शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन 

 मोबाईल ॲपमध्ये नागरिकांचे रांगेत छायाचित्र काढून त्यांना शिवभोजन थाळीचे वाटप केले जात होते.
मोबाईल ॲपमध्ये नागरिकांचे रांगेत छायाचित्र काढून त्यांना शिवभोजन थाळीचे वाटप केले जात होते.

पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना रविवारपासून (ता. २६) पुणे शहरात विविध ठिकाणी सुरू झाली. या योजनेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला.   

पुणे महानगरपालिकेतील उपहारगृहात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ झाला. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते. 

शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन देण्याची योजना आहे. भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे महानगरपालिका क्षेत्रात ७ ठिकाणी एक हजार थाळी व पिंपरी चिंचवड महानगर पालिका ४ ठिकाणी ५०० थाळीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या योजनेअंतर्गत जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येणार आहे. त्यासाठी चालकाला शासनाकडून ‘महा अन्नपूर्णा ’ हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या भोजनालयातून दुपारी बारा ते दोन या कालावधीतच शिवभोजन थाळी मिळणार आहे. 

शिवभोजन थाळी मिळणारी ठिकाणे : - शिवसमर्थ भोजनालय, हडपसर गाडीतळ, - कात्रज बसस्थानक,- स्वारगेट बसस्थानक कँटीन,- हॉटेल समाधान गाळा नं ११, मार्केटयार्ड - कौटुंबिक न्यायालय कॅटीन, शिवाजीनगर, - हॉटेल निशिगंधा, महानगरपालिका भवन,- पिंपरी चिंचवड महानगर पालिका कॅंटीन, - अनिल स्नॅक्स सेंटर, महात्मा फुले मंडई, - यशवंतराव चव्हाण रूग्णालय कॅंटीन, पिंपरी, - वल्लभनगर बसस्थानक कॅंटीन, पिंपरी, - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कॅंटीन. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com