Agriculture Agricultural Marathi News Student gives response to the learn at home initiative Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेच्या घरबसल्या शिक्षण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 एप्रिल 2020

पुणे  : कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण टाळेबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये देखील बंद आहेत. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेने घरबसल्या शिक्षण (लर्न अ‍ॅट होम) उपक्रम राबविला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिली ते आठवीच्या जवळपास १ लाख ३४ हजार ९७१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

पुणे  : कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण टाळेबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये देखील बंद आहेत. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेने घरबसल्या शिक्षण (लर्न अ‍ॅट होम) उपक्रम राबविला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिली ते आठवीच्या जवळपास १ लाख ३४ हजार ९७१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

‘कोरोना’ची विद्यार्थ्यांना लागण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या काळात त्यांची अध्ययन प्रक्रिया सुरू राहण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने गृह अध्ययन प्रकल्पाअंतर्गत आराखडा तयार केला आहे. विद्यार्थ्यांनी २०१९-२० वर्षातील अभ्यासक्रमाचा सराव पूर्ण केल्यानंतर पुढील वर्षामध्ये येणाऱ्या विषयांची पूर्वतयारी होईल, असा अभ्यासक्रम या योजनेंतर्गत तयार करण्यात आला आहे. शाळेतील सर्व शिक्षकांमार्फत त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात येणार आहे. याकामी पालकांनाही सहभागी करून घेत समाज माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना घरीच शिक्षण दिले जात आहे.

जिल्ह्यात इयत्ता १ ली ते ८ वीतील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास १ लाख ९१ हजार ७५६ आहे. यातील १ लाख ३४ हजार ९७१ विद्यार्थ्यांनी १७७ केंद्रातून जिल्हा परिषदेने दिलेल्या लिंकवर नोंदणी केली आहे. सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून करून घेणाऱ्या गृहअध्ययन आराखड्यात दोन्ही सत्रातील अभ्यासक्रमाचा यात समावेश आहे.

कौशल्यावर आधारित असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यातील एक घटक दररोज अभ्यासाला घेतला जाणार आहे. सर्व अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकातील असल्याने पुस्तके संदर्भ म्हणून वापरता येतील. पालकांनी दिक्षा अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोड करून घेतले असून पाठ्यपुस्तकातील क्युआर कोड स्कॅन करून घटकातील व्हिडिओ मुलांना दाखवून भाषण, वाचन, लेखन व भाषा समृद्धी याचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून घरीच बसून केला जात असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...