी, तसेच कामे अद्यापही सुरु झालेली नाही अशा ठेकेदारांची यादी तयार करावी, आणि पुढील सभेमध्ये सादर करावीत असे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...