वारकरी संप्रदायाचा विचारच तुम्हाला समजला नाही ः शरद पवार

लहानपणापासून मामासाहेब सोनोपंत दांडेकर आणि वारकरी संप्रदायाशी संबंध आला. आईच्या सांगण्यावरून इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी घरातून भाकरी बांधून आणत असे. मुख्यमंत्री असताना तीर्थक्षेत्रांसाठी निधी पुरवून विकासाचा संकल्प केला. मात्र, केलेल्या कामाची कधी जाहिरात केली नाही. - शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला भेट देत दर्शन घेतले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला भेट देत दर्शन घेतले.

आळंदी, जि. पुणे  ः कुठल्याही देवाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर मला कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. ज्यांनी मला परवानगी नाकारली त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. त्यामुळे त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. लहानसहान गोष्टी होतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला जो रस्ता पसंत आहे, त्यावर प्रामाणिकपणे पुढे जायचे आणि त्याच्याशी बांधीलकी ठेवायची असते, त्याच्याशी तडजोड करायची नसते, या भावनेने मी आळंदीत आलो, असे सूचक उत्तर माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आळंदी येथे पंढरपुरातील राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वादग्रस्त पत्राला देत वादावर पडदा टाकला. 

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी पंढरपुरातून राष्ट्रीय वारकरी परिषद आणि निवृत्ती वक्ते यांनी नुकतेच वादग्रस्त पत्रक काढले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हिंदूविरोधी असून त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, असा आशय त्या पत्रकात होता. त्या पत्रकाचा आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांनी दोन दिवसांपूर्वी निषेधही केला होता. त्याला अनुसरून श्री. पवार यांनी शनिवारी आळंदीत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यात खास शैलीत उत्तर दिले. या वेळी कामगार उद्योगमंत्री दिलीप वळसे पाटील, शांतिब्रम्ह मारोती महाराज कुरेकर, आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांची उपस्थिती होती. 

दरम्यान, कार्यक्रमाला येण्यापूर्वी श्री. पवार यांनी आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी देवस्थानच्यावतीने प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे यांनी त्यांचा शाल ज्ञानेश्वरी देत सन्मान केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com